वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना
५ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चाॅकलेट काढणे पण
तरी त्याचे नेहमी तिथेच चाॅकलेट ठेवणे.
१० वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श.
१५ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे,
आम्ही शाळा बुडवल्यामुळे पकडले गेल्यावर त्याने
स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा.
१८ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे,
शाळेच्या निरोप समारंभात त्याने
मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा.
२१ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे,
माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट.
२६ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्नासाठी केलेली मागणी.
३५ वर्षाची स्त्री : प्रेमम्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक.
५० वर्षाची स्त्री : प्रेम म्हणजे,
तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद.
६० वर्षाची स्त्री : प्रेमम्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्याजन्मात लवकरच
भेटण्याचे दिलेले वचन.
पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे 'आकर्षण' असतं,
परत पहावसं वाटणं हा 'मोह' असतो, त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही 'ओढ' असते, त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा 'अनुभव' असतो
आणि त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं "प्रेम" असतं..
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल..!
माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..
जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो..
पण
मृत्यूच येण मात्र अकस्मात असत..
कारण त्याला माहितीय,
माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुंदर आहे..
No comments:
Post a Comment