Showing posts with label आरोग्यासाठी Health Tips. Show all posts
Showing posts with label आरोग्यासाठी Health Tips. Show all posts

Health Tips

*डॉ.स्वागत तोडकर,* कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स...
👇👇👇👇👇👇👇👇👇

१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - *सर्दी, खोकला, ताप येत नाही.*

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर *लकवा (पॅरालीसीस)* येत नाही.

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर *मुखदुर्गंधी* निघून जाते व *अपचन* होत नाही.

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर *हार्ट अटॅक* येत नाही.

५) *स्मरण शक्ती* साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर *कॅन्सर* होत नाही.

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे - *हाडे मजबूत होतात.*

९) *ऐकू न येणे*- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

१0) *शरीरशुद्धी साठी* वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे - हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) *जुलाबासाठी*- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) *नाकाचे हाड वाढणे*- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

१३) *मुळव्याधासाठी*- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.

१४ ) वर्षातून फक्त एकदा *शुद्ध संजीवनी* १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी *थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.*

15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. *कातडी गोल्डन रंगाची होते.*

१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

१८) *पोटाच्या आजारावर -* वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

१९) *कानाच्या पडद्याला भोक -* उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

२०) *हात पायाला घाम येणे -* सुपारीचे एक खांड - सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे.

२१) *लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर*- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्षातून ४ वेळा ) केले तर *हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.*

         *----डॉ.स्वागत तोडकर*
          चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
         चिकित्सालय,कोल्हापूर.

Trek

हे "ट्रेक" म्हणजे नक्की काय  ?
कधी कधी आपल्याच
नातेवाईकानपैकी अथवा मित्रपरिवारा पैकी कुणीतरी बोलून
जातं. ज्याचा ट्रेक विषयी काहीही संबंध नसतो .
काय रे , नुसतेच आपले डोंगर चढता उतरता ?
काय मिळत त्यातून तुम्हाला ?उगाच वेळ वाया , पैसे वाया ?
नीट घरी बसा ना ?
एक दिवस मिळतो कुठे आठवड्यातून सुट्टीचा ..तो देखील
असा उनाडायला घालवता . ?
दर शनिवार रविवार बघाव तर हा बाहेर ? कुठे तर ट्रेक
ला म्हणे ? काय मिळत त्यातून ..देव जाणे ?
असे वाक्य आपल्या आप्त मंडळीकडून हमखास
ऐकायला मिळतात .
अन आपण ते वाक्य ह्या काणाकडून त्या काणाकडे
अगदी सहजतेने भिरकावून मोकळे हि होतो .
कारण त्यांना सांगून समजावून हि काहीहि उपयोग नसतो. पण
समजणारे समजतात .
आपला मुलगा /मुलगी इतर मुलांसारखा वाईट मार्गाला तर
नाही ना हे त्यांना पटलेले असतं .
शिवरायांबद्दल प्रेम अन आदर हा असतोच त्यांच्यात...
तर ट्रेक म्हणजे नक्की काय?
ट्रेक म्हणजे नुसतंच डोंगर चढणं - उतरणं नाही .
ट्रेक म्हणजेच नुसतंच काही मौज मजा हि नाही .
ट्रेक म्हणजे मनाने मनाला दिलेली हाक
ट्रेक म्हणजे शिवतेजाची प्रेरणादायी आग
ट्रेक म्हणजे आडवाटेची नुसतीच पायपीट न्हवे
ट्रेक म्हणजे निथळत्या घामाचे थकवे थेंब न्हवे
ट्रेक म्हणजे चैतन्याची नवी उमेदी लाट
ट्रेक म्हणजे अभिमानाची सह्याद्रीची साद
ट्रेक म्हणजे नुसतंच सैरवैर भटकण - पाहाणं न्हवे
ट्रेक म्हणजेच आभाळाची व्याप्ती मोजणं हि न्हवे
ट्रेक म्हणजे गड-किल्ले अन शौर्याचा इतिहास
ट्रेक म्हणजे चिराचीरातुनी घूमघुमलेला आवाज
इतकंच न्हवे ..
तर ट्रेक म्हणजे निसर्गातल्या हरएक घटकांशी
अगदी मुक्तपणे केलेला संवाद .
ट्रेक म्हणजे साऱ्यांशी जुळवून घेतलेला हर एक श्वास...
ट्रेक म्हणजे गती
ट्रेक म्हणजे योग्य दिशा .
ट्रेक म्हणजे जीवनाची शिस्तबद्ध हालचाल
ट्रेक म्हणजे प्रेम
जीवनावर , जगण्यावर , इथल्या मांणसा माणसांवर
माणुसकीवर ...........
ट्रेक म्हणजे .........................बरंच काही .....
खेड्या खेड्यातुनी पाहिलेली
जीवनाची विविधरंगी रहाट गाडी..
असा हा ट्रेक करतेवेळी सृष्टी सौंदर्याची ....विविध
मनवेडी रूपं पाहता येतात. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

महिन्यातुन एकदा तरी गड-किल्ले-दुर्गावारी करा,
रोग आणि आजारांतुन बाहेर पडा.
दुर्ग सर करणा-या मावळ्यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत.
आधुनिक वैद्यकशास्त्रात याचे संदर्भ आढळत नसतील असे समजुन याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः एकदा खात्री करा. मग तुम्ही स्वतःच या गोष्टीचा प्रचार कराल.
● श्वसन - गडावर खालुन वर चढताना श्वासांची प्रक्रिया जलद होते,
त्यामुळे पुर्ण श्वासोच्छ्वासाची क्रिया घडते.
श्वासोच्छ्वासाच्या क्रियेला चालना मिळते.
● रक्तप्रवाह - श्वासोच्छ्वास जलद झाल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, रक्ताभिसरणाची क्रिया जलद होते.
शिरांतील, नसांतील ब्लॉकेज निघतात.
महिन्याला दुर्गाची वारी
ब्लड-प्रेशरचा आजार दुर करी..!
● गुडघे - पायांवर ताण येतो,
सर्व स्नायु उत्तेजित होतात.
● छाती - वर चढताना दम भरल्याने फुफ्फुसे पुर्ण क्षमतेएवढी हवा आत घेतात आणि बाहेर सोडतात.
● पोट - गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द चालताना डीहाइड्रेशन मुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते, पण गडावर गेल्यावर झरा, तळी, पावसाचे अतिशुद्ध पाणी पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते,
दैनंदिन दुषित पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार दुर व्हायला हातभार लागतो.
शरीरावरील चरबी कमी होते.
● मानसिक आजार - रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण-तणाव हे गडावरील मनाला प्रसन्न करणारे वातावरण, निसर्गाचे मुक्तहस्त चित्रण, निसर्गाचे रंग-रुप पाहुन दुर होतात.
गडावरील सौंदर्य पाहुन भारलेले मन घेऊनच खाली आल्याशिवाय आपण राहत नाही.
मनाची प्रसन्नता वाढते आणि ताण-तणाव निवळायला मदत होते.
चला मग दुर्गांच्या वाटेवर..!!

Save Forts Save Heritage.🙏

Side Effects

😄😄😄😄😄😄😄😄😄
तेलात तळलेले समोसे खाणे लोकांना आवडतं ....
अशुद्ध पाण्याने भरलेली पाणीपुरी खातात ....
फुटपाथ वर धूळ उडलेली भजीपाव खातात ....
कोक आणि पेप्सीचे विष पैसे खर्च करून पोटात उतरवतात ....
सिगारेट फुंकतात, तंबाखू आणि मावा खाउन पिचकारी मारतात  दारू तर पाण्यासारखी पितात  ....
पण डॉक्टरांनी औषधे लिहून दिली कि विचारतात, साहेब काही साईड ईफेक्ट तर नाही ना???
🤣🤣🤣🤣🤣

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


तुम्ही मांसाहार का करता??*
१)शक्ती साठी?
-- पण जमिनीवरचा सगळ्यात शक्तीशाली प्राणी हत्ती शाकाहारी आहे.
तो कधी ताकदीसाठी मांस भक्षण करित नाही!!
शेतकय्रांचा सोबत राबराब राबणारा बैल कधी मांसाहार करतो का?
अश्वशक्ती(होर्सपाँवर) ने कुठल्याही यंत्राची शक्ती मोजल्या जाते अश्व-घोडा कधी मांसाहार करतो का?
मग मांसाहार केल्यानेच शक्ती मिळते असे कसे म्हणता येईल?
२)जीभेवरच्या चवीसाठी??
*मांसाला कसली आलीय चव.*
चव सगळी त्यातल्या अष्टपैलू मसाल्यांना.
तेच मसाले वापरले तर वांग्या बटाट्याच्या भाजीलाही येईलच की चव!
३)जीवनसत्वांसाठी??
--मांसापेक्षा हिरव्या पालेभाज्या आणि सूकामेव्यात कितीतरी अधिक प्रथिने जीवनसत्वे अन् पौष्टिक पदार्थ असतात.हो ना?
मग मांसाहार कशासाठी?
खरे तर निसर्गाने
ना आपले दात मांस चावण्यायोग्य बनवलेत
ना आतडे मांस पचविण्या योग्य बनवलेत.
मानवी शरीरचनाच मूलत:
शाकाहार पूरक अशीच आहे.
असे नसते तर छोट्या बालकाला भाताच्या पेजेऐवजी मांसाचे तुकडे कुस्करून द्यायला सांगितले असते डॉक्टरांनी
याचा अर्थच हा आहे
की
माणूस नैसर्गिक मांसाहारी प्राणी नाही!
मग
का बळेच रक्त चाटवायचं जिभेला?
वैद्यकशास्त्र सांगते,मांसाहारातून पचनसंस्थेचे विकार जडतात.
मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते ज्यातून पुढे अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.
अध्यात्मशास्त्र सांगते,
मांसाहारामुळे काम,क्रोध,मद,मत्सर इ.
दुर्गुण माणसात प्रबळ होतात.
आणी असुरी प्रवृत्ती वाढते.
असं म्हणतात
वानरापासून मानव ऊत्क्रांत झाला.
वानर आजही शाकाहारी आहे.
ऊत्क्रांतीच्या प्रवासात
वानरापासून नर होताना
माणूस जानवर
कसा झाला कुणास ठाऊक?
पण माणसाचे पोट म्हणजे जनावरांची दफनभूमी नव्हे
एवढे मात्र माणसाने लक्षात घेतले पाहीजे!!!
*शाकाहारी व्हा!!!*
तनाची ,मनाची अन् आत्म्याची
पवित्रता वाढवा .🙏🏻

सकाळी उठून नारळपाणी पिण्याचे हे आहेत ५ फायदे

नारळपाण्यामध्ये अनेक लाभकारक फायदे असतात. आजारी माणसाला नारळपाणी दिले जाते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. तसेच रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. मात्र नारळपाणी पिण्याची योग्य वेळ कधी याबाबत अनेकदा लोकांमध्ये दुविधा असते. काहींचे म्हणणे असते की नारळपाणी सकाळी प्यावे तर काही म्हणतात नारळपाणी संध्याकाळी पिणे योग्य असते. मात्र तज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळच्या वेळेस नारळपाणी पिणे शरीरासाठी लाभदायक असते. सकाळी नारळपाणी प्यायल्यास दिवसभर शरीराला स्फूर्ती मिळते.
सकाळी उठून नारळपाणी पिण्याचे हे आहेत फायदे
थॉयरॉईड हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी नारळपाणी खूप उपयोगी ठरते.
किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नारळपाण्याचे सेवन करणे चांगले असते. तसेच मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यताही कमी होते.
नारळपाण्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे रोगांपासून बचाव होतो.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय तर नारळपाणी पिण्याने मोठा फायदा होतो. यात कॅलरीजची मात्रा कमी असते. नारळपाणी प्यायल्याने बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे सतत खाण्याचीही गरज भासत नाही.
नारळपाणी प्यायल्याने त्वचेलाही फायदा होतो. त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो