रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.

बायको: कुठे होतात दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात.

नवरा: अग मी ना...ते आपल..हे...

बायको: (नवर्याचे त त प प ऐकून आणखी रागावून) आता का गप्प? सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकटी कोणाची?

नवरा: (थोड़ा धीर जमावून) अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो!

बायको: काय? कशाला आणलत तुमच्या आईला इथे? तुमच्या भावांकडे सोडायच होतत तिला.

(आई बिचारी दरवाज्याबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पहात पण नाही.)
नवरा: (अगतिकपणे) तिला माझ्या भावांकडे सोडण शक्य नाही! प्लीज समजून घे!

बायको: का आपल्याकडे कुबेरचा खजिना आहे वाटत? तुमच्या दहा हजार पगारात आपलच भागात नाही. आता आई कशाला आणखी?

नवरा: (निग्रहाने) आई इथेच राहील!

बायको: हो का? मग ह्या घरात एकतर ती राहील किंवा मी! आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. काय हो कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला? ( हे विचारात बायको बाहेरचा दिवा लाऊन दरवाज्याबाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहर्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहुन हादरलेली बायको दोन पावल मागे सरकते आणि म्हणते...)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आई तू???

.
.
आई: हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळल आणि घराबाहेर काढल. मी जावईबापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले!

(आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रु पुसून नवर्याकडे लाडिक कटाक्ष टाकत बायको वदते..)

बायको: (लाडात येत) तुम्हीपण ना अगदी अस्से आहात. जा बाई. कित्ती दिवसांनी इतक छान सरप्राइज दिलत! थॅंक यु डार्लिंग! (आईकडे वळत) चल आई. दमली असशील. जेऊन घे गरमगरम!

नवराच्या आईचं काय ?

No comments:

Post a Comment