खरं तर ठरवलं होत एकटं जगायचं,
ध्येय ठरवलेल्या घारी प्रमाणे अवकाशात वावरायचं,
ना कुणाचं व्हायचं ,
ना कुणाला आपलं बनवायचं,
मिळत जातात वेदना ,
भावनांचे आकाश फाटत जाते ,
दरी अश्रूंची आणी हास्याची जिथे विनासायास वाढत जाते ,
असं हे वेदनादायी प्रेम तरी कुणावर कुणी कसं करतं?
जिथे वेदनांचा बाजार , भावानांचा कळवळा उगाचच सादर करतं ,
तरीसुध्दा मन कुणावर प्रेम करायचं थांबत नाही,
वाट अवघड असली तरीसुध्दा चालायचं ते थांबत नाही .......
No comments:
Post a Comment