अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले. सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पाहिलं भाषण करायचं होतं. त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य, जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती उठून उभे राहिले आणि लिंकन ला उद्देशून म्हणाले ," मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका कि तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते "
सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं कि याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे आणि त्यांची लायकी दाखवली आहे. मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक ? ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठे पणा सिद्ध करतात, ते हि अगदी शांतपणे !! लिंकन हि असेच !!
सभागृह काय होणार याकडे जीव कान आणि डोळ्यात आणून पहात होतं. प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली ,आणि त्याला म्हणाले ,
"सर , मला माहित आहे हे , कि माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत कि ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट आणि पादत्राणे बनवत होते कारण त्यांच्या सारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं "
" ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते , त्यांच्या हातात जादू आणि कला होती , त्यांनी बनवलेल्या चप्पल -बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते , आपलं संपूर्ण मन आणि कसब ते त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे , तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय ? कारण हे कसब मलाही अवगत आहे कि हे बूट कसे बनवायचे. आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment