***रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
इराण्याच्या चहा बरोबर मीळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी आहेत ते विचारू नका राव !!
सचीन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
***** रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!
पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर
एक होती चिऊ ,एक होती काउ…
***रांवाचे नाव घेते , डोक नका खाऊ…
कोल्हापूरी लोकांचा आवडता उखाणा …
कुत्र्यात कूत्र अल्सेशिअन कुत्र
***** रांवानी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र
ईवले ईवले हात, त्याचे ईवले ईवले पाय,
****** राव आले नाहीत अजुन,
पिउन पडले कि काय……. !!
चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ.
अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
चांदिच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतूकड्या, थोबाड कर इकडे
केळीच्या पानावर् पाय् कशी ठेवु,
लग्न नाही झाल तर नाव कशी घेउ .
परसात अंगण ,अंगणात तुळस,
—– रांवाचे नाव घ्यायचा मला नाही आळस.
ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट,
बघितल तिला आणि पड्ली माझा विकेट.
लग्नात् लागतात हार आणि तुरे,
—- रांवाच्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे.
आंब्यात आंबा हापुस आंबा अन,
आमची ——– म्हणजे जगदंबा.
सचिनच्या ब्याट वर चेंडु टाकतो वाकुन्,
—- चे नाव घेतो सगळ्यांचे मन राखुन.
साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
—- ने मला पावडर लाऊन फसवले.
रनवे वर प्लेन धावतात फास्ट,
— रांव इज माय फस्ट आणि लास्ट.
इंद्रधनुष्याचे असतात सात रंग,
वर-वधुही सप्तपदित असतात दंग.
संगिताचे असतात सात सुर,
——- रांव् बसलेत माझ्यापाऩ दुर्.
जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरति सगळ्य़ा च्य़ा नजरा.
भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
—– च्यां जीवावर मी करते मजा.
काचेच्या ग्लासात कोकम सरबत,
—– रांवाशिवाय मला नाही करमत.
कपात कप बशीत बशी,
— माझी सोडुन बाकी सर्व जनी म्हशी.
अत्ततराची बाट्ली कचकन फुट्ली,
—– नाव घ्यायला लाज नाही वाट्ली.
चांदिच्या परातित केशराचे पेढे
— आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.
खण खण कुदळी,
मण मण माती,
मण मातीच्या उभारल्या भिन्ती,
चितारले खांब ;
सासुबाईंच्या पोटी
आक्काबाईंच्या पाठी उपजले …. रांव,
….. रांव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;
३२ पानं ३२ सुपारी तोंडात
विडा बोलु कशी?
सदर दाराची,नजर पुरुषाची
सदरेला उभी राहु कशी?
येत होते जात होते घड्याळात पाहात होते;
घड्याळात वाजले तीन —- याची वाट पाहाते
—— याची सुन्.
गोड करंजी सपक शेवाई,
—– होते समजूतदार म्हणूनच,
———- करून घेतले जावई.
नाही नाही म्हणता म्हणता झाल्या
भरपुर चूका,
——– चे नाव घेतो
द्या सगळयाजणी एक एक मुका.
ह्या दाराच कुत्र त्या दारी भूंकत,
—— ला पाहुन माझ डोक दुखत.
केळीच पान टर टर फाटत,
—- रावांनच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.
शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा,
हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा.
महादेवाच्या पिडींवर बटाट्याची फोड्,
—– रावांना डोळे मारण्याची लई भारी खोड्.
Tags: Comedy Ukhane/comedy ukhane/ marathifunny Marathi ukhane/funny ukhane/Gamtidar Ukhane/marathi ukhane comedy/Marathi Ukhane Funny/ukhane comedy list/गमतीदार
- For More Visit.......Facebook Page:-https://www.facebook.com/marathikhichadiTwitter :-https://twitter.com/MarathiKhichadi
For more marathi ukhane, read here -
ReplyDeleteukhane 101
funny ukhane for groom
romantic ukhane for male
romantic ukhane for female
comedy ukhane for bride