Jidd

ना कुणाशी स्पर्धा असावी...
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा...
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी...!

Aathavan

आठवण येणे
       'आणि'
आठवण काढणे
यात खुप फरक आहे....! आपण आठवण त्यांचीच काढतो,
जे आपले आहेत.........!
         'आणि'
आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात.........! 

Home

जिव्हाळा हा घरचा कळस आहे.
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.   
पैसा हा घरचा पाहुणा आहे.
व्यवस्था ही घराची शोभा आहे.
समाधान हेच घरचे सुख आहे.

Nice Pray

            एक सुंदर प्रार्थना.....

     देवा, मला इतकंच सुख दे की,
      मला आयुष्यभरासाठी पुरेल,
    माझी महती इतकीच असू दे की,
       कुणाचं तरी चांगलं होऊ दे,
नात्यामध्ये इतकी आपुलकी असूदे की,
   जी फक्त प्रेमाने निभावली जातील,
     डोळ्यात इतकी लाज असूदे की,
   थोरामोठ्यांचा मान राखला जाईल,
आयुष्यातील श्वास इतकेच असूदेत की,
कुणाच्यातरी आयुष्याचे भलं करता येईल,
    बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव
म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही.

Aayushya cha Aanand ghya

               वेळ ही एखाद्या वाहत्या
                नदीसारखी असते,
        एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,
      तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
             कधीही परत येत नाही,
              असेच वेळेचेही आहे,
      एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
          म्हणून, आयुष्यातील प्रत्येक
            क्षणाचा आनंद घ्या...!!!

Maitri

कधी आठवण आली
           तर डोळे झाकू नका..
   जर काही गोष्टी नाही आवडल्या
     तर सांगायला उशीर करु नका..
     कधी भेटाल तिथे एक स्माईल
     देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..!!

Nice Sentences

💕एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,💖💖

💕वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,💖

💕इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची
जागाच मिळत नव्हती, 💖
💕वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा
प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात
उडी टाकली,💞
💕 ते झुडूप गुलाबांच्या
फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............💖💖
💕वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,💖
💕शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे
वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात
जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........💖

💕बाहेर काढल्या नंतर काठीला
लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये
वाकून बघितलं,💖
💕तेव्हा तिथे त्याला हसत
असलेल प्रेम दिसलं,💖

💕पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल
होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या
डोळ्यात खुपसली गेली होती ..........💖
💕ते पाहून वेड खूप रडला आणि
त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या
डोळ्यांनी बघशील💖
💕म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी
तुझ्या बरोबर राहीन .............💖
💖तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे
आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे.
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नका..
🐾🌸
भावनांचं मोल जाणा ,
मोठेपणात हरवू नका.
आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं,
🐾🌸
जन्मभर पुरेल इतकं भरून
प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे
करुन पहा,
🐾🌸
कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
🐾🌸
समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
🐾🌸
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
🌸🐾 🌸.
शब्दांना  भावरूप  देते,
. . .  तेच  खरे  पत्र ॥
नात्यांना  जोडून  ठेवते,
      तेच  खरे  गोत्र ॥
नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,
       खरे  नेत्र ॥
दूर  असूनही  दुरावत  नाही,
       तेच  खरे  मित्र. ॥॥💕❤️💘👏

Bhikaji

बाप्पा ; काय मागायचे ते माग, आज मी प्रसन्न होऊन तुला वर देतो.

भिकाजी ; बाप्पा नोटांनी भरलेली तिजोरी, थंड हवेची खोली आणि आरामाची नोकरी.

बाप्पा ; तथास्तू...।

भिकाजी आता "एटीएम" मध्ये शिपाई आहे.
😆😂😅😝😛😊

Kokanchi Manase

नरकात खूप सारे लोक मजा करत होते.
.
.
.
देवाने
यमराजाला विचारले :-"हि लोकं
नरकात पण
मजा करत बसली आहेत"…
.
.
.
यमराज :- कोकणची आहेत सगळी…!
साली कुठेही टाका तिथे सेट होऊन
जातात.!!!
आली लहर, केला कहर, तोच खरा,
" कोकणकर "... @
माणसाने कोकणकर असावे....
कोल्हापूरी तर चपला पण असतात..
सोलापूरी तर चादरी पण असतात..
नागपुरची तर संत्री सुद्धा असते..
नगराचा तर ऊस सुद्धा असतो..
पण नजरेला नजर मिळवायला " कोकणकराच " काळीज लागतं...
बदलत्या जीवनातील आपुलकी म्हणजे
" कोकणकर "
माणसाच्या मनातील माणुसकी म्हणजे "कोकणकर"
राकट मनाचे प्रेमळ अन् दिलदार म्हणजे
" कोकणकर"
दादागिरी मधे काटा किर्रर्
" कोकणकर"
गावरान शिव्यांतील रांगड प्रेम म्हणजे "कोकणकर"
राजकारणातील खुन्नस गेम म्हणजे "कोकणकर"
मनानं शरीरानं राजेशाही थाट म्हणजे
" कोकणकर "
सगळ्या जगाला हेवा वाटावा असे माझे
" कोकणकर "
आम्ही कोकणकर

Positive Thoughts

आर्थर अँश हा इटली मधील अतिशय
नावाजलेला टेनिसपटू होता.
१९८३ मध्ये
त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली.
त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे
त्याला कैन्सरची लागण झाली.
त्यानंतर
त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.
त्यातील एका पञात म्हटले होते...
इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?
या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...
५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस
खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक
टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस
सर्किटमध्ये दाखल झाली,
त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम
स्पर्धेसाठी निवडली गेली.
त्यातील फक्त ५० टेनिसपटू
विम्बलडनसाठी
निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे
अंतिम फेरीत पोचले.
त्या दोन
जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक
उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले
नाही की, माझीच निवड
का केलीस ? मग आत्ताच
वेदना होत असताना माझीच निवड का केली,
असे मी देवाला कसे विचारु ?
सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस
बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.

            यशस्वी लोक आपल्या
            निर्णयाने जग बदलतात
             आणि अपयशी लोक
            जगाच्या भीतीने आपले
               निर्णय बदलतात...