मुलाचं लग्न झाल्यानंतर माझं कीचन पुर्ण बदललयं... सुनेने त्याला पुर्ण मॉडर्न बनवलयं..!!

बाहेर काम करुन घरी लवकर आली की किचनमधे शिरुन काही ना काही बनवण्याची तिला हौस आहे..

पुर्वी मी विळी घेऊन भरभर कांदा कापत होते पण आता तिने कांदा कापून द्यायच यंत्रही आणलयं.. खोबर किसायचंही....

खरंच.. जेवण बनवणं कीती सोप्पं झालयं!  *काही सासवा या सुधारणा स्विकारत नाहीत...* 

"आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे..स्वतःच्या हातानी करायचो सगळी कामे ."  अशी वाक्य फेकत विनाकारण सुनांना कमी लेखण्यातच त्या धन्यता मानतात...

अरे असु देत ना.. तुम्हाला नाही मिळालं तरुणपणात सुख म्हणून तर सुनांनीही घ्यायच नाही ?

उलट तुम्ही सुध्दा त्याच्या बरोबरीने नवीन एंजॉय करायचा प्रयत्न करा..
उद्या त्यांच्या सुना आल्या तर त्या आणखीन काहीतरी नवीन बदल करतीलच की... आपण जातं सोडून पीठाच्या गिरणीकडे वळलोच ना? पाटा वरवंटा सोडून मिक्सरला आपलसं केलच ना? मग येऊ देत की विचारातही आणखीन बदल... त्या यंत्रांशी खेळण्यात पण एक मज्जा आहे.. ती घ्या..
आणि सुनेने कौतुकाने समोर आणलेला पास्ताही मनापासून खा ! मग बघा ती सुध्दा तुमची चपाती भाजीही किती चवीने खातेय ते...

माझी सुन खाते मी केलेलं आवडीने.. मीही स्विकारलीय तिच्या हातची  वेगळी चव... 😊😊😊
आपल्या मुलासाठी सुन स्वत:ला बदलवतच असते की.. मग आपल्या मुलासाठीच आपणही जरा बदललं तर त्याचाच संसार सुखाचा होईल... तेच तर हवं असत ना आईला??

*आणि हो..* सुनेनेही आपल्या सासुबाईला आईसारखे मानावे.. त्यांच्या बोलण्यामागेही मुलाचे व कुटुंबाचे भले व्हावे हीच अपेक्षा असते..

*माणसाने बदल स्विकारले की नाती सुदृढ होतात..!!*

- एक सासुबाई

*BABA*

लहान असल्यापासून आई मुलांना
सांगत असते.......

इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल,
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल,

अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल,
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात.

बाबांच्या भयाने शाळेत जातात.

बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.

बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष
करुन आई वरच प्रेम करु लागतात.

मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर   सर्वस्व अर्पण करतात.

बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात.

कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही.

बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.

मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !

मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्ये..........."नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................  !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र.

तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........

असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ?????????

का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!

कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................

डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..

पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात...
१ शेअर बाबांसाठी.👍🙏❤

पु. ल. म्हणतात -

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो...

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो...बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो...

माणूस अपयशाला भीत नाही...अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते...

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो...
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो...

सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही...

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे...

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते... तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं...

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय...

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते...

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...💞💞
🌺🌺🌺🌺
🌹🌺🙏🏻शुभ सकाळ🌹🌺🙏🏻

*वेडी ही बहीणीची माया*.....

भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.
जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा...

माणसांच्या गर्दीत
हरवून बसला माझा भाऊ
सांगा ना त्याला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

एकुलता एक दादा
त्याला जिवापाड जपला
लग्न झाल्या पासून
वाहिनी च्या पदरा आड लपला
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ
सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

नको दादा साडी मला
नको पैसा पाणी
तुझ्या सूखा साठीच
देवा ला करते विनवणी
सांग तुला कोणत्या रंगाचा  शर्ट घेऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ....

काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते
तळ हातावरले फोड बघून
तूझी आठवण येते
दादा चढउतार होतात जीवनात
तू घाबरुन नको जाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

उचलत नाहीस फोन म्हणून
वहीनीला केला
Wrong नम्बर करत
कट त्यांनी केला
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

आई बाबा सोडून गेले
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ
डोळ्यामधी आले
वाईट वाटते शेजारी येतात  जेव्हा त्यांचे भाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ....

नको मला जमीन
नको घराची वाटणी
आवडीने खाईन
भाकरी आणि चटणी
काकूळती ला आला जीव
मनात राग नको ठेऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ .....
😔😔😔😔
आवडली तर नक्की शेयर करा
....🙏 कवयित्री   बहिनाबाई चौधरी)

Hasa Pot Bharun...

पोट धरून हसा..

दत्तुचि आई :  वीस वर्ष मला             
           काहीच मुलबाळ नव्हतं .

गन्याची आई : अगं बाई गं !
           मग काय केल हो तुम्ही ?

दत्तुचि आई : काही नाही !
          मग मी २१ वर्षाची झाले ,
         बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला !!!
😜😜😜

नदी किनारी जोडपे बसलेलेे असते

प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे

प्रियकर : तोच ग ....

२५पैसा १ मिनीट

प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच

😆😎😎😏😏😁
 
पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला...
.
.
तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला 😢😥

Moral:- प्रेम is खरतनाक than गुटखा  😂💪🙆🏻😃😃😃
😆😆😆😆😆😜
सरदार इंटरव्यू देने गया,
बॉस ने पूछा तुम कितने भाई बहन हो
सरदार: 5
बॉस: उन में तुम्हारा नंबर कौनसा है ?

सरदार: एयरटेल
😂😂😂😂😂😂😂

लोक म्हणतात कि एक दिवस
दारू  पिल्याने सतत सवय
लागते.
एकदम चूक

आम्ही लहान पणा पासून
अभ्यास  करतोय

लागली का सवय ?

याला म्हणतात Control. 😂😝😆😂😂😂

खुलता कळी खुलेना....
आमचा बोनस काय मनासारखा मिळेना
.
.
वैतागलेला कामगार
😄😄😄

बायकांची सरकारला विनंती :

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair & lovely ला जरा मनावर घ्यावे,

6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही .
एक वैतागलेली काळी परी
😂😂😂😂😂😂😂😂😂

😀 एक भयंकर जोक 😀

प्रियकर - मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार...

प्रेयसी - का ?

प्रियकर - घरचे विरोध करतात...

प्रेयसी - घरी कोण कोण आहेत ?

प्रियकर - बायको आणि दोन मुले...

😜😂😝😜

बर झाले ‪
‎लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये

नाही तर

‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎
बिनलग्नाचे‬ मेले असते
😂😂😂😂😂😂😂

एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात... बहिण किचनमध्ये असते.  तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते.,

बहिण : मुलगा कसा आहे?

भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला
फिल्मचा हिरो वाटतो....

बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺

भाऊ : "फँड्री
😜😝😜😜😜😜😜

मानलेली बहीण,
मानलेला भाऊ,
मानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी,
ही मानलेली नाती चालतात....

तर मानलेली " बायको " यात काय
प्रॉब्लेम?
😝😝
भावाचा मित्र भावासारखा असतो
बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी
..................
तर बायकोची मैत्रीण
बायकोसारखी का नाही ??
हरी ओम् 😝😝

😝😉😜
☺☺☺😝😝😝😝
.😝😝😝

नविन आहे बाजारात. फेका दुसरी कडे😉😉😉😉
  जो येतो तो ग्रुप हालवतो

जो येतो तो ग्रुप हालवतो


च्यायला आता मी ग्रुपच
अम्बुजा सीमेंट चा बनवतो.
😂😂😜😜😛😛😝😝😄

एगदा सर बंड्याला प्रश्न विचारतात      सर :  कॉस थिटा ÷ साईन थिटा =?







बंड्या : पणदूर तिट्टा
😜😜😜😜

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या.
ज्या,
सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या

" सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना??

👉लास्ट बेंच मित्रमंडळ..👈
😝😝😝😝😡😡😡

गुरुजी - हॉस्पिटलमधल्या ➕ चिह्नाचा अर्थ सांग पाहू.

बंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..!


😳😨😱😃😄😆😝

मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
पळू शकत नसाल तर चाला.
चालू शकत नसाल तर रांगा.
पण पुढे सरकत राहा."
.
.
एका मालवणी माणसाने विचारले,

.

"तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा?
😂😂😂

पोरगी पोरग्याला:

"तुझी स्माइल काय गजब हायं..
दात कशे चमकुन रायले बे इतके...? 😁




पोरगं लाजून... ☺

"माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!"
😌😊😁😂😂😂😂