Showing posts with label Happy Rakshabandhan. Show all posts
Showing posts with label Happy Rakshabandhan. Show all posts

काय विचार करतोय भाऊराया?
काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे , नको वस्तु थेट!
क्षणभर विसावायला माहेर दे
हीच खरी भेट!!

भाऊबिजेला तुला बोलावते देऊन आग्रहाचं निमंत्रण...
राखीपौर्णिमेचं देशील का तू आमंत्रण?
आई वडिलांची खुशाली अन
तुझ्या संसाराच सुख पाहून
भरेल माझे पोट!
माहेरपण म्हणजे प्रत्येक स्त्रीची ओढ़!!

आपुलकीचं बोलावणं करशील का ग वहिनी?
बहिण भावाच्या नात्यातला
रेशमी धागा जपशील ना ग वहिनी?
नात्यांची भिस्त आता तुज़वरच आहे!
माझ्यासारखी तू देखील एक स्त्रीच आहेस!!

प्रेमाचा हिस्सा आणि मायेचा वाटा द्या ना!
तुम्ही माझ्याकडे, मी तुमच्याकड़े येत राहावे, एवढा लोभ असु द्या ना!!

लग्न करून मी सासरी गेले,
तरी नाती तीच आहेत!
डोळे बंद केले अन्  सारं लहानपण समोरून गेलं !!

काय विचार करतोय भाऊराया?
काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे , नको वस्तु थेट!
क्षणभर विसावायला माहेर दे
हीच खरी भेट!!
#Marathikhichadi #Marathikhichdi #Raksha_Bandhan_Special #rakshabandhan

।।बहिण।।

        ।। मायेचं साजुक तुप
            आईचं दुसरं रूप।।

       ।।  काळजी रूपी धाक
           प्रेमळ तिची हाक।।

        ।। कधी बचावाची ढाल
      कधी मायेची उबदार शाल।।

      ।। ममतेचं रान ओलांचिंब
   पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

     ।। दुःखाच्या डोहावरील
           आधाराचा सेतू।।

        ।। निरपेक्ष प्रेमामागे
           ना कुठला हेतू।।

        ।।कधी मन धरणारी ,
     तर कधी कान धरणारी.।।

    ।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

        ।।बहिणीचा रुसवा जणु,
          खेळ उन-सावलीचा.।।

       ।।भरलेले डोळे पुसाया
      आधार माय- माऊलीचा.।।

    ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
          या नात्यात ओढ आहे.।।

       ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
             चिरंतन गोड आहे.।।

    ।।भरलेलं आभाळ रितं कराया
         तिचीच ओंजळ पुढे येई .।।

      ।।जागा जननीची भरुन 
    काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।

       ।।निर्मिली देवाने आई नंतर बहिण.।

♥ देव पूर्ण जगाची काळजी
घेवू शकत नाही म्हणून
त्याने प्रत्येक घरात आई
दिली असावी,
त्याचप्रमाणे आई आपल्या
जीवनाच्या प्रत्येक भागाची
काळजी घेवू शकत नाही
म्हणून तिने आपल्याला
बहिण दिली असावी ♥
happy rakshabandhan

राखी बाधूंन हातात
बहीन ओवळे भावाला..
भरूण साखर तोंडात
जीव लावेल भावाला.
निराल्या मायेचा झरा
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपने
शुभेच्छा भहीन भावाला!!!!!
राखी पोर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा......
रक्षाबंधनाची भावाबहिणीला शब्द भेट

आपल्या बरोबरीची
आपल्याच वयाची
आपल्या आईचे परमेश्वराने निर्माण केलेलं दुसरं रुप
म्हणजे बहिण...
रक्ताने नसले तरी प्रेमाने जोडता येणारे परमपवित्र नाते म्हणजे भाऊ बहिण...
भाऊ म्हणजे शक्ती
बहिण म्हणजे भक्ती
भाऊ म्हणजे कर्तव्य
बहिण म्हणजे वात्सल्य
असे हे नाते...
यासाठी एकाच आईपोटी जन्माला यायची गरज नाही.
किंवा ते रक्ताच असावं असही नाही.
रक्ताची नाती कदाचित स्वार्थासाठी तुटतील पण मनाची नाती कायम टिकतात
आशा या नात्याला मानाचा मुजरा.


Rakshabandhan love

रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा...
आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता...