*व्यावसायिक उधारी कशी हाताळाल*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*आज पासून ऊधारी बंद करा*
---------------------------------------------------
*भारतातील जवळ जवळ ३६% लहान व्यवसाय उधारीमुळे बंद पडतात, यात मुख्यत्वेकरून किराणा दुकान, बिल्डिंग मटेरियल, कृषी खते व औषधे इत्यादी अनेक प्रकारचे लहान मोठे व्यवसाय येतात. उधारीची सुरवात ही अगदी लहान प्रमाणात व वैयक्तिक ओळखीमुळे होते. व्यवसाय वाढावा म्हणून दुकानदार उधार देतो व शेवटी उधारी वसूल न झाल्यामुळेच व्यवसाय बंद करायची वेळ येते. या विषयावर काही मार्गदर्शक तत्त्वे व्यावसायिकांनी घालून घेतली पाहिजेत.*
*१)* वैयक्तिक ओळख व घसट करू नका. 'घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या?' व्यवसाय करत असताना ग्राहकांशी वैयक्तिक व खाजगी व्यवहार, बोलणे चालणे टाळा. तुम्ही व्यवसाय करण्यास बसला आहात, हे ओळखी व मैत्री वाढवायचे माध्यम नव्हे. पैसा हाच तुमचा मित्र हे लक्षात ठेवा.
*२)* कामाशिवाय बसू नये, व्यवसायाच्या ठिकाणी हा नियम तुम्ही लावा. ग्राहकांना त्यांच्या खरेदी व व्यवसायाव्यतिरिक्त बिनकामाचे फार वेळ बसू देऊ नये. यातूनच उधारीला सुरुवात होते.
*३)* स्पष्टवक्तेतपणा ठेवा. 'विनंती केली आहे. आम्ही काय पळून जातो का? ऐवढा विश्वास नाही का?' नम्रपणे हात जोडा व सांगा, 'दोस्ती मेरे से करो, धंदे से नही. उधार मागू नका, मित्र म्हणून मी एक काय दोन वेळा चहा पाजतो.'
*४)* काही प्रमाणात व काही दिवसासाठी काही व्यवसायात उधारी द्यावीच लागते. उदा. कंपनीचे टेंडर, दुधाचा व्यवसाय, पेपर दूध इत्यादी. अशा उधारीचे प्रमाण एकूण व्यवसायाच्या उलाढालीच्या २५% हून अधिक नसावे म्हणजे काही प्रमाणात उधारी उशिरा वसूल झाली तर फारसा फरक पडणार नाही
*५)* वह्या भरलेल्या व गल्ला मोकळा. काही जणांची मी हास्यास्पद परिस्थिती पाहतो. उधारीच्या वह्या भरलेल्या, एकूण १० लाख येणे आहे पण आज गल्ल्यात ५ हजारही नाहीत. खेळता पैसा नसल्यामुळे धंदा ठप्प झालेला असतो.
*६)* प्रत्येक ग्राहकाची उधारी पेलण्याची ऐपत लक्षात ठेवून उधारी द्या. एखाद्याच्या दोन महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त उधार देऊ नका. पहिली उधारी दिली नसेल, तर इथून पुढे रोखीने व मागची उधारी घ्या. त्याला २ ते ३ टप्पे करा.
*७)* कोणत्याही सबब पुराव्याशिवाय उधार देऊ नका. उदा. पी.डी.सी चेक, कायमचा पत्ता, नोकरीचे ठिकाण इत्यादी. स्वत:कडे जेवढे भांडवल असेल तेवढ्याचीच उधारी करा, बाजारातील उचललेल्या मालावर उधारीचा धंदा करू नका, नाहीतर दोन्हीकडची पण जाईल. उधारीची भीड चेपत नसेल, तर धंदाच करू नका; कारण तो निश्चित नुकसानीचा मार्ग आहे.
प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.*
*टिप.हा लेख सर्व ऊधारी वाल्या व्यावसायिक बंधू ना समर्पित.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
super information frohe Weihnachten
ReplyDelete10th books marathi 10th marathi rasgrahan pdf
ReplyDelete