History, science

इतिहास सांगतो की काल सुख होतं !

विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल!

पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे !!

Raam

मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थापणे केलेले काम  कधीही व्यर्थ  जात नाहीत.

Filling

अंघोळ से डर नही लगता साहब...
अंघोळ के बाद जो गार हवा आती है,
उस्से लगता है... 
Filing -- लय गारठल्यावानी....

Job.....

:  एक कोंकण के लड़के को जॉब नही मिली
तो उसने क्लिनिक खोला और बाहर लिखा
तीन सौ रूपये मे ईलाज  करवाये
ईलाज नही हुआ तो एक हजार रूपये वापिस....

एक पंडित  ने सोचा कि एक हजार रूपये कमाने का अच्छा मौका है
वो क्लिनिक पर गया
और बोला
मुझे किसी भी चीज का स्वाद नही आता ।

कोंकण का लड़का  ;

बॉक्स नं.२२ से दवा निकालो
और ३ बूँद पिलाओ
नर्स ने पिला दी

पंडित : ये तो पेट्रोल है ।

कोंकण का लड़का  :

मुबारक हो आपको टेस्ट महसूस हो गया

लाओ तीन सौ रूपये

पंडित  को गुस्सा आ गया

कुछ दिन बाद फिर वापिस गया

पुराने पैसे वसूलने

पंडित।  :साहब मेरी याददास्त

कमजोर हो गई है ।

कोंकण का लड़का  :

: बॉक्स नं. २२ से दवा निकालो
और ३ बूँद पिलाओ

पंडित : लेकिन वो दवा तो जुबान
की टेस्ट के लिए है

कोंकण का लड़का  :

  ये लो तुम्हारी याददास्त भी वापस
आ गई

लाओ तीन सौ रुपए।

इस बार पंडित गुस्से में गया

-मेरी नजर कम हो गई है

कोंकण का लड़का  :

इसकी दवाई मेरे पास नहीं है।

लो एक हजार रुपये।

पंडित  -यह तो सौ का नोट है।

कोंकण का लड़का  :

आ गई नजर।
ला तीन सौ रुपये।
😜😄😄😄........ East aur West..  कोंकण waale is the Best...
या कोंकण आपलाच असा

अगर कोंकण के हो
तो इसे आगे भेजते रहो

टिप्पणी →कोंकणतआल्यावर आपला शाहाणपणा चालवू नका येथे आधीपासून अतिशाहणे लोग राहतात
😎😎😎😎😎😎😎😎😎

New calender...

नवीन कैलेंडर आल्यावर आपल्या पोरांकडून सर्वात प्रथम पाहनारी गोष्ट




















आपला बाप्पा कधी येतोय🙏🏻

Asech bolata bolata

1) मनावरच्या ओझ्याला.
किती ओझं ते मनावर, कसलकसल्या आठवणींचं, कुणी जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या अपमानांचं. जमलेल्या गोष्टींचं, पूर्णच न झालेल्या अपेक्षांचं. अपयशाचं आणि यशाचंही! इतकं जड होतं मन की, त्याला नवीन काही सुचूच नये, जरा जागा मिळाली की बुळूबुळू करत एकेक जुन्याच गोष्टी बाहेर येऊन चावू लागतात. नको ते ओझं आता नव्या वर्षात जाताना.
सरळ रिकाम्या मनानं, को:या पाटीनं नवं काहीतरी घडवू. जुनं ओझंच नको कसलंच, सुखाचंही.दु:खाचंही!
जरा वाटू दे ना हलकं, मलाही, मनालाही!

2) नको नको ते आकडे.
पाच वर्षापूर्वी एवढं होतं वजन, आता एवढं आहे. मैत्रिणीचं एवढं, माझं तेवढं आहे. पोटाचा घेर, कंबरेचा घेर यांचे आकडे. विसरसलेल्या वाढदिवसांचे, विसरुन जावेत अशा फोन नंबर्सचे, स्वत:च्या न वाढलेल्या आणि इतरांच्या वाढलेल्या पगारांचे, कसकसल्या इएमआयचे. हे सारे आकडे फेर धरुन नाचतात अािण मामाचं पत्र हरवलं खेळल्यासारखे सरळ आपल्याभोवती गोल गोल फिरतात. दुसरं काहीच सुचू देत नाहीत. जरा विसरुन जाता येतील का हे आकडे? वाढलं ते वाढो, घटलं ते घटो.पण जरा आकडय़ांच्या जंजाळातून तर सुटू. मन मोकळं करू.

3) आळस, किती तो!
मान्यच करु ना की आहोत आपण आळशी, जरा शिस्त नाही स्वत:ला. पहाटे पाचला उठू असं गेले दहावर्ष ठरवतोय पण नाही जमत. ना व्यायाम जमतो, ना वेळ पाळणं, ना डेडलाईन सांभाळणं ना वेळेवर कुठल्या गोष्टी करणं. यासा:याला जबाबदार कोण? तर आपला आळस. त्या आळसाला एकदाचा निरोपाचा नारळ देऊ. जरा झडझडून उठत कामाला लागूच यंदा.

4) जुनंच किती गिरवत राहू.?
यश  मिळालं म्हणून काय झालं, जुनंच किती दिवस गिरवायचं. तेच ते किती काळ करायचं. जे जमतं तेच करत रहायच्या आणि सेफ प्ले करायच्या या जिलबीपाडू वृत्तीलाही निरोप. कशाला तेच ते करायचं. नवीन पाहू की करू, नाहीच जमलं तर अनुभव तरी मिळेल. पण त्याच त्या रेघोटय़ा नको आता.

5) ‘डर’ण्याचं काय?

सतत भीती वाटते. उद्याची, कालची, आजची, माणसांची, अपयशाची, खडय़ात पडायची, वाईट होण्याची, साडेसातीची, पत्रिकेतल्या ग्रहांची. डर डरके जिएंगे तो क्या खाक जिऐंगे? उद्या जे होईल ते होईल, पण वाईटच होईल या डरण्याला आता बाय म्हणूच.

6) आठवणींत कैद

आठवणी सुख देतात हे खरं, पण किती आठवायचं? जरा विसरायला शिकू. सततच्या त्या आठवणी, चांगल्या वाईट माणसांच्या, त्यांच्या बरोबर जगल्या क्षणांच्या,त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या आणि अपेक्षाभंगाच्याही.
त्या आठवणींचं अकाऊण्ट डिलीट करून टाकता येतील.


7) डाचणारे अनुभव.
एकदाच येतात वाईट अनुभव, पण ते डाचत राहतात. छळत राहतात. सतत. कायम. जरा खपली निघाली की भळभळ रक्त वाहतंच. एकदाच आलेले अनुभव आपल्याभोवतीच रेंगाळतात. एकदाच झालेले अपमान सतत सलत राहतात. हे डाचणारे अनुभव जगू देत नाहीत, त्यांचं एकदा विसर्जन केलेलं बरं. म्हणजे जरा नव्या, सुखाच्या अनुभवांना तरी जागा होईल..



8) छळकुटी माणसं.
काही माणसं छळकुटी. सतत छळतात. आता तर ऑनलाईन जगातही छळतात. पण आपण त्यांना सोडत नाही, त्यांना जा म्हणत नाही किंवा ढकलून बाहेर काढत नाही आयुष्यातून. नातं टिकवायसाठी सारे प्रय} करू. जीवापाड प्रेम देऊ, पण नाहीच जमलं तर छळकूटय़ा माणसांना आपलं आयुष्य का नासवू द्यायचं?


9) आभासी आनंद? कशाला?

किती ते आभासी आनंद? सतत ऑनलाईन असण्याचे आणि लाईक्स, कमेण्टमधे आपलं कर्तृत्व जोखण्याचे. आभासी मित्रंचे? ते आभासी, खोटे आनंद वजा होत जरा प्रेमाची माणसं, त्यांचा सहवास, खरेखुरे आनंदाचे क्षण येऊदेत वाटय़ाला,पण त्यासाठी ऑनलाईन जगाला थोडा निरोप द्यावा लागेल.


10) लोक काय म्हणतील?
हे तीन शब्द, विसरुन गेलेले बरे. काही करायच्या आतच, लोक काय म्हणतील हा विचार येतो, या तीन शब्दांनाच निरोप दिला तर काहीतरी वेगळं, आपल्या आनंदाचं घडू शकेल , लोक काही का म्हणोनात मग!

Mastani dialogue in Bajirao Mastani

Mastani चा डायलोग -किस की तलवार पे सर रखु बता दो मुझे
इश्क करना अगर खता है तो सजा दो मुझे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवनार्या पोरी
घरी लफडं पकडलं की म्हणतात "पप्पा हाच माझ्या मागे लागला होता" .
😉😉😂😂😝😜😜

Nice lines ever

         कुणी चांगले म्हणावे म्हणून
                         काम करू नका ,
        आपण करीत असलेल्या कामाने
        अनेकांचे भले होणार असल्यास
                 ते काम सोडूच नका.
     
             जर आपला हेतुच शुध्द आणि
                 प्रामाणिक असेल तर...
       आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
            टीकेला काहीच महत्व नसते.

                 चांगल्या कर्मांची फळे
                  चांगलीच असतात.

              मुखातून गेलेला राम आणि
               निस्वार्थापणे केलेले काम
              कधीही व्यर्थ  जात नाहीत."       

गणेशगुळे श्रीगणेश....!!!

 गणेशगुळे श्रीगणेश....!!!

गणेशगुळे रनपार बंदरासमोरील डोंगर व मुसाकाझी बंदराकडे जाणारा डोंगर या दोन डोंगरांच्या मध्यभागी समुद्रकिनारी वसले आहे. हे गाव रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर आहे. श्रीगणेशाच्या वास्तव्यामुळेच या गावाला गणेशगुळे हे नाव पडले. गणपतीपुळेप्रमाणेच गणेशगुळे हे गणेशाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर डोंगरावर बांधलेले आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, ते आजही चांगल्या स्थितीत आहे. मंदिराचा चौथरा डोंगराच्या पाश्र्वभूमीवर बांधलेला असून, तो सुमारे ३५ फूट उंच आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. पुढील बाजूच्या उजव्या दालनालगतचे दार पूर्णपणे बंद आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजे श्रीगणेश असे मानले जाते. या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते - पावसचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर दशग्रंथी ब्राह्मण होते. ते गणेशभक्त होते. त्यांना पोटशुळाचा विकार जडला. ते गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले; परंतु वाटेतच इतक्या असह्य वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे पाऊल टाकता येईना. त्यामुळे ते झुडपात पडून राहिले. त्यांनी गणेश अनुष्ठानाला सुरुवात केली. त्या ध्यानस्थ अवस्थेत २१व्या दिवशी श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला. ‘माझे जेथे अवशेषात्मक वास्तव्य आहे, तेथे तू माझे मंदिर बांध, तुला याकामी सातारचे शाहूमहाराज मदत करतील. तू व्याधिमुक्त होशील’, या दृष्टांताबरोबरच श्रीगणेशाने सातारच्या शाहूमहाराजांनांही दृष्टांत दिला. त्याप्रमाणे आर्थिक मदत घेऊन महाराजांकडून त्यांचा दूत आला. चिपळूणकरांचा पोटशूळ श्रीकृपेने बरा झाला, ही वार्ता वाऱ्यासारखी गावात व पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे हा गणपती व्याधिग्रस्त व दु:खी पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्ध पावला. श्रीगणेशाच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडत असे. एकेदिवशी हे पाणी पडणे बंद झाले. त्याच दिवशी या गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले असे सांगितले जाते. याची साक्ष म्हणून तेथून दीड किमीवर असलेल्या पावस मार्गावरील डोंगरावर श्रीगजाननाच्या एका पायाचा ठसा उमटलेला आहे असे मानले जाते. हे मंदिर एका बाजूला असून निसर्गाच्या सान्निध्यात असून येथील वातावरण हे प्रसन्न, शांत असल्याने येथे अनेक भाविक श्रीगणेशाच्या दर्शनासाठी येतात...!!!
गणपतीचे हे स्थान पावस या गावापासुन साधारण २-३ किमी अंतरावर एका डोंगरावर वसले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिळा असल्याने हे द्वार बंद केले गेले आणि त्या शिळेलाच श्रीगणेश मानून तिची पूजा केली जाते. अलिकडेच या शिळेवर श्रीगणेशाकृती प्रकट झाली असल्याणे "गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला आणि पुन्हा प्रकट झाला" असे मानले जाते. गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे. जवळच समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनार्‍यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, मंदिर आजपण चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
रत्नागिरी-पावस अंतर साधारण १८-२० किमी
पावस-गणेशगुळे अंतर साधारण २-३ किमी

मिरची असते तिखट

साखर असते गोड । मिरची असते तिखट
… रावांचे नाव घेते आडनावा सकट