दूरदर्शन वर एक हृदयस्पर्शी जाहिरात केली जात आहे.....
सबसिडी सिलेंडर वरील सबसिडी जास्तीत जास्त गरीब लोकांना मिळण्यासाठी  ज्यांना खरोखर सबसिडीची गरज नाही त्यांनी ती स्वेच्छेने सोडून द्यावी....

का असली अपेक्षा जनते कडून केली जाते मला कळत नाही....

१२.५ टक्के एक्साइज, ५ टक्के सेल्स टॅक्स , ३३ टक्के इन्कम टॅक्स, १४.३६ टक्के सर्विस टॅक्स , १.५ प्रोफेशनल टॅक्स, १० लक्झरी टॅक्स, २ टक्के जकात, ३ टक्के एलबीटी

जवळ जवळ ६४ % टॅक्स सरकार लोकांच्या उत्पनातून काढून घेते

म्हणजे एखादा व्यक्ती किंवा कंपनी १०० रुपये कमवत असेल तर ६४ रुपये सरकार अगोदरच काढून घेते

भारतातील मोठ मोठ्या कंपन्या करोडो रुपये टॅक्स भरतात ,,

आणि तरीही पैसा नाही म्हणून टोल वसूल करून विकास केला जातो

मग हा पैसा जातो कुठे ,,,,,,, साहजिकच राजकीय पुढारी नेते ,,, आमदार खासदार ,, नगरसेवक ,, सरकारी कर्मचारी ,,, सगळे मिळून हा पैसा खातात ,,,

कुठल्या हि पक्षाचा नेता अथवा एकही पक्ष सज्जन साधू नाही ,,,

प्रत्येक नेत्याची कुंडली काढा ,, त्यांचा आज्जा किंवा पणजा भाजी वडा पाव विकत होता ,, किवा भाजीपाला विकत होता ,, किवा कोण पत्रकार होते ,, कोण साधे दुकान चालवत होते ,, कोण शेतकरी होते ,, अचानक अब्जावतीची कमाई एका पिढीने केली कशी ,,,

कोणी ना हिंदूंचे कल्याण केले ,, ना बहुजनांचे कल्याण केले ,, ना मराठी माणसांचे कल्याण केले ,, कल्याण त्यांनी त्यांच्या पिढीचे करून घेतले ,,,

आज भारतात असा नगरसेवक, आमदार किंवा खासदार नाही की ज्याच्याकडे ४ व्हीलर नाही ,,,

लाज वाटली पाहिजे जनतेकडून काही अपेक्षा करण्याची ,,,

अरे अगोदर तुम्ही सोडा सगळे चंगळवादी राहणे ,,,,

फक्त देशभरातल्या सर्व आमदारांनी व खासदारांनी दर महिना १० % पगार कमी घेतला तर १० वर्षे गॅस सबसिडी मिळेल गरिबांना....
😡😡

No comments:

Post a Comment