नेहमी नेहमी काय बोलता?
'नवरे असे नवरे तसे'...
'नवरे असे नवरे तसे'...
- कामावरुन दमून येऊनसुद्धा अलगद जवळ घेणारा 'नवरा'.
- रुसल्यावर मस्करी करुन तुम्हाला हसविणारा 'नवरा'.
- भूक लागली असतानासुद्धा तुम्हाला त्रास नको म्हणून 'पोट भरलेले आहे' असे फसविणारा 'नवरा'.
'नवरा' म्हणून आणखी चांगले वागणार कसे?
नेहमी नेहमी काय बोलता?
'नवरे असे नवरे तसे'...
'नवरे असे नवरे तसे'...
- कधीतरी सणाला हळूच गजरा आणणारा 'नवरा'.
- तुम्ही सुंदर दिसत असता तरीही 'म्हैस बरी' म्हणून तुम्हाला चिडविणारा 'नवरा'.
- फार जपतो तो तुम्हाला. पण नेहमी रागावतो म्हणून वाईट तो 'नवरा'.
- तुम्ही दिसत नाही घरात तेंव्हा पहा कसे होतात वेडे-पिसे?
नेहमी नेहमी काय बोलता?
'नवरे असे नवरे तसे'...
'नवरे असे नवरे तसे'...
- कधीतरी फार थकूनसुद्धा काही बोलत नाही तो 'नवरा'.
- तरीही तुमचा आधाराचा हात हातात घेऊन 'तू आहेस तर आणखी लढेन',
असे अबोलपणे बोलून जातो तो 'नवरा'.
असे अबोलपणे बोलून जातो तो 'नवरा'.
त्याच्या गळ्याभोवती रोज लागतात फासे?
नेहमी नेहमी काय बोलता?
'नवरे असे नवरे तसे'...
'नवरे असे नवरे तसे'...
- तुम्ही जन्म देता कबूल करतो तो 'नवरा'.
- पण तुमच्यापेक्षाही मुलांवर जीव ओतून टाकतो तो 'नवरा'.
- कधी कधी मुलांपेक्षाही लहान समजून तुम्हाला कुशीत घेतो तो 'नवरा'.
- कधी कधी जीवाला कंटाळून तुमच्या मिठीत ढसाढसा रडून मन मोकळे करतो तो 'नवरा'.
तुम्ही आहात सोबत तर मी 'अमीर',
भले रिकामे असोत त्याचे खीसे.
भले रिकामे असोत त्याचे खीसे.
नेहमी नेहमी काय बोलता?
'नवरे असे नवरे तसे'...
'नवरे असे नवरे तसे'...
- भाजीत मसाला जास्त झाला तरी तुमच्यासाठी गोड मानून खातो तो 'नवरा'.
- एखादा घास कमी खाऊन,
तुमच्यासाठी पाणी पिऊन राहतो तो 'नवरा'.
तुमच्यासाठी पाणी पिऊन राहतो तो 'नवरा'.
मनात हजार प्रश्न.
पण नेहमी चेहऱ्यावर हसू दिसे.
पण नेहमी चेहऱ्यावर हसू दिसे.
नेहमी नेहमी काय बोलता?
'नवरे असे नवरे तसे'...
'नवरे असे नवरे तसे'...
Dedicated to all good husbands.
No comments:
Post a Comment