तमाम बहुजनांना शिवजयंतीच्या हार्दिक सदीच्छा

बहुजन प्रतिपालक,अठरापगड जातीचे व सर्व धर्माचे स्वराज्य निर्माते, प्रजाहितदक्ष, अमावास्येच्या रात्रीही लढाई करून लढाई जिंकणारे अंधश्रद्धा विरोधी, स्रीजातीचा आदर करणारे, उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ, सात बारा पहिल्यांदा सुरु करणारे, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे आज्ञापत्र काढणारे, शेतकऱ्यांचे कर्ज व शेतसारा माफ करणारे, पहिल्यांदाच वतनदारी पद्धत बंद करून ठराविक वेतन पद्धत सुरु करणारे, इंग्रज, डच, फ्रेंच यांचा धोका ओळखून समुद्री आरमार व जलदुर्ग बांधणारे, स्वतःचा शक सुरु करणारे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे हात पाय कलम करणारे, शत्रूंचीही कबर बांधून दिवाबत्तीची सोय करणारे, त्याकाळी सुद्धा पाण्याचे महत्व लक्षात घेऊन तलाव बांधणारे, गनिमिकाव्याचे निर्माते,( व्हिएतनाम सारख्या देशाचे प्रधानमंत्री म्हणतात कि ज्यांचे युद्धकौशल्य शिकून आम्ही  लढाया जिंकल्या ) असे युद्धनीतीतज्ञ राजे, कधीही नवस न करता व मुहूर्त न पाहता लढाई करणारे व जिंकणारे, शत्रूला मारता येईल तितके मारा पण मरायची वेळ आली तर पळता येईल तेवढे पळा असे सांगणारे, स्वराज्याची स्वतंत्र राजमुद्रा असलेले राजे, मोघलाविरुद्ध लढतांना स्वतःच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक ठेवणारे, जीवाला जीव देणारे मावळे  (ज्यांच्याशिवाय स्वराज्य निर्माण करणे शक्य नव्हते) असे मित्र असणारे, सामान्यांचे असामान्य राजे, हिरकणी बुरुज, सिंहगड, पावन खिंड अशी नावे ठेवून प्रजा व मावळे यांचा सन्मान करणारे, शत्रूलाही ज्यांचा आदर वाटत होता (महाराज्यांच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर औरंगजेबाने नमाज पडून म्हटले की "हे अल्ला तुझ्या पदरी स्त्रियांचा सन्मान करणारा राजा येत आहे, तुझ्या पदरी त्यांना सन्मानाची जागा दे")

असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती! त्यांना मनाचा मुजरा!🙏🏻

तमाम बहुजनांना शिवजयंतीच्या  हार्दिक सदीच्छा!🌹💐🌹💐
जय शिवराय🙏🏻
जय भीम🙏🏻
जय महाराष्ट्र🚩
जय भारत🇮🇳

No comments:

Post a Comment