*वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही...*
*कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व "परक्याची" ओळख करून देते*
*धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही..जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.*
*ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!*
*या जगात सर्वात...*
*मोठी संपत्ती "बुध्दी"*
*सर्वात चांगल हत्यार "धैर्य"*
*सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"*
*सर्वात चांगले औषध "हसू"*
*आणि आश्चर्य म्हणजे हे*
*"सर्व विनामुल्य आहे".*
No comments:
Post a Comment