एक नम्र विनंती, वाचा आणि शेअर करा
दाढी करून झाल्यावर सवयी प्रमाणे  आपण  वापरून झालेले ब्लेड कचर्‍यात टाकतो.
पुर्ण माहिती नसल्याने जवळपास 90% लोक असेच करतात.  यास मी सुध्दा अपवाद नाही.

असे कचर्‍यात टाकलेले ब्लेड हजारो मुक्या प्राण्यांचे बळी ठरण्यास कारणीभूत आहे.

कचराकुंडीत अन्नाच्या शोधात आलेल्या मुक्या प्राण्यांचे घशात हे ब्लेड अडकतात. त्यामुळे त्यांना असहाय्य वेदना होतात आणि त्यामुळे त्याचा बळी जातो.

हे मुक्या प्राणी कोणत्याही मदतीशिवाय त्यांच्या घशात अडकलेले ब्लेड काढण्यास असमर्थ आहेत.

मित्रांनो, असे वापरून झालेले ब्लेड कचर्‍यात न टाकता एक डब्यात भरून ठेवा, जरी तुम्ही रोज दाढी करीत असाल तरी 1kg चा डबा भरण्यासाठी सरासरी 5  वर्षे  लागतील.

जेव्हा तुम्हाला वाटेल की, आता ब्लेडचा डबा भरत आला तर त्यातील ब्लेड जमीनीत गाडावे. 2 ते 3 महीन्यात त्या ब्लेडला गंज लागेल  व ते कोणासही हानी न करता नष्ट होतील.

पटलं तर विचार करा आणि इतरांना विचार करण्यास भाग पाडा.

No comments:

Post a Comment