Baap baap asato

VERY GOOD LINE,
NAKKI VACHA.
लहान असल्यापासून आई मुलांना
सांगत असते.......

इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल,
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल,

अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल,
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात.

बाबांच्या भयाने शाळेत जातात.

बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.

बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष
करुन आई वरच प्रेम करु लागतात.

मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर   सर्वस्व अर्पण करतात.

बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात.

कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही.

बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.

मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !

मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्येi."नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात.
बाबासाहेबांना "भिमाई' म्हणतात.
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................  !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र.

तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........

असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ?????????

का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!

कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................

बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !

डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..

पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला" बाप" म्हणतात...🙏 naki share kara

No comments:

Post a Comment