वडिल दिवसभर काम करुन थकून भागुन रात्री ९.३०
ला घरी येतात.
त्यांची आतुरतेने वाट बघणारा ५ वर्षाचा मुलगा दार
उघडतो.

मुलगा: मी तुम्हाला एक प्रश्र्न विचारु का?

वडिल: हो

मुलगा: बाबा, तुम्ही तासाला किती पैसे मिळवता?

वडिल: तुला काय करायचय

मुलगा: प्लिज सांगाना

वडिल: रु.500 तासाला

मुलगा: बाबा मला २५० रु. उसने देता का?

वडिल रागाने मुलाला ओरडले व म्हणाले जा झोप जा.

मुलगा बेडरुम मध्ये गेला व दार लाऊन घेतले.

काही वेळाने वडिलांचा राग शांत झाल्यावर ते
मुलाच्या खोलीत गेले व रागावल्याबद्दल
मुलाला साँरी म्हणाले व त्यानी त्याला २५० रु. दिले व
म्हणाले हे तुला घे व काय ते कर.

मुलगा: थँक यु
त्यानंतर त्या मुलाने आपल्या मनी बाँक्स उघडला व
तो त्यातील पैसे मोजू लागला व नंतर
म्हणाला आता माझ्याकडे रु.५०० जमा झाले आहेत.

मला तुमचा एक तास विकत देता काय.
प्लीज उद्या एक तास लवकर याल काय?
मला तुमच्या बरोबर जेवायचे आहे.

बापाने मुलाला गहिवरुन कवेत घेतले.
पुढचे सारे तुम्ही इमँजीन करा.

तुम्ही सारे तरुण पैसे मिळवण्यासाठी फार कष्ट करता,

पण हे विसरु नका कि त्यांच्यासाठी सुध्दा थोडा वेळ
द्या जे तुमच्यावर जीव लावत आहेत, जिवाला जीव
देण्यास तयार आहेत.

जर उद्या आपण मेलो तर ज्या कंपनीसाठी आपण
मरेस्तोवर काम करतो ती कंपनी काही दिवसातच
आपल्या जागी दुस-याची नेमणूक सहजपणे करेल.

पण

जे कुटुंबीय व मित्र तुमच्यावर जिवापाड प्रेम करतात
त्याना मात्र तुमची उणीव कायमचीच वाटेल.

जरा विचार करा आपण
आपल्या आप्तांपेक्षा कामालाच जास्त महत्व तर देत
नाहीना,
नाहीतर शेवटी आपले कोणीच नसते

No comments:

Post a Comment