💕एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,💖💖
💕वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,💖
💕इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची
जागाच मिळत नव्हती, 💖
💕वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा
प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात
उडी टाकली,💞
💕 ते झुडूप गुलाबांच्या
फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............💖💖
💕वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,💖
💕शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे
वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात
जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........💖
💕बाहेर काढल्या नंतर काठीला
लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये
वाकून बघितलं,💖
💕तेव्हा तिथे त्याला हसत
असलेल प्रेम दिसलं,💖
💕पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल
होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या
डोळ्यात खुपसली गेली होती ..........💖
💕ते पाहून वेड खूप रडला आणि
त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या
डोळ्यांनी बघशील💖
💕म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी
तुझ्या बरोबर राहीन .............💖
💖तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे
आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे.
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नका..
🐾🌸
भावनांचं मोल जाणा ,
मोठेपणात हरवू नका.
आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं,
🐾🌸
जन्मभर पुरेल इतकं भरून
प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे
करुन पहा,
🐾🌸
कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
🐾🌸
समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
🐾🌸
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
🌸🐾 🌸.
शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच,
खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही,
तेच खरे मित्र. ॥॥💕❤️💘👏
No comments:
Post a Comment