चुकतो तो माणूस
चुका सुधारतो तो देवमाणूस

जो कधी चुकतच नाही तो..

बायकोच्या माहेरचा माणूस
😜😜😜😜😜😜😜

10 दिवस DP ( profile) गणपती  ठेवले hote ना..?
.

.

.मग आता  15 दिवस कावळा  ठेवा.😝😜

बाप :- आजपर्यंत तु असं काही काम केलंस का....?
ज्याने माझी मान वर होईल....?
.
.
.
.

मुलगा :- एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती,
विसरले का लगेच... ?😂😆

आज एक वर्षानंतर तिला पाहिले,
अगदी जशी होती तशीच.👌😘
...
...
...
मनाशी ठरउन निश्चय केला
आता दुसरी बघायचिही नाही,
...

....

...
...

...

...
यंदा जुनीच 🌂छत्री वापरायची

गुरूजी : २ मधून २ गेले किती राहिले ?
झम्प्या : काही समजले नाही गुरूजी...
गुरूजी : अरे तुझ्याकडे २ चपात्या आहेत त्यातल्या तू २ चपात्या खाल्ल्यास तर तुझ्याकडे काय उरले ?
झम्प्या : भाजी..

शिक्षक: I LOVE U चा शोध कोणी लावला?
.
विद्यार्थी: चायनाने
.
शिक्षक: कस काय?
.
विद्यार्थी: I Love You याची­
काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही.
चला तो चांद तक.... नही तो शाम तक....
😂😂😂😀😀😜

बायको नव-याला एक SMS पाठवते.....
.
.
*"*आहो, मला ऑफीस मधुन यायला उशीर होणारेय्....
.
मैत्रीणीचा वाढदिवस आहे... पार्टी आवरुन येते....;
.
.
तुम्ही बाळाला जेवायला घालुन, सगळे भांडी घसुन ठेवा.. बाय्.... *"*
.
.
नवरा SMS वाचुन शांत राहिला..
.
लगेच दुसरा मेसेज आला..
.
.
*"*अहो येताना तुम्हाला एक क्वार्टर whiskey आणते. ब्रॅंड कुठला पाहिजे सांगा.. *"*
.
.
# # नवऱ्याने लगेच... मेसेज केला..
.
.
मॅकडोवेल नं १.whiskey आण माझी राणी...
.
*बायको ... अहो, तुम्ही जेवण करुन झोपा...*
*मी काही आणणार नाही.....*
.
*तुम्ही आधीचा मेसेज वाचलात की नाही म्हणुन जाणुन घ्यायचे होते मला.....* 😂😂

एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.

ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,

कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .

कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो ,

पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .

शर्यत सुरु झाली

कुत्रा जोरात धाऊ लागला.

पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली ,

असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले

कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला

तर बघतो

तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते

तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून

निराश झालेला कुत्रा बोलला कि

जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते

तात्पर्य काय
१.आपल्याना विश्वासात घ्या

२.आपल्याना  पुढे जाण्यास सहकार्य  करा,त्याना प्रोत्साहन  द्या

३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील

४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा

           आपली_माणसं_मोठी_करा.💧💧

Employee updates Facebook status - "Ganpati gele gavala...chen padena na amhala"

Boss comments - "Tujhi sutti sampli...udya ye kaamala"
😂😂😂😂😂😂

उंदिरांची टोळी 🔪तलवारी🔪 घेऊन धावत होती,
रस्त्यात वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे?

उंदिर : आईच्या गावात, तिकडे Admin ने गणपती समोरचा मोदक पळवला आणि
नाव आमच्या वर आलंय...
सगळ्या ग्रुपचिच वाट लावतो😀😗😛

माझी मुलगी मोठी झाली.
एके दिवशी सहज म्हणाली,
*'पप्पा मी तुम्हाला कधी रडवलंय का?'*

मी म्हटलं, 'का रे पिल्लू असं का विचारतेस?'

ती : 'काही नाही असंच.'

मी : 'नीट आठवत नाही. पण एकदा '

ती : 'कधी?' तिनं अधिरतेनं विचारलं.

मी म्हणालो, 'तू एक वर्षाची असताना मी तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं. कारण मला बघायचं होतं की, तू काय उचलतेस?
तुझी निवड ठरविणार होती की, मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस.
जसे *पैसे* म्हणजे संपत्ती, *पेन* म्हणजे बुद्धी आणि *खेळणं* म्हणजे आनंद.'

मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.

मला बघायची होती तुझी निवड.

तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.

तू रांगत-रांगत पुढे आलीस.
मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.

माझ्या लक्षातच नाही आलं की,
'या सगळ्यांबरोबर मीसुद्धा असू शकतो.'

ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस.

*खास मुलींच्या पप्पांसाठी.*
खरंच मुलगी पाहिजेच.👍🏻👭👭👭 —

ती :
"तू सकाळी आंघोळ झाली कि आधी काय करतोस...?"

अचानक तिने मला प्रश्न केला...

लग्नाच्या १५ वर्षानंतरच्या सहवासा नंतर आणि माझ्या सगळ्या सवयी माहित असुनहि हा प्रश्न थोड चमत्कारिकच वाटला.
पण,
विचार केला बघुयात ...
बाईसाहेबांचा मुड आज काय आहे ते...

मी उत्तर दिलं :
"सगळ्यात आधी देवाजवळ दिवा लावतो".

त्यावर तिने विचारलं ...
" का...? "
"आपल्या घरात तर वीज आहे ,
शिवाय दिवस आहे तरी देवाला वेगळा दिवा लावायची गरज का भासते...?"

माझ्याकडे ह्या प्रश्नाचं तसं बघायला गेल तर उत्तर नव्हतं .

तरी मी म्हणालो की:
"देवापुढे उभं राहीलं,
निरांजन लावलं की मला मनःशांती मिळते".

त्यावर पुढे जे काही ती बोलली :
ते तुम्हाला आवर्जून शेअर करावस वाटतं...

ती म्हणाली :
कदाचित आत्ता मी जे सांगत आहे ते तुला काहीसं विसंगत वाटेल,
पण समजून घे...

तुला सांगू का,
प्रत्येक माणसाची जातकुळी वेगळी असते.
आपण एखाद्याला बघितल्यावर
किंवा
त्याच्या वागण्यावरून काही विशेष ठोकताळे बांधतो.

काही माणसं काही क्षणात मनाला भावतात
तर
काही कितीही सहवासात राहिली तरी ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही.

मन एक अजीब रसायन आहे.

फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसत.

खूप सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत आणि अहंकाराने युक्त असेल,
तर
ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते.
कारण ,
शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो.
तेच,
व्यक्तीच्या स्वभावात गोडवा, विनयशीलता आणि शालीनता असेल
तर,
त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ते हवहवसं वाटतं.

तू म्हणतोस देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं.

घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्नता देणारा ठरतो.

सहवासातील माणसाचं देखील तसच असतं.

एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं हा काही क्षणांचा खेळ असतो; पण,
खर आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजातच मिळतं.
आयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात.
काही जण तुम्हाला दिपवून टाकतात.
तर,
काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात.

परंतु,
ह्या सगळ्यात खरं प्रेम समईच्या ज्योतीसारखं रहातं.

शांतपणे तेवणार आणि मनाला शांती देणारे...

जगात कुठलीच गोष्ट शाश्वत, निरंतर नसते,
पण
सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं, जगण्याची उमेद देत.

नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच .
आणि
ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याचा पराभव निश्चित होतो.

अंधारल्या खोलीत लावलेलं निरांजन जसं दाही दिशा उजळतं,
खर प्रेमदेखील तुमची अशीच सोबत करतं...

मनाला विश्वास देत जगाने नाकारलं तरी माझं प्रेम पाठीशी नेहमीच ठामपणे उभं राहील.

प्रेम म्हणजे भक्तिचच एक रूप आहे.
ज्याच्यात आर्तता आहे,
पण,
याचना नाही.
आपल्या माणसांसाठी जळताना स्वतःच्या त्रासाची मोजदाद नाही.

साधा विचार करून बघ,
भोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो ते का ?
कारण ,
त्या तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो.

खरं सांगू...!
अस निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं,
ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते, असं मला वाटतं.
पण,
आजकाल असं प्रेम मिळणं ही गोष्ट अशक्य आहे, हे ही मी जाणते...

मी प्रेमाविषयी लिहिते म्हणून तुला सहज सांगितलं...

त्यावर मी प्रसन्न हसलो 😀😀😀

कारण,
प्रेमाची एक वेगळी व्याख्या वेगळ्या शब्दात ऐकायला मिळाली होती...🌹

एक नम्र विनंती, वाचा आणि शेअर करा
दाढी करून झाल्यावर सवयी प्रमाणे  आपण  वापरून झालेले ब्लेड कचर्‍यात टाकतो.
पुर्ण माहिती नसल्याने जवळपास 90% लोक असेच करतात.  यास मी सुध्दा अपवाद नाही.

असे कचर्‍यात टाकलेले ब्लेड हजारो मुक्या प्राण्यांचे बळी ठरण्यास कारणीभूत आहे.

कचराकुंडीत अन्नाच्या शोधात आलेल्या मुक्या प्राण्यांचे घशात हे ब्लेड अडकतात. त्यामुळे त्यांना असहाय्य वेदना होतात आणि त्यामुळे त्याचा बळी जातो.

हे मुक्या प्राणी कोणत्याही मदतीशिवाय त्यांच्या घशात अडकलेले ब्लेड काढण्यास असमर्थ आहेत.

मित्रांनो, असे वापरून झालेले ब्लेड कचर्‍यात न टाकता एक डब्यात भरून ठेवा, जरी तुम्ही रोज दाढी करीत असाल तरी 1kg चा डबा भरण्यासाठी सरासरी 5  वर्षे  लागतील.

जेव्हा तुम्हाला वाटेल की, आता ब्लेडचा डबा भरत आला तर त्यातील ब्लेड जमीनीत गाडावे. 2 ते 3 महीन्यात त्या ब्लेडला गंज लागेल  व ते कोणासही हानी न करता नष्ट होतील.

पटलं तर विचार करा आणि इतरांना विचार करण्यास भाग पाडा.