कामासाठी वेळ द्या .
कारण ती यशाची किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या .कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या .
कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या .
कारण तो ज्ञानाचा पाया आहे .
स्नेहासाठी वेळ द्या .
कारण तो सुखाकडे नेण्याचा मार्ग आहे.
स्वप्नांसाठी वेळ द्या .
कारण ते ध्येयाकडे जाण्यास सोबत करील .
हास्यविनोदासाठी वेळ द्या .
कारण ते जीवनसंगीत आहे..
आणि
स्वत:साठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्वाचे दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
No comments:
Post a Comment