🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' कशाला तुमची दुःख दूर करायला.अरे ती पण मी दूर करतो☺पण माझ्या दुःखाच काय? माझ्या वेदनाचं काय? आता मनात विचार🤔 येत असेल कि मला कसलं दुःख ना😓 म्हणून आज मला तुमच्याशी बोलायचं आहे जरासं🙏 अरे मी तुमचं सर्व काही ऐकतो ना, मग आज दोन शब्द माझे देखील तुम्ही ऐका ना। कारण दरवेळी तुम्हांला माझी गरज असते ना,पण ह्यावेळी खऱ्या अर्थाने मला तुमची गरज आहे😔 कारण मी स्वतःच हरवलो आहे😓
कसा ?
हो सांगतो...........।
महिना सप्टेंबर " गणेश चतुर्थी " ह्या दिवसाची माझे सर्व गणेश भक्त किती आतुरतेने माझी वाट बघत असतात☺ आणि मला पण तुम्हाला भेटण्याची एक वेगळीच चाहूल लागलेली असते😇..एक दोन महिना आधीच माझ्या आगमनाची तैयारी चालू होते.किती आनंदात मला तुम्ही घेऊन येतात.पण अजून पर्यंतर मला एक गोष्ट नीट कळली नाही🤔.....कि मला माझ्या आगमनाच्या दिवशी का आणलं जात नाही😔 काही ठिकाणी तर मला एक दोन महिना आधीच आणलं जात😓 का तर त्यांना माझ्या आजूबाजूला सजावट करायची असते..अरे पण तुम्हांला हे का कळत नाही कि त्याचा मलाच जास्त त्रास होत असतो😔 कारण सजावट करताना तुम्ही माझं तोंड झाकलेले असते।अरे तुम्हाला सजावट महत्वाची कि मी🤔 भले तुम्ही त्या सजावट मध्ये नंबर मिळवत असणार पण माझं काय 😟 माझा विचार कधी करणार तुम्ही ? कि फक्त गणपती बाप्पा मोरया बोललं तर झालं 😔😔😔
दीड दिवस,पाच दिवस,सात दिवस,अकरा दिवस तुम्ही माझी किती मनापासून पूजा करतात..पण तेव्हा पण मी तुमची संकट ऐकत असतो😪 अरे मला जेव्हा तुम्ही घेयायला येतात🙂 तेव्हा आमच्यात काय फरक असतो रे🤔 मी तिथे निवांत तुम्हाला फक्त बघत असतो...पण तुमचे तेव्हा विचार खूप वेगळे असतात..मी खूप वेळा ऐकलं सुद्धा आहे👂कि माझा गणपती ह्यावेळी बाहुबली सारखा असावा🙁 माझा गणपती ह्यावेळी मोरावर बसलेला असावा😕 तर कधी आमचा गणपती सायकल चालवताना असावा😕 पण तुम्हाला हे का कळत नाही कि माझं खर वाहन आहे ते म्हणजे उंदीर मामा🐭 मला सांगा अस आहे का कि माझा आकार जेवढा वेगळा असेल,त्याला मी जास्त आशीर्वाद देतो🤔 नाही ना...? मग का माझे वेगवेगळे आकार तुम्ही करत असतात...। नकी मला सांगा तुम्ही मला कशासाठी घेऊन येतात🤔...पूजा करण्यासाठी , भक्ती करण्यासाठी कि फक्त दिखाव्यासाठी ते अजून मला सुद्धा कळालं नाही आहे.... पूजा तर माझी तुम्ही मनोभावे करतात...गोड गोड पदार्थ मला नैवैद्याला चढवतात😋 सकाळी आणि संध्याकाळी माझी सर्वजण आरती करतात👏🏻 तेव्हा माझं मन खूप भारावून जात😇 पण काहीच दिवसांनी माझी परतण्याची वेळ येते😔 म्हणजे माझ्या विसर्जनाची....तेव्हा तर मी खूपच घाबरत असतो😞 पण तो घाबरलेला चेहरा तुम्हांला कधी दिसलाच नाही😒 कारण तुम्हांला फक्त मी जाताना ढोल- ताशा,डी-जे आणि बॅन्जो ह्यांच्या तालावर नाचायचं असतं। अरे पण हा पैसा माझ्या दर्शनाला आलेल्या भक्ताकडूनचं जमा केलेला असतो ना।तीस रुपये,साठ रुपये लवकरात लवकर बाप्पाच दर्शन,अरे माझ्या दर्शनाची किंमत ठरवणारे तुम्ही कोण रे ।
पण तेही मी हसता-हसता तुम्हांला माफ करतो.....।😇
😞शेवटी तो दिवस उजाडतो...आणि मला विसर्जनाला घेऊन जाण्याची तैयारी तुमची चालू होते😇पण माझ्या हृदयात एकच ठोका वाजत होता.....तो म्हणजे 🤔 तुम्ही माझं विसर्जन कस करणार ते😓😓 विचारात पडलात ना...मी असं का बोललो ते🤔
सांगतो😔
भले तुमचं नीट लक्ष नसत कारण आणताना तुम्ही मला एवढं जपून आणतात कि एखाद्या जल्माला आलेल्या बाळाला आईजशी जपते...तसच मला तुम्ही जपत असतात।पण विसर्जनाच्या दिवशी अस का करतात😓
कुठे मला ढकलून देणं, तर कुठे मला बुलडोझर ट्रॉली ला लटकवून मला वरूनच फेकून देणं। खूप वेदना होतात मला...खूप रडायला सुद्धा येत। अरे तुमच्यासमोर मला फेकल जात,तुमच्यासमोर माझे तुकडे केले जातात...अरे माझा एक एक अवयव तोडून टाकतात....तुम्ही माझ्या गळ्यात रशी टाकून मला तुम्ही पाण्यात खेचत असतात....अरे जेव्हा मी पडतो ना तेव्हा माझा हाथ तुटतो,तर कधी पाय, तर कधी तोंड,खूप त्रास होत असतो....अरे त्या जागी स्वतःला कधीतरी बघाना।तुम्हाला जर असं कोणी पाडलं... तोडलं तर तुम्हाला देखील वेदना होतीलच ना।मग मला का नाही होणार....ह्याचा विचार तुम्ही का करत नाही...का माझ्या मनाची विटंबना करत असतात😔 का माझ्या एवढ्या मोठ्या आकाराच्या मुर्त्या बनवत असतात...का मला अशे तुम्ही वेगवेगळे आकार देत असतात । अरे तुम्ही माझी मूर्ती विसर्जन करून त्या दिवशी मला तिथे सोडून जातात...पण त्याच्या दुसऱ्यादिवशी आम्ही अशेच त्या किनाऱ्यावर पडलेलो असतो...कोण आमच्याकडे पाहत सुद्धा नसतं... । ते BMC वाले तर प्रत्यक्ष आमच्यावर झाडू मारतात😔 ती काय चुकी त्यांची नाही तुमची आहे कारण तुम्ही मला अश्या अवस्थेत सोडून गेलेले असतात...। कारण तुमची सर्व संकट मी घेऊन गेलेलो असतो ना। दरवेळी तुम्ही माझ्याकडे काही ना काही मागतात ना। आणि ते मी देतो देखिल 😇
मग आता मी तुमच्याकडे काहीतरी मागतो....😇
पहिलं म्हणजे P O P च्या मुर्त्या बनवणं बंद करा😊(मातीच्या सुंदर आणि सुबक मुर्त्या बनवा😇 जेणेकरून माझं विघटन देखील लवकर होईल)दुसर म्हणजे जे मला तुम्ही आकार देतात....ते देखील बंद करा.....। (मला दिखाव्यासाठी कोणी आणू नका )तिसरं म्हणजे ज्यादिवशी माझं आगमन असत त्या दिवशीच माझं आगमन करा🔆😇 आणि ज्यादिवशी माझं विसर्जन असेल त्याच दिवशी माझं विसर्जन देखील करा🙏 चार म्हणजे माझ्या दर्शनाची किंमत कोणी ठरवू नका,लोकांना फसवू नका🙏......आणि माझ्या लाडक्या भक्तांना विनंती करतो कि माझी उंची जास्त वाढवू नका...तर माझं विसर्जन हे उत्तम पद्धतीने होईल आणि तेव्हा मी पुढच्या वर्षी तुमच्याकडे लवकर येईन😇😇
तर बोला "गणपती बाप्पा मोरया"
🙏 तर मित्रांनो येणाऱ्या गणेशोत्सवाला मी सर्व गणेश भक्तांना विनंती करतो कि सर्वांनी मातीच्या मुर्त्या ह्या वेळी आपल्या घरी आणा😇😇😇😇
जेणेकरून आपला बाप्पा सुखात पण येईल आणि निरोप देखील सुखात घेईल😇😇😇😇😇😇😇
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
मित्रांनो हि पोस्ट जास्तीत जास्त सर्वांकडे पोहचवा
सर्वांना मी मनापासुन विनंती करतो🙏🙏🙏
एक गणेशभक्त
No comments:
Post a Comment