*उडता पंजाब'चं धक्कादायक वास्तव*
Ref Zee24taas
Read nd think..
नवी दिल्ली : काही दिवसांपासून वादात सापडलेला दिग्दर्शक अभिषेक चौबे आणि प्रोड्यूसर अनुराग कश्यप यांचा सिनेमा 'उडता पंजाब' रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. पंजाबचं नाव यामुळे खराब होत असल्याचं लोकांचं म्हणणं होतं म्हणून लोकांचा याला विरोध होता. यामध्ये ड्रग्ज अॅडिक्ट तरुणांची स्टोरी सांगण्यात आली आहे.
पंजाबमध्ये एका स्टींग ऑपरेशनद्वारे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ड्रग्ज अॅडिक्ट झालेल्या एका तरुणीने म्हटलं की, ही खूपच वाईट नशा आहे. या ड्रस्जसाठी तरुणी काहीही करायला तयार होतात. स्वत:चं शरीर देखील विकतात.
तरुणी म्हणते की या ड्रग्जमुळे ती पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. मी माझ्या कुटुंबाला १० रुपये देखील नाही देवू शकत. मी खूप मोठी चूक केली. म्हटलं होतं की फक्त एकदा ट्राय करुन पाहू पण ती गोष्ट कधीच थांबलीच नाही. सगळे स्वप्न अपूर्ण राहिले.
तरुणी म्हणते की ती रोज ड्रग्ज घेते. एका दिवसाला २ ते ३ हजार खर्च होतात. घरातल्या सर्व वस्तू विकून आम्ही ड्रग्ज घेतो.
या तरुणीच्या या खुलास्यानंतर ड्रग्ज ही किती धोकादायक असू शकते हे काळालं असेलच. पहिल्यांदाच ही गोष्ट करुन पाहण्याचा हट्ट करु नका. कारण ती नंतर कधीच थांबत नाही आणि संपूर्ण जीवन यामुळे उद्धवस्त होतं.
No comments:
Post a Comment