न संपणारी एखादी स्वप्नांची सुंदर माळ असावी, न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी, ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी, आणि न मागताही साथ देणारी तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी. ।।

पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
      दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात.
      दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात.
      दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
      पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ?
     पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो.

No comments:

Post a Comment