खूप छान विचार

🚶🏾khup Chan  हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........

🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍

🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍

🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍

🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल
त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍

🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍

🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो...
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले....
की यशालाही पर्याय नाही..✍🏻

🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍

🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"
तर "देवात" पण काढतात.....✍

🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल....
हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल....✍

🚶🏾👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍

🚶🏾👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!!
तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍

🚶🏾👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही...,
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍

🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍

🚶🏾👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍

🚶🏾👌एक सत्य  . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍

🚶🏾👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍

🚶🏾👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍

🚶🏾👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍

🚶🏾👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका
          कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही.....✍
💐💐🚩🚩👌🏻👌🏻👌🏻       खूप छान आहे वेळ असेल तर नक्की वाचा .

मिठी

बायको : ए, सांग ना मिठीतली 'मी' पहिली की दुसरी..?
🤔

नवरा : अॅ..? आता हे काय..?
😯

बायको : अरे सांग ना पहिली की दुसरी..?
😠
.
.
.

(चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ नवऱ्याला लपवता येत नव्हता)
.
.
.
.

बायको : अरे लवकर सांग, माझं काम अडलंय.
😡

नवरा : तुला का ते जाणून घ्यायचंय..? कोणाचा तरी भूतकाळ उकरून काढण्याची ही वेळ आहे का..?
😕
.
.
.

बायको : अरे लेख लिहितेय मी, 'मिठी' की 'मीठी' लिहू..?
माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे. You know ना, माझ्या किती चूका होतात. म्हणून विचारलं मिठीतली मी पहिली की दुसरी...!
😌

😄😄😆नवरा मरता मरता वाचला😆😆😂😂😂🤣🤣

Life Story

नक्की वाचा 👌🏻👌🏻👌🏻
आम्ही एवढा एन्जॉय का करतो.
वाचा नक्कीच १०१% आवडेल.

      एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.

            *प्रिय मित्रहो..*
  *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.*
          *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.*
      👍🏻👍🏻👍🏻