पाहूया श्रीकृष्ण काय म्हणतो.
श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला.
पुढे सतत जीवावर संकटं आली. तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुध्धा काढला.
पण संकटं टाळावीत म्हणून स्वताची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही, ना उपास केले. ना अनवाणी पायाने फिरला.. त्याने पुरस्कार केला फक्त कर्मयोगाचा!!
भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला. तेव्हा कृष्णाने ना अर्जुनाची कुंडली मांडली, ना गंडे-दोरे बांधले. तुझं युद्ध तुलाच कराव लागेल असं त्याने अर्जुनाला ठणकावून सांगितलं.
अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वत अर्जुनातर्फे लढाई केली नाही. श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. जर अर्जुन लढला तर त्याने अर्जुनाचा सारथ्य करण्याची तयारी दाखवली. एक महान योद्धा driver बनला. अर्जुनाला स्वताची लढाई स्वतालाच करायला लावली.
ह्या कृतीतून संदेश दिला कि जर तुम्ही स्वताचा संघर्ष करायला स्वत सज्ज झालात तर मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमचा driver बनायला तयार आहे. पण तुम्ही लढायला तयार नसाल तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही. तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही.
कोणत्याही देवाचा-देवीचा आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा श्रीकृष्णाला विसरू नका.
अनवाणी चालत जायची गरज नाही. उपाशी राहायची गरज नाही... शस्त्र खाली टाकू नका
प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. नेमकं तेच शस्त्र काढा आणि त्याचा उपयोग करून लढा. कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही.
तुमची स्वप्न फुकटात पूर्ण करून देणार नाही.
स्वताची लढाई स्वत लढा
No comments:
Post a Comment