खुप खुप ताकत लागते आलेलं अपयश पचवायला, डोळ्यात आलेलं पाणी पुसून ओठांवर हसू खेळवायला, काहितरी ध्येय लागत आपल्याला आयुष्यात जगायला, शेवटी अपयशाचीच गरज असते, आयुष्यात खंबीर बनायला......!!
एका श्रीमंत माणसाची कार छोटा गरीब मुलगा कुतूहलाने पाहत होता. त्या माणसाने मुलाला गाडीत बसवले आणि फिरवून आणले.....
मुलगा : - "तुमची कार किती सुंदर आहे! महाग असेल ना......?"
श्रीमंत : - "हो माझ्या भावाने मला गिफ्ट दिली आहे. मला माहित आहे की तू काय विचार करतोयस, तुलापण अशी कार हवी आहे ना,.......?"
मुलगा ( विचार करून ) : - "नाही, मला तुमच्या भावासारखे बनायचे आहे..".....
परिस्थितीसमोर गुडघे टेकले तर परिस्थिती तुम्हांला नेस्तनाबूत करते. मात्र तूमच्या ध्येयासाठी परिस्थितीशी झुंजाल तर परिस्थिती सुद्धा नतमस्तक होते......
"जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे चांगले वाटतं ते करा ....!!
"आत्मविश्वास अशी शक्ती आहे, जी तुम्हांला पायथ्यावरून शिखरावर पोहचविते"......!!!!
No comments:
Post a Comment