पनीर चिली -Paneer chilli Dry

सर्व्हिंग: ४ माणसांसाठी









साहित्य:
२०० ग्रॅम ताजे पनीर
१ कप उभा चिरलेला कांदा
१ कप भोपळी मिरची उभी चिरून
६-७ लसूण पाकळ्या चिरून
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
१ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून मिरपूड
१/४ कप डार्क सोया सोस
३ टेबलस्पून कॉर्नफ्लोर
मीठ चवीप्रमाणे
१ चिमुट अजिनोमोटो
तेल

कृती:
१. पनीरचे चौकोनी तुकडे करा.२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर मध्ये २ चिमुट मीठ घाला त्यात १/४ कप पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवून तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्या.
२. कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात लसूण फोडणीला घाला.लसूण परता आणि लगेच हिरवी मिरची कांदा आणि भोपळी मिरची घालून परता.
३. २ टेबलस्पून सोया सॉस, अजिनोमोटो, मीठ,मिरपूड, विनेगर घाला. भाज्या ३-४ मिनिटे परतून घ्या. भोपळी मिरची अर्धवट शिजे पर्यंत परता.
४. पनीरचे तुकडे घालून परता.
५. उरलेल्या कॉर्नफ्लोरमध्ये १/२ कप पाणी, ४-५ टेबलस्पून सोया सॉस,२ चिमुट मीठ, घालून मिश्रण एकजीव करा. आणि उकळायला ठेवा. उकळी आली कि सॉस जाडसर होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा. सॉस जाड झाला कि पनीर आणि भाज्यांवर ओता.वरून कांद्याची पात घाला आणि एकदा परतून लगेचServe करा.


________________________________________________________________________________


Servings: 4 persons


Ingredients:
200 gram fresh paneer
1 cup sliced onion
1 cup sliced capsicum (green pepper)
6-7 garlic cloves
2 green chilies slice lengthways in half and remove the seeds.
1 tspn vinegar
¼ tspn black pepper
¼ cup dark Soya sauce
3 tbspn corn flour/ corn starch
Salt to taste
1 pinch MSG (ajinomoto)
Oil


Method:
1. Cut paneer into 1”x1” small cubes. In a bowl take 2 tbspn of cornflour. Add 2 pinch of salt and ¼ cup of water. Mix well to make a thick batter. Dip paneer cubes in it and shallow fry them on medium heat till golden brown.
2. Heat oil in a wok (kadhai) and sauté chopped garlic for a minute. Add onion, chillies and capsicum. Stir till half cooked.
3. Add 2 tbspn of soya sauce, MSG, salt black pepper and vinegar. Stir for a minute.
4. Add paneer cubes and stir gently for few seconds.

5. For making sauce- Add ½ cup of water to remaining corn flour. Add 4-5 tbspn soya sauce,2 pinch of salt and mix well. Bring it to boil. Stir continuously till sauce gets thick and nice dark brown in colour.
6. Pour sauce over paneer. Garnish it with chopped spring onion and then serve hot.

No comments:

Post a Comment