मानवाने "Computer" बनवला आहे "Computer" ने मानव नाही बनवला

खुप खुप ताकत लागते आलेलं अपयश पचवायला, डोळ्यात आलेलं पाणी पुसून ओठांवर हसू खेळवायला, काहितरी ध्येय लागत आपल्याला आयुष्यात जगायला, शेवटी अपयशाचीच गरज असते, आयुष्यात खंबीर बनायला.....!!

 माणूस हा सवडीनुसार वागत असतो, चहात माशी पडली तर चहा फेकून देतो, पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो तूप नाही,अगदी तसच.....
               आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो पण, जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो.....!!

'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे, जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे, सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही.....!!

कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही, देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा.....!!

जीवन मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे, आपण स्वावलंबी बनायला शिकले पाहिजे, जीवनात कोणावरही जास्त अवलंबून राहू नका, स्वत: च्या मनगटावर विश्वास ठेवा, या जगात अशक्य असे काहीच नाही,

कारण मानवाने  "Computer"  बनवला आहे  "Computer"  ने मानव नाही बनवला, हे नेहमी लक्षात ठेवा, बाकी प्रत्येकाची मर्जी.....!!!

                   🙏  शुभ सकाळ  🙏

                    !!!   जय महाराष्ट्र   !!!

No comments:

Post a Comment