हायस्कुलचे दिवस आठवले की
मन आपोआप भरुन येत...
हरवलेले ते दिवस आठवताच,
काळीज दाटुन येतं........

शाळेत जाण्याआधीच कऴला होता
ओमन सरांचा गुच्चा....
पाठीचा कणा मोडणारा तो हातोडा
आता खरोखर वाटतो सच्चा...

'अशाप्रकारे' हा शब्द
पातेरे सरांचा जान होता...
डोळे फिरवुन चिमटा काढणे
हा जणु त्यांचा मान होता.....

परिक्षेला वर्गात झरे सर येताच
सगऴे गाईड घेऊन असायचे
काँपी करणारे सारे ठग
देवाला हात जोडायचे....

अत्तार सरांचा ' Be serious '
कुणी मनावर घेतला नाही...
अत्तरासारखा दरवळणारा स्वभाव
खुप काही शिकवुन जाई....

बेंद्रे सर नाही आले की
पोरांची मज्जा व्हायची....
गणिताच्या तासाला प्रेमवेड्यांची
वेगळीच शाऴा भरायची....

संभा दिसायचा रागीट
पण मनाने मन जिंकुन घ्यायचे
भाऊजी पोरींचे लाडके
तरी पोरांवर जीव टाकायचे

चांदे सरांची दुनिया वेगळी
लिखाणा शिवाय कळली नाही..
देवरुखकर सरांच पर्यावरण
अक्षरशा पाेरांच्या डोक्यात जाई......

खुप आहे अजुन सांगण्यारख
पानच लिहायला पुरणार नाही
शाळेतली ती दुनियादारी
डोळ्यामध्ये मावत नाही.....

शाळेतली ती दुनियादारी
डोळ्यामध्ये मावत नाही.....

     संगमेश्वर,कारभाटले हायस्कुल
         Miss my school days..
            😰😰😰😰😰😥😥😥😥

No comments:

Post a Comment