न बघितलेले महाबळेश्वर

अनवट सातारा 
न बघितलेले महाबळेश्वर 

महाबळेश्वरला जायचंय म्हणालं कि बऱ्याच वेळा जाऊन आलोय, आता अजून काय नवीन बघणार? ते ट्रिप संपल्यावर हे आम्ही बघितलंच नव्हतं, हे ऐकणं खूप सुखद असतं. 
सुखद एवढ्यासाठी कि लोकांची नवीन प्रदेशाची ओळख झालेली असते किंवा एखादं नवीन ठिकाण पाहून झालेलं असतं. 

काल गेलो तेव्हा खूप स्वच्छ वातावरण होते. अगदी पाली, जुन्गटी पासून ते मधु मकरंद गड एकाच फ्रेम मध्ये बघून झाले. मांघरला गेलो तेव्हा तर डाव्या बाजूला मधु मकरंद गड आणि समोर साक्षात प्रतापगड दर्शन देत होता.

अनवट वाटांवरची ठिकाणं ही नुसतं फिरण्यासाठी नसतात तर ती आपल्याला भुतकाळात घेऊन जातात. प्राचीन संस्कृतीची ओळख करून देतात, त्याकाळातील वास्तूशास्त्राची माहिती देतात. खरंतर ही ठिकाणे आपल्याशी बोलत असतात. आपण त्यांना फक्त समजवून घ्यायला हवं. 

सप्तशिवपुरी मधील गाळदेव, भावेश भाटिया यांचे सनराइज कॅण्डल्स, कुष्णामाई मंदिर, शिन शिन गुहा ही ठिकाणे खूप अप्रतिम आहे. महाबळेश्वर मध्ये इतर ठिकाणाहून जो निसर्ग दिसतो तसाच निसर्ग इथल्या प्रत्येक ठिकाणाहून दिसतो. 

महाबळेश्वर म्हणजे निबीड अरण्य. ज्या जंगलानी अफजलखानाला सोडलं नाही ते जंगलं अनुभवायला हवं. त्या शिवाय महाबळेश्वर कळणार कसं? जंगल समृद्ध करणारी वटवाघळे, मधमाश्या ह्यांची वसतिस्थाने बघायलाच हवीत.  

भारतात सर्वात जास्त संख्येने जिथे वटवाघळे राहतात ती शिन शिन गुहा बघायलाच हवी. पण इथे येताना मात्र सुरक्षितता बाळगायला हवी. मधाचे गाव मांघर पण बघायला हवे. मधमाश्या पालन कसे करतात, मध गोळा कसा करतात ते इथे बघायला मिळते.

त्यामुळे एखाद्या ठिकाणी कितीही वेळा गेलो असलो तरी पुन्हा जाताना एखादं तरी न बघितलेलं ठिकाण हुडकून काढून तिथं जायलाच हवं 

#महाबळेश्वर #mahabaleshwar #unseen #satara #dreamtourssatara

गणेशगुळे रत्नागिरी

गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे.

जवळच समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनार्‍यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, मंदिर आजपण चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे....

क्रांतिज्योती विद्यालय (मराठी माध्यम)Movie Review

'क्रांतिज्योती विद्यालय (मराठी माध्यम)' चित्रपट पाहिला. एकदा नव्हे दोनदा. पहिल्यांदा कुटुंबियांसोबत दुसर्‍यांदा चिन्मयी ताईंच्या पुढाकारामुळे कार्यकर्त्या सहकाऱ्यांसोबत! 

गेली १५ - २० वर्ष ज्या गोष्टी आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून सांगतो आहोत, ते या चित्रपटात उत्तमपणे मांडले आहे. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व, समाजाची मराठी शाळांबद्दलची उदासिनता, शिक्षण खात्याचा एकूण कारभार, जबरदस्तीने मराठी शाळांच्या पाडकामामागील बिल्डर लॉबीचा वरचष्मा आणि माजी विद्यार्थ्यांचे आपापल्या शाळांबद्दलचे योगदान या गोष्टींचे चित्रपटात प्रभावी चित्रण आलं आहे.

'एक मराठी शाळा वाचविण्यामागील माजी विद्यार्थ्यांचे प्रामाणिक प्रयत्न' ही या चित्रपटाची एका ओळीतली कथा जी प्रेक्षकांपर्यंत अचूक पोचते. सोबतीला अनेक उपकथा आहेत. सुमन आक्काचं माहेरी न जाणं, पॅटीस खाण्यामागची गोष्ट, सलमाचं अनाथपण, बाळू मामाचं भूत, अंजली दीपची प्रेमकथा इत्यादी. मूळ कथेच्या ओघात त्या त्या वेळी या उपकथा येतात आणि मूळ कथेत विरून जातात. म्हणजे धूमकेतू येतात नी निघून जातात तसं. त्यामुळे मूळ कथेला बाधा पोचत नाही. किंबहुना त्यामुळे चित्रपट अधिक रंजकच होतो. अनेक कलाकारांच्या गोतावळ्यात असलेल्या चित्रपटावर लेखक, दिग्दर्शकाची असलेली पकडच यातून दिसते. 

'स्वर्गात आकाशगंगा' या गाण्याने शाळेतल्या जुन्या आठवणींना दिलेली उजळणी तर 'हाकामारी' या गाण्यातला लोकसंगीताचा बाज त्या त्या वेळी लक्षणीय वाटतो. 'शाळा मराठी माझी शाळा मराठी वं' हे लोकप्रिय झालेलं गाणं सुरुवातीला ऐकलं तेव्हा ते चित्रपटात कुठे, कसं आलं असेल याचा अंदाज येत नव्हता. पण चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा प्लेबॅक म्हणून केलेला वापर आणि त्याचवेळी पडद्यावरील चित्रण मार्मिक आहे.

चित्रपट संपल्यावर नेहमीप्रमाणे नुसती श्रेयनामावली दाखवली असती तरी चाललं असतं कारण चित्रपटातून नेमकं काय म्हणायचं आहे ते तोवर प्रेक्षकांना कळलं होतंच. पण तरीही नावे दाखवताना जी कल्पकता दाखवली आहे त्यामुळे कथेच्या गाभ्याला उच्चप्रतीचे नैतिक अधिष्ठान मिळालं आहे जे खूपच आश्वासक आणि अभिनंदनीय आहे!

आणि हो, शेवटी मराठी शाळा वाचणार हे जरी आपल्याला माहित असलं तरी ज्या सकारात्मक आणि आश्वासक टप्प्यावर चित्रपटाचा शेवट केला आहे, ती खरी सुरुवात म्हणता येईल. या चित्रपटाने अशी सुरुवात महाराष्ट्रात झाली तरी या चित्रपट निर्मितीचा हेतू साध्य झाला असंच म्हणता येईल. 

सगळ्याच कलाकारांनी समरसून कामं केली आहेत. सचिन खेडेकरांनी साकारलेले मुख्याध्यापक दिनकर शिर्के गुरुजी, अमेय वाघचा बबन म्हात्रे, सिध्दार्थ चांदेकरचा सेलिब्रेटी दीप, अनंत जोग यांचा जगताप बिल्डर, क्षिती जोग यांनी साकारलेली सलमा, कादंबरी कदमची सुमन आक्का, पुष्कराज चिरपुटकरचा विशू, हरीष दुधाडेचा राकेश घरत, शिक्षणमंत्री झालेले जितेंद्र जोशी या सर्वांनीच आपआपला अ दर्जा टिकवून ठेवला आहेच. पण प्राजक्ता कोळीने साकारलेली अंजली पदार्पणातच लक्ष वेधून घेते. संवाद फेकीचे तिचे टायमिंग उत्तम आहे. बाळू मामांची एकूणच घालमेल धनंजय सरदेशपांडेंनी छान व्यक्त केलीय तर प्रिंसुली आणि पापुली या बापलेकांचा खट्याळपणा उत्तम मनोरंजन करतो. पॅटीसवाल्याच्या भूमिकेतले उदय सबनीस दोनच प्रसंगात दिसतात पण लक्षात राहतात. अंजलीच्या आईच्या भूमिकेतल्या चिन्मयी सुमीत यांना या चित्रपटात थोडी अधिकची भूमिका हवी होती असा मराठी शाळांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा रास्त आग्रह असला तरी मिळालेल्या भूमिकेत चिन्मयी ताईंनी चाळीस चांद लावलेत, हे मात्र नक्की!

चित्रपटाचे संवाद ही या चित्रपटाची भक्कम बाजू. मराठी शाळांचा मुद्दा हा भावनिक वाटला तरी त्याला व्यवहाराची आणि खेळीमेळीची उत्तम जोड संवादातून दिली आहे. त्याला राजकारणाचा गंध लागणार नाही याची जशी काळजी घेतलीय तसंच वाक्यं प्रचारकी नी कंटाळवाणी होणार नाहीत याचेही भान संवादातून जपले आहे. छापखाना आणि कारखाना, मराठी भाषा शिकायची नाहीच आणि पुढच्या पिढ्यांना शिकवायचीही नाही, शिक्षक पगारी आणि शिक्षण बाजारू झालंय, शाळेचा निरोप समारंभ, मी ही तेव्हा लहानच होते हे सलमाचे वाक्य अशा छोट्या छोट्या वाक्यांमधून विषयाची पेरणी केली आहे. शिर्के गुरुजींनी शिक्षणमंत्र्यांसमोर केलेलं दीर्घ निवेदन सोडले तर चित्रपटात कुठेही लांबपल्ल्याची वाक्ये नाहीत. संपूर्ण चित्रपट संवादी होत राहतो. समुद्राच्या पाण्यात उमटलेली 'मधली सुट्टी' ही अक्षरं विषय आणि शब्दांना फारच हळुवारपणे सादर केल्याची साक्ष आहेत. 

चित्रपटाचे छायाचित्रण सुरेख तर आहेच पण चित्रीकरणाच्या जागा अप्रतिम आहेत. डोंगराच्या कडेने रस्त्याने जाणारी गाडी आणी त्याला समांतर समुद्र किनारा हे परदेशातील नयनरम्य स्थळीच पहायला मिळणारं दृष्य खोखरी किल्ल्याकडे शाळेची सहल जाताना आपल्या मुरुड जंजिरा याच्या जवळपासचं आहे याचे पडद्यावरील चित्रण नितांत सुंदर आहे. सर्वात प्रभावी छायाचित्रण वाटलं ते समुद्राकडे चालत जाताना वाळूत उमटलेली पावलं आणि समुद्राच्या पाण्यात पाय रोवून उभी असलेली सलमा! दिग्दर्शक आणि छायाचित्रणकाराला कडकडीत सलाम!

एकूण छान आहे चित्रपट. हे झालं एक प्रेक्षक म्हणून. 

मराठी शाळांच्या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणूनही काही गोष्टी नोंदवाव्यात असं वाटतं.

'सरकार प्रश्न सोडविण्यासाठी असतं, आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यासाठी नाही' हे सडेतोड वाक्य, नावच शिक्षण 'खातं' आहे, हे या खात्याचा भोंगळ कारभार दाखवणारं चित्रण आणि चित्रपटातील शिक्षणमंत्र्यांचा वावर. सद्यस्थिती पाहता चित्रपटाला कुठलाही राजकीय रंग येणार नाही याची घेतलेली काळजी दिसत असली तरी चित्रपटात राजकीय भाष्य आहे, आकडेवारी आहे, ही चांगली बाजू आहे. मात्र त्या आकडेवारीचा विशेषत: मुलींच्या शिक्षणावर होणारा विपरीत परिणाम हा ही कुठेतरी अधोरेखीत व्हायला हवा होता. 

राजेंद्र दर्डा, विनोद तावडे, वर्षा गायकवाड, दीपक केसरकर आणि दादा भुसे हे गेल्या वीस-पंचवीस वर्षातील महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री. यात दर्डांशी खुलेपणाने भांडता तरी येत होतं. पण बाकीच्यांपर्यंत मराठी शाळांचा मुद्दा पोहोचवणंसुध्दा किती जिकीरीचे आहे हे चळवळीतल्या कार्यकर्त्यांनाच ठावूक. मात्र एका सेलिब्रेटीचे रिल व्हायरल झाल्याने आणि त्याची प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यामु़ळे स्वत: शिक्षणमंत्री हा विषय सोडविण्यासाठी पुढाकार घेतात हे चित्रपटात दाखवलेलं चित्रण म्हणजे फारच अवास्तव वाटतं. किंबहुना मराठी शाळांच्या जबरदस्तीच्या पाडकामाविरोधात खूपच सोपा मार्ग उपलब्ध आहे असा निष्कर्ष त्यातून निघू शकतो, जो वास्तवाला धरून अजिबातच नाहीय. यासाठी चित्रपटकर्त्यांनी चळवळीतल्या लोकांशी बोलून थोडा अधिक वास्तवदर्शी मार्ग काढता आला असता. 

दुसरा मुद्दा मराठी शाळा का हवी याच्या चित्रपटातल्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या पहिल्याच चर्चेचा. त्या चर्चेत मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व सांगण्यात कमतरता जाणवली. अकरावी नंतर सुरुवातीचे काही महिने त्रास झाला तरी मराठीतून शिकल्यामुळे इंग्रजीत आपण कुठेही कमी पडलो नाही हा भाग चर्चेत आहेच. पण मराठी शाळांमध्ये शिकून नेमका काय फायदा झाला ते त्या चर्चेत येत नाही. ती चर्चा मध्येच तोडल्यासारखी वाटते. अर्थात ही उणीव नंतरच्या अनेक प्रसंगांमधून भरून काढल्याचे जाणवते. उदाहरणार्थ चांगलं मराठी बोलणारा नट मिळणं, परदेशात उच्चपदावर नोकरी मिळणं, दुबई-बॅकॉकमध्ये हॉटेल काढणारा व्यावसायिक मिळणं, आपल्या बोलीवर प्रेम करणारा आणि तरीही यशस्वी कंत्राटदार मिळणं, अनाथ मुस्लिम मुलीचं शासनातील उच्चाधिकारी होणं, यशस्वी शेती करण्यासोबत वकीली करणं ही सगळी उदाहरणे मराठी शाळेत शिकूनही होतात, किंबहुना मराठी शाळेत शिकल्यामुळे यांचं कुठेही अडलं नाही, हे ठसठशीतपणे आपल्यासमोर येत राहतं.

नार्वेकर बाई या सर्व माजी विद्यार्थ्यांना सुरुवातीला आग्रह करतात की तुमची मराठी शाळा वाचविण्यासाठी शिर्के गुरुजींना तुम्हाला गुरुदक्षिणा द्यावीच लागेल. आणि हे सर्व माजी विद्यार्थी ती शाळा नेटाने वाचवितातही. तेव्हा याच नार्वेकर बाई शिर्के गुरुजींना सांगतात की आता शाळा पाडली तरी काही हरकत नाही, या मुलांमुळे ती अजरामर झाली! या म्हणण्यामागचं काही लॉजीकच कळत नाही. मग आग्रह धरला तो फक्त अजरामर होण्यासाठीच का, असा प्रश्न पडतो. 

अर्थात चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काही उणीवा जाणवल्या तरी एक मराठी चित्रपट म्हणून, त्यातही मराठी शाळांवरचा चित्रपट म्हणून आणि एक सुजाण व सजग पालक म्हणून तर प्रत्येकाने आवर्जून पहा, असा आग्रह जरूर आहे.

शाळेत असताना फुकट पॅटीस खाल्लेल्या पॅटीसवाल्या काकांना त्याचे पैसे परत करताना विशू म्हणतो की मुद्दलच परत करतो आहे, व्याज कधीही फेडू शकणार नाही! या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी शाळेचे ऋण फेडण्याचा फक्त प्रयत्नच केला आहे, त्या शाळेने घडविलेल्या माणूसपणाचे व्याज कधीही न फेडता येण्यासारखंच आहे, असंच या चित्रपटातील हरेकाला म्हणावंसं वाटत असणार, हे मात्र नक्की!

आनंद भंडारे, १९ जानेवारी २०२६

चकवा

चकवा...
रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात. (चकव्यासंबंधी ही आगळीवेगळी माहिती)

वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे.काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे, याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सारं जीवन अरण्यात घालवणाऱ्यांना येतात. रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी ‘रानभूल’ म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव! त्याबद्दलचे थरारक अनुभव ऐकले, की मन थक्क होतं. रानभुलीला तशी अनेक नावं आहेत. गोंड आदिवासी याला ‘झोटिंग’ अथवा ‘सावडीत’ म्हणतात आणि त्याला भुताखेताचा प्रकार मानतात. खेडय़ापाडय़ातले लोक ‘बाहेरची बाधा’ म्हणतात. पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही.काही झाडांच्या संपर्कात आल्यास, काही वेगळंच चैतन्य जाणवू शकतं. मनाची बैचनी थांबते. उदा. उंबर आणि कोजाब (वटवृक्ष कुळातलं एक झाड). जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती आहे. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते. मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलींत नसते, ठराविक परिसरात ती आढळते. डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलं आहे, की झाडांना भावभावना असतात. समोरच्या व्यक्तीबद्दल नकारात्मक भावना येताच, म्हणजे त्या व्यक्तीची दुष्ट भावना उमजून झाडं, वृक्ष-वेली भीतीनं आकसतात. काही झाडं-फुलं सूर्यास्तानंतर मिटतात. तसंच सर्व वनस्पती संगीतामुळे बहरतात. आपण वातावरणातला प्राणवायू श्वासांद्वारे शरीरात ओढून घेतो आणि उच्छ्वासाद्वारे कार्बन-डाय-ऑक्साइड वातावरणात सोडतो. हा वायू वातावरण दूषित करतो. पण वृक्षवल्ली तोच ओढून घेऊन प्राणवायू पुरवतात हे सिद्ध झालं आहे. म्हणजे वातावरण शुद्धीकरण करण्याची वृक्षांना समज आहे. त्यांच्याजवळची ही उपजत अरण्यशक्ती विलक्षण आहे.

प्राचीन वेदांमध्ये वृक्षांबद्दलची ही जाणीव दिसून येते. ऋग्वेदात विविध वनस्पतींचं माहात्म्य वर्णन करून त्यांना हे देवत्व का दिलं आहे हे वर्णिलं आहे. यजुर्वेदात कोणत्या वनस्पतीचं कोणत्या यज्ञात कोणत्या वेळी हवन करणं स्वास्थ्यास उपयुक्त आहे, ते सांगितलं आहे. अथर्ववेदात विविध वनस्पतींचा उपयोग विविध आजारांमधे कसा करावा, हे सांगितलं आहे. साध्या खरचटण्यापासून ते बुद्धिभ्रंश, अपस्मार, क्षय आदी मोठय़ा आजारांवरही वनस्पतींचा कसा उपयोग करावा याबद्दल अनुभवसिद्ध माहिती दिली आहे.

भृगु ऋषींच्या सांगण्याप्रमाणे अतिउष्णतेमुळे वा थंडीमुळे वृक्षांची पानं, फळं, फुलं म्लान होतात. याचा अर्थ त्यांना थंडी वा उष्णतेचं स्पर्शज्ञान असतं. वारा,आग किंवा वीज पडणं यांमुळे वृक्ष, त्यांची पानं, फळं विदीर्ण होतात. दूषित पाणी दिल्यास वृक्ष व्याधीग्रस्त होतात. तर निरनिराळं खाद्य, माती, पाणी दिल्यावर किडलेले, खुरटलेले, रोगी वृक्ष बरे होऊन पुन्हा बहरून फळं-फुलं देतात. त्या अर्थी त्यांना गंधाचं व चवीचं ज्ञान आहे. पानांच्या श्वासोच्छ्वासादरम्यान काही प्रमाणात पाण्याची वाफही वातावरणात सोडली जाते. त्यामुळे साहजिकच झाडांच्या सावलीतील तापमान २ ते ३ अंशांनी कमी असते. अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. अर्थात त्या शक्तीचीजंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घूसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया, हालचाल होते. काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो, आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! हाच चकवा, आणि हेच झोटिंग! तीव्रता कमी-जास्त असू शकते. या रानभुलीत सापडल्यानं कमकुवत मानसिकतेच्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. काही वेळा तर त्याचा इतका प्रचंड परिणाम होतो, की त्यावर कोणत्याही उपचारांचा लवकर परिणाम होत नाही. ती व्यक्ती अर्धबेशुद्धावस्थेत राहते. आफ्रिकेत तर संपूर्ण माणूस गिळंकृत करणारं एक झाड आहे. काही वनस्पती दिवसा, तर काही सूर्य मावळल्यानंतर रातराणीसारखा उग्र गंध सोडतात.

स्वसंरक्षणासाठी वेली माणसाला तीव्र गंधाद्वारे गुंगवतात, भूल पाडतात. रानभूल ठरावीक अंतरापर्यंत आणि ठरावीक वेळेपर्यंत आपल्या मेंदूचा कब्जा घेते. चार-पाच व्यक्ती एकत्र असल्या तरी त्या एकमेकांना ओळखत नाहीत. या भुलीच्या सीमेबाहेर जाताच त्याचा परिणाम, गुंगी कमी होते. खंबीर व भक्कम मनाच्या व्यक्ती मात्र अशा रानभुलीतून बाहेर पडू शकतात. कमकुवत मनाच्या व्यक्तींवर मात्र त्याचा दीर्घ काळ परिणाम राहू शकतो. जंगलातले प्राणी, चरायला गेलेली गुरं, शेळ्या-मेंढय़ा, गुराखी, लाकूडफाटा गोळा करायला गेलेले बायका-पुरुष, खेडूत, आदिवासी यांनाही चकवा लागतो. ते भ्रमिष्ट होतात, फिरून फिरून त्याच जागी घुटमळतात. शेवटी थकून, कंटाळून भुताटकी समजून घाबरतात.अशा भ्रमिष्ट झालेल्या व्यक्तींवर प्रसंगी मांत्रिकाकडून अघोरी उपायही केले जातात. पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही, ती एक नैसर्गिक अरण्यशक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात.

नवेगाव अरण्यातल्या अशाच एका अनुभवाची गोष्ट. नवेगाव अरण्यातला निसर्ग आणि वन्यजीवांचं निरीक्षण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली सतत जातात. एकदा एका शाळेतर्फे पाच दिवसांचं शिबीर तेथे भरवलं गेलं होतं. प्रत्यक्ष जंगलात वास्तव्य करून अरण्यवाचन शिकवलं जात होतं. वन्यजीव आणि त्यांची पर्यावरणातला समतोल राखण्यात होणारी मदत याबद्दलची माहिती दिली जात होती. काही वेळानंतर सर्वानी दुपारच्या जेवणासाठी परतीची वाट धरली. वाटेवरच्या पाणवठय़ावर मुलं तहान भागवण्यासाठी थांबली. तेव्हा त्यांची गणती केली गेली. पुढे शिक्षक विश्रांतीसाठी थांबल्यावरही सर्व मुलामुलींची गणती केली. सर्व मिळून २४ जण होते. तिथून त्यांचा कॅम्प ३ किलोमीटर अंतरावर होता. निघताना पुन्हा गणती केली. सर्व २४ जण उपस्थित होते. थकव्यामुळे सर्वाची चाल मंदावली. पुढे १ किलोमीटरनंतर मागे-पुढे चालणाऱ्यांची गणती केली असता २ मुली आणि १ शिक्षिका दिसेनात. त्या थकव्यामुळे सावकाश मागे चालत असतील असं समजून मागे जाऊन त्यांना शोधलं, सर्वानी खूप हाकाही मारल्या. पण काहीच प्रतिसाद येईना. मागच्या पाणवठय़ावरही शोधलं, पण त्या तिघी कुठेच दिसेनात. सूर्य डोक्यावर तळपू लागला. बाकी मुलामुलींना कॅम्पवर पोहोचवण्यात आलं, आणि त्या तिघींचा पुन्हा बारकाईनं शोध घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र धास्ती वाटू लागली. तेवढय़ात अचानक एका नाल्यापुढे ओलसर मातीत मुलींच्या पायांचे ठसे दिसले. त्यांना साद घालत घालत, शोधपथक निघालं. नाल्यातून तसंच २ किलोमीटर चालत गेल्यावर मोहाच्या एका झाडाला टेकून ती शिक्षिका सुन्नपणे बसलेली दिसली. तिच्या कुशीत त्या २ छोटय़ा मुली थकूनभागून पहुडल्या होत्या. शोधपथक आनंदानं त्यांच्याजवळ गेलं. पण त्यांनी त्यांना ओळखलं नाही. तिघींना हलवलं तरी त्यांनी कसली हालचाल केली नाही. त्या भान हरवल्यासारख्या बसल्या होत्या. एकूण परिस्थितीवरून त्या रानभुलीच्या चक्रव्यूहात सापडल्याचं लक्षात आलं. त्यांना आधार देऊन उठवलं, आणि १ किलोमीटर चालत आणलं. दरम्यान, शोधार्थ निघालेली वन विभागाची जीप तेथे आली. काही वेळानं त्या शुद्धीवर आल्या. पुढे ‘आकाशवाणी’वरच्या कार्यक्रमासाठी त्यांचे अनुभव ध्वनिमुद्रित केले गेले. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, ‘‘आम्ही सर्वाच्या मागे चालत होतो. तेवढय़ात एका मुलीला रस्त्याच्या डाव्या बाजूला सुंदर फुलं दिसली. ती तोडायचा मोह अनावर झाला, म्हणून तिघीही फुलांजवळ गेलो. तोच कसलातरी उग्र गंध आला आणि त्या वासानं आम्ही भांबावलो. काय चाललंय तेच कळेना. रस्ता दिसेनासा झाला. मुलींनी माझे हात घट्ट पकडले. आम्ही चालतच राहिलो. कुठे जातोय ते कळत नव्हतं. चालत चालत या नाल्यात आलो. थकव्यानं पायातलं त्राणच गेलं होतं, भान हरपलं होतं. फुलांचा मोह महागात पडला.’’याचा अर्थ स्वसंरक्षणासाठी त्या झाडानं उग्र गंध सोडून त्या तिघींना बेभान केलं होतं.

रानभूल ही अशी जखडून ठेवते. अशाच अनेकांच्या अनुभवांतून लक्षात येतं, की जंगली वनस्पतींमध्ये एक गूढ शक्ती आहे हे नक्कीच. भूत, झोटिंग, बाहेरची बाधा, चकवा आणि रानभूल अशा वेगवेगळ्या नावांनी त्याची दहशत असते. पण ती निसर्गऊर्जा आहे, अंधश्रद्धेचा विषय नव्हे.

© कोकणातील गुढ विद्या आणि जागृत देव

बंद घराचे आत्मवृत्त - कोकण

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं नं...! 
  एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, "येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा".. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं! 
   मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!
  दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात ... पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते... सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो ...भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं... आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही! 
   रुसलेल्या रागावलेल्या घराला मग "ती" आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा "देखणं" करते.. गोंजारते.. त्याला त्याचं "घरपण" पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!
   घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात!! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!
तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही  मनात वाटतं, "कोणाची दृष्ट न लागो"...!
    *शेवटी "बाई" घराचीही "आई"च असते..!! हो नं! 😊
 बंद घराचे आत्मवृत्त..

माहिती साभार ✍️DM

आटकांचे दिवस !

◾आटकांचे दिवस !😍
                 काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत जातात. हे बदल अपेक्षित नसले, तरी स्वीकारावेच लागतात. बदलत नाहीत, त्या आपल्या अंतर्ममनात खोलवर रुतून बसलेल्या आठवणी ! बदलत्या काळात सर्व परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत अंतर्ममानातील या आठवणीच देत असतात. अनेकदा आपल्या मनातील या आठवणी नेत्र कडा पाणवण्या एवढ्या गहिऱ्या बनतात. यानंतर आपलं मन मोकळं होतं आणि एका नव्या उत्साहानं मार्गक्रमण करू लागतं. आठवणींशिवाय आयुष्य रीतं आहे, याची आपल्याला जाणीव होऊ लागते. बालपणी शाळेत अथवा मैदानावर विविध प्रकारचे खेळ खेळत असताना परस्परात घडणारे संवाद म्हणजे नातं दृढ करणारे रेशीम धागेच होते. रेशमाच्या या नाजूक धाग्यांनी परस्परांची मनं बांधून ठेवली गेली . रेशमाच्या या धाग्याला भेदभावाची ओळख नव्हती, स्वार्थाचा लवलेशही नव्हता, होती ती फक्त आपुलकी आणि प्रेम जिव्हाळा ! ती मैत्री बंधू भावाची होती. परस्परातील मैत्री कायम निभावणं, या भावबंधनाची होती. या सगळ्या मागे उभे होते, ते घरचे भक्कम संस्कार. बालपणी ज्यांनी गरिबी अनुभवली, ते मनाने श्रीमंत झाले. मनाच्या श्रीमंतीने अनेकांना आपलेसे केले. यातूनच तयार झालं नात्यांचं एक भव्य भावविश्व ! लिमलेटची एक गोळी शर्टाच्या टोकात धरत, त्याचे तीन तुकडे करुन ज्यांनी खाल्ली आहे, त्यांना आयुष्याची गोडी कळलीय. एक कैरी दगडाने ठेचून, त्याचे झालेले सर्व भाग ज्यांनी वाटून खाल्लेत त्यांना आंबट- गोड जीवनाचे रहस्य उलगडलेय. या वृत्तीतून बालपणी मुलांवर उत्तम संस्कार झाले, ते उपलब्ध असलेली वस्तू एकमेकात समान वाटून घेण्याचे. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्वासमवेत वाटून खाणे म्हणजेच सहकार ! पूर्वी रानावनात उपलब्ध असणारा कोकणचा रानमेवा हाच आमचा खाऊ होता. शाळेत जाताना खाऊ साठी पैसे मिळणे हे स्वप्नवत होते. परिणामी निसर्गाकडून जे मिळेल ते आनंदाने घ्यायचे, हाच आमचा खाऊ ! हंगामा नुसार येणारा सर्व प्रकारचा रान मेवा आम्हाला बालपणी उत्तम पद्धतीने ज्ञात झाला होता. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पिकणाऱ्या आंबट गोड आणि लाल चुटुक आटकांनी आमच्या रसनेला बालपणी कमालीचा आनंद दिला. आटकांच्या हंगामातील ते दिवस, आमच्यासाठी अविस्मरणीय ठरले.

                   ऐतिहासिक म्हणून ओळख असलेल्या कसबा या गावात व्यतीत झालेले आमचे बालपण अनेक अविस्मरणीय आठवणींनी समृद्ध बनले. आपल्या जीवनात समृद्धी अगदी सहजपणे येत नाही. समृद्धी येण्यासाठी आपले विचार समृद्ध असावे लागतात. आमच्या बालपणी आम्हाला लाभलेले सर्व सवंगडी समृद्ध विचाराचे होते. याच्या जोडीला आमच्यावर घरातून होणारे संस्कार आमच्या समृद्धीत अधिक भर घालत. परस्परातील संवादामुळे जे काही करायचे ते एकमताने आणि एकजुटीने. बालपणातील आमच्या सवंगड्यानी कधीही कोणाला अंतर दिले नाही. सारे सवंगडी जीवाला जीव देणारे होते, असं म्हटलं तरीही त्यात काहीच गैर नाही. साजरे करायचे सण उत्सव, मैदानावरील विविध खेळ, शाळेत जाणे येणे, अभ्यासाला बसणे, रानमेवा खाणे, नदीवर पोहायला जाणे, सायकल चालवणे अशा प्रत्येक प्रसंगी आमचा चमू एकत्रच असे. या एकीची ताकद आम्हा सगळ्यांना कळलेली होती. कसबा गावातही आमच्या या चमुची एक वेगळी ओळख होती. आमच्या समूहात एखादा जरी सवंगडी कमी असेल, तर त्याची गावकऱ्यांकडून चौकशी केली जायची. शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कर्णेश्वर मंदिराच्या जवळच आम्ही राहत असल्याने, यासह आजूबाजूच्या मंदिरात आमचे दररोज जाणे येणे असे. ही मंदिरे म्हणजे आमच्या नित्य भेटीचीच ठिकाणं होती. कर्णेश्वर मंदिराच्या परिसरात खूप मोकळा भाग असल्याने येथे आमचे विविध खेळ रंगत असत. 

                    कर्णेश्वर मंदिराकडे जाताना वाटेतच “ होळी खुंट ” हे ठिकाण आहे. शिमगोत्सवात या ठिकाणी होळी उभी केली जाते. या होळी खुंटा लगतच एक ‘ आटकं ’ या फळाचं झाड होतं. हे झाड म्हणजे सुद्धा आमचा एक विश्वासू सवंगडीच होता. येण्या - जाण्याच्या मार्गावर हे झाड असल्याने आमचं त्याच्याकडे नेहमीच लक्ष जायचं. सध्याच्या काळात आटकं म्हणजे काय ? हे सांगावंच लागेल. करवंदा प्रमाणे चवीला आंबट गोड असणार आणि त्यापेक्षा आकारानं थोडं मोठं असणार हे फळ,  सुरुवातीला कच्च असताना हिरव्या रंगाचं आणि पिकल्यानंतर लाल चुटूक रंगात बदलून सर्वांना आकर्षित करायचं . करवंदाच्या जाळ्या असतात मात्र आटकं, याचं एक मोठं झाड असतं. आटकाला जानेवारी महिन्यात तुरा येऊन फेब्रुवारी अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला याची फळं पिकू लागतात. फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने आमच्यासाठी पर्वणीचेच ठरत. शाळेतून आल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी आमचा बराचसा वेळ या आटकाच्या झाडाच्या जवळपास जात असे. पूर्वी शाळेत जाणाऱ्या मुलांना खाऊ साठी पैसे देण्याची पद्धत नव्हती. असे पैसे देणं घरच्या शिस्तीत बसणार नव्हतं आणि पालकांना परवडणारंही नव्हतं. अशा काळात एखादी लिमलेटची वा पेपरमीटची गोळी अथवा रावळगावचं चॉकलेट शर्टाच्या टोकात धरून दाताखाली चावायचं आणि जेवढे तुकडे होतील, तेवढे एकमेकात वाटून घ्यायचे यातच खरा आनंद होता. यामधून आपल्याकडे जे काही असेल, ते दुसऱ्याला देण्याचे संस्कार तर झालेच शिवाय परस्परातील नातं अधिक दृढं झालं. लिमलेटच्या गोळीची अथवा रावळगावच्या चॉकलेटची संधी क्वचितच कधीतरी मिळे. अन्य वेळी आम्हाला खरा आधार होता, तो निसर्गातील रानमेव्याचाच ! कसबा गावात बालपणी आम्ही खाल्लेली आटकं म्हणजे जीवनातील आंबट गोड आठवणींचा एक खजिनाच म्हटली पाहिजेत. आटकांचे ते दिवस आजही आठवले, की रसनेवर आंबट गोड चवीचे स्पर्श आपोआप होऊ लागतात. आटकांचे ते दिवस, म्हणूनच अविस्मरणीय बनून आमच्या अंतर्मनात आजही कायम आहेत. 

                      फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान कधीतरी एक दिवस कर्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न होतो. हा उत्सव म्हणजे आमच्यासाठी त्याकाळी जवळपास दहा दिवसांची एक आनंददायी मेजवानीच असे. उत्सवाच्या आधी आणि नंतर आमचा बराचसा वेळ हा कर्णेश्वर मंदिराच्या परिसरातच जात असे. महाशिवरात्री दरम्यान आटकं पिकावी म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करायचो. महाशिवरात्रीच्या दिवशी ठीक ठिकाणाहून विविध व्यावसायिक कर्णेश्वर मंदिराच्या परिसरात येऊन आपली दुकान मांडत असत. याचवेळी आपण ‘आटकं ’ विक्री करायची असं आमच्या सवंगड्यात ठरलेलं असे. आम्ही सारे सवंगडी महाशिवरात्रीच्या दिवशी असं काही दुकान लावणार आहोत, याची घरी कोणतीही कल्पना नसे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आमचा सात-आठ मुलांचा समूह एकत्र यायचा . यातील कोणी ना कोणी झाडावर उत्तम चढणारा असे. त्याच्याकडून काही प्रमाणात सुटी आणि काही फांदीसह आटकं काढून घेऊन, ती आम्ही कोणाच्यातरी घरी सुरक्षित ठेवायचो. कधी एकदा महाशिवरात्रीचा दिवस उजाडतोय आणि आम्ही आपलं दुकान लावतोय, असं आम्हाला वाटत असे. अधिकाधिक लोकांच्या येण्या जाण्याच्या वाटेवर आम्ही ही आटकं विक्रीसाठी घेऊन बसायचो. खरंतर स्थानिक आणि आजूबाजूच्या लोकांना यां आटकांचे अप्रूप ते काय असणार ? हे आमच्या कधी लक्षातच आले नाही. मात्र मुलांनी दुकान लावलं आहे, म्हणून काही मंडळी आमच्याकडून ही आटकं विकत घेत असत. मधूनच यातील काही आटकं खाऊन आम्ही आमचंही पोट भरून घ्यायचो. सायंकाळी आटकं विक्रीतून जे काही पैसे जमा झाले असतील, त्याचा अन्य दुकानात जाऊन आम्ही सर्वांसाठी खाऊ घेऊन, तो वाटून घ्यायचो .  आपण आपल्याच मेहनतीतून चार पैसे कमवत विकत घेतलेल्या खाऊची चव आम्हाला अधिक गोडी आणि आनंद मिळवून द्यायची. 

  
               महाशिवरात्रीत दुकान लावून विकण्यासाठी काढलेली आटकं जर शिल्लक राहिली, तर आम्ही ती ओळखीच्या लोकांना घरी नेऊन द्यायचो. अचानक आटकं मिळाल्यामुळे त्या घरातून आमच्या हातावर एखाद दुसरे बिस्किट किंवा गोड पदार्थ घातला जायचा आणि शाबासकीही मिळायची . या आंबट गोड आटकांनी आम्हाला अनेकदा सुखद आनंदाच दिला. अधून मधून ही आटकं आम्ही शाळेत नेऊन आमच्या सवंगड्यांना देखील देत होतो. आटकं मिळाल्यानंतर आमच्या मित्रमंडळींच्या चेहऱ्यावर तरळलेला आनंद पाहून आम्हाला कमालीचं समाधान मिळे. फुलोऱ्यातून आटकं आकार घेऊ लागली, की ती हिरव्या करवंदा सारखी दिसतात. झाडावर आटकं दिसू लागल्यानंतर आमचं मन ती खाण्यासाठी अस्वस्थ होई. कधीतरी एखाद्या मित्राला आटकाच्या झाडावर चढवून आंबटढाण असलेली आटकं आम्ही डोळे बारीक करुन खायचो. याचा आंबटपणा थोडा कमी व्हावा म्हणून आम्ही त्यात मीठ आणि लाल तिखट मिसळायचो. आंबट आटकांचे हे एकत्रित मिश्रण फारच सुरेख लागे. आटकं पिकल्यानंतर त्याच्यात गोडी निर्माण होत असल्याने आम्ही कच्ची आटकं फार काढत नव्हतो. आटकाचे हे झाड जोशी यांच्या मालकीचे असले, तरी त्यावर फळं धरल्यानंतर त्या झाडाची मालकी आम्हा मुलांकडे येत असे. आमच्या शिवाय अन्य कोणी या झाडावर चढून आटकं काढत नसे. याचा मुख्य कारण म्हणजे फळं धरल्यानंतर कायमच आमचा वावर लक्ष ठेवण्याच्या निमित्ताने या झाडाच्या आजूबाजूला असे. गावातील कोणाला आटकं खावीशी वाटली, तर ते आमच्याकडे पाहून म्हणत, “ मुलांनो आटकं काढाल त्यावेळी थोडी मला आणून द्या रे! ” 

                 आटकाचे दुसरं झाड कसबा गावातील नृसिंह मंदिरा जवळ अगदी नदी लागत होतं. या झाडाला पूर्वीपासून एक जांभ्या दगडाचा चौकोनी पार केलेला होता. हे झाड चढायला थोडं अवघड असलं, तरी याच झाडाची आटकं आकाराने मोठी आणि अवीट चवीची होती. नदीलगत असणाऱ्या या झाडाकडे सायंकाळनंतर आम्हाला जाण्याची परवानगी नव्हती. नदीकडचा भाग निर्मनुष्य असल्याने येथील वातावरण काहीसे गुढ वाटायचे. झाडावर चढणारा एखादा कसबी माणूस बघून आम्ही त्याला आटकं काढून देण्यासाठी मिनतवाऱ्या करायचो. पहिल्याच प्रयत्नात या झाडाची आटकं खाण्याचे आमचे स्वप्न कधीही साकार झाले नाही. चार-पाच वेळा विनंती केल्यानंतर आमच्या पदरात या झाडाची आटकं पडत. झाड चढण्यास कितीही कठीण असले, हा भाग निर्मनुष्य आणि काहीसा गुढ असला, तरी आमची याच झाडावरील आटकं खाण्याची जिद्द कायम असे. विशेष म्हणजे कसबा गावातील या दोन आटकाच्या झाडांव्यतिरिक्त आम्ही अन्य झाडांची आटकं कधी खाल्ल्याचे मला स्मरत नाही. विशेष म्हणजे आमच्या आंबेडखुर्द या गावी सर्व प्रकारची झाडं असताना, आटकाचं झाड मला कधीही आमच्या जागेत वा परिसरात पाहायला मिळालं नाही. कदाचित म्हणूनच कसबा गावातील आमचे आटकांचे दिवस अविस्मरणीय ठरले. मानवी स्वभावाचे देखील यां आटकां सारखेच असते. प्रथम तुरट, आंबट आणि नंतर गोड ! माणूस जसा अनुभवाने समृद्ध होत जातो, तसा त्याच्या स्वभावात बदल घडत जातो. 

                   आटकांचा हंगाम संपत आल्यानंतर आमचा मोर्चा वळायचा तो, गानू आजींच्या घराजवळ असणाऱ्या दोन पेरुच्या झाडांकडे. ही झाडे आम्हा मुलांना चढण्यास सहज सोपी असल्याने आमच्यापैकी कोणीही पेरु काढू शकत होते. पेरूचा हंगाम संपत आल्यानंतर अळू आणि करवंद हा रानमेवा आमची जणू वाट पाहत असायचा. कोकण आणि रानमेवा हे एक अतूट नाते आहे . करवंदीच्या हिरव्या जाळ्या पांढऱ्या फुलांनी बहरल्या की , प्रथम त्या फुलांचा गंध एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो . ही कोवळी फुले खायला देखील खूप मज्जा येते . फुलांनी बहरलेल्या जाळ्या सृष्टीचे सौंदर्य वाढवत असतात . या फुलांची हिरवी करवंदे कधी तयार होणार ?  याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते . छोटी छोटी हिरवी करवंदे कितीही आंबट असली तरीही एक डोळा बारीक करुन आणि तोंड वाकडे करुन त्याची चव चाखण्याची मज्जा काही औरच . हिरव्या करवंदांची चटणीही चवदार असते . करवंदे पिकली की , स्वतःच्या हाताना काढून एखाद दुसरा काटा हाताला लागल्यानंतरच ती खाण्यात खरा आनंद . मे महिन्याच्या सुट्टीत गावी येणाऱ्या सर्वांना घेऊन डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळ्या धुंडाळणे म्हणजे एकत्र रानमेवा चाखण्याची खरी पूर्वापार पध्दत . कालौघात हे सारे रानमेव्या सारखेच दुर्मीळ झालेय . याच हंगामात येणारे भरपूर लोह देणारे फळ म्हणजे अळू ! हे अळू म्हणजे मोठ्या पानांचे अळूवडीचे नव्हे बरं . कॅडबरीच्या रंगाचे टोमॅटोच्या आकाराचे एक अवीट चवीचे फळ . 

                  ' रानमेवा ' हाच ग्रामीण भागातील आम्हा सवंगड्यांचा आवडीचा खाऊ होता . यामध्ये अळू हे फळ याच हंगामात येणारे . अळूची झाडे तशी मोजकीच असल्याने हा सहज सर्वत्र उपलब्ध होत नाही . याची मुद्दामहून कोणी लागवडही करत नाही . मात्र ज्याला जे आवडते ते , कोठे मिळू शकेल ? याचा शोध बालपणी आवर्जून घेतला जायचा . कसबा गावातील  ' राऊत ' नावाच्या आज्जींनी आईकडे एकदा हिरवे चार अळू आणून दिले . आमच्या आईला हे अळू पिकविण्याची प्रक्रिया माहित असल्याने तीने ते पिकण्यासाठी चक्क राखेत घालून ठेवले . फळ पिकविण्याची ही प्रक्रिया आम्हाला एकदमच नवीन होती . हिरवेगार असणारे अळू चार पाच दिवसात गडद चॉकलेटी रंगाचे झाले . निसर्गाची ही जादू पाहून थक्क व्हायला नाही झालं तरच नवल ! आईने अळू फोडून त्याचे बारीक निरीक्षण केले आणि अर्धा अळू आमच्या हातात दिला . एखादी माहित नसलेली वस्तू हातात पडली की , त्याची चव घेण्याआधी गंध घेण्याचा मानवी स्वभाव आमच्यातही असल्याने भावाने आणि प्रथम पिकलेल्या अळूचा गंध घ्यायचा प्रयत्न केला . मात्र हा वास फारसा चांगला नसल्याने आम्ही अळू खायचा की नाही ? म्हणून एकमेकांच्या चेहऱ्याकडे पहात बसलो . मात्र त्यानंतर आम्ही दोघांनीही अळूची फोड जीभेवर ठेवली . आंबटगोड चवीचा तो अळू म्हणजे , लाजवाबच ! आम्हांला दोघां भावांना अळू एवढा आवडला की , चार पैकी तीन अळू आम्ही दोघांनीच फस्त केले . अळू कोणी आणून दिले ? याची चौकशी झाल्यानंतर राऊत आज्जींच्या घरी कसे जायचे वगैरे माहिती आम्ही काढून ठेवली . एक दिवस दोघांनी शाळा सुटल्यानंतर राऊत आज्जींचे घर गाठले आणि अळू काढू का ? असे विचारताच , प्रेमळ आवाजात मिळालेली परवानगी अळूच्या चवी इतकाच आनंद देवून गेली . झाडावर चढताना खूपच काळजीपूर्वक चढावे लागले. या झाडाला लांब आकाराचे काटे असतात. या काट्यांना चुकवत आम्ही सात आठ अळू काढून घर गाठले आणि पिकवायची प्रक्रिया माहिती झालेली असल्याने अळूच्या चवीचा मनमुराद आनंद लुटला . त्यानंतर प्रत्येक वर्षी आटकांच्या पाठोपाठ पेरु, अळूची अवीट चव कधीही चुकली नाही . 

                 
                     भरपूर लोह देणारे अळूचे हे फळ आंबटगोड असले , तरी यातील आंबटपणा न जाणवणाराच असतो . आतमध्ये मध्यभागी मोठ्या बीया असतात . त्या काढल्या की , सर्व भाग खाण्यायोग्यच असतो . या फळाबद्दल सर्वांनाच माहिती असेल असे नाही . निसर्गाने रानमेव्याच्या माध्यमातून मानवाला खूप काही दिले आहे . अजूनही काही रानमेव्या बाबत बरीचशी मंडळी अनभिज्ञ असल्याने निसर्गा जवळ मैत्री करुन आणि याबाबतची माहिती घेऊन रानमेवा चाखला पाहिजे . बालपणी अळूची लागलेली गोडी आजही कायम असल्याने मे महिन्याच्या हंगामात चार पाच अळू पैदा करुन त्याची अवीट गोडी चाखण्याचा नेम मी अजूनही सुरु ठेवलाय . आटकांच्या बाबतीत मात्र आम्ही कसबा गाव सोडल्यानंतर याची चव घेण्यात कायमचा खंड पडला. नंतर आटकाची झाडं कुठे आढळली नाहीत अथवा ती विक्रीसाठी बाजारपेठेत आल्याचं पाहायलाही मिळालं नाही. आटकं हे तसं दुर्लक्षित फळ. पूर्वी खाऊचे प्रकार नसल्याने आणि तो घेण्यासाठी घरातून पैसे मिळत नसल्याने आम्हाला ही आटकंच आमचा खाऊ वाटायची. बालपणी या आटकांनी आमच्या जीवनात आंबट गोड पणा भरून खरी लज्जत आणली. आटकं मिळवण्यासाठी त्यावेळी केलेल्या प्रयत्नामुळे आटकांचे ते दिवस अविस्मरणीय ठरले. आता तर कसबा गावातील आटकाची ती दोन झाडं जागेवर उभी असतील कां ? याची देखील कल्पना नाही. ही झाडं उभी असलीच, तर त्यावरील आटकं खरंच कोणी काढत असेल कां ? हे देखील सांगता येत नाही. कारण बदलत्या काळात आता फळांचे आणि खाऊचे मुबलक प्रकार उपलब्ध आहेत आणि घरातून मुलांना खाऊ साठी सढळ हस्ते पैसाही दिला जात आहे. कदाचित यामुळेच ही आटकं झाडावरच पिकून जमिनीवर गळून पडत असतील. एकेकाळी हे झाड बहरल्यानंतर त्याच्या आजूबाजूला वावरणारा मुलांचा घोळका, ही या झाडाची खरी श्रीमंती होती. आता मात्र ती दोन्ही झाडं जागेवर उभी असली , तर नक्कीच एकाकी पडली असतील. कालायं तस्मै नमः ! आटकांचे ते दिवस सोनेरी होते, म्हणूनच त्याची गोडी हळूहळू प्रथम आमच्या शब्दात उतरली आणि नंतर वाचकांच्या मनावर रुंजी घालू शकली. 

jdparadkar@gmail.com
Jitendra Paradkar 

वरात

◾वरात!!
              वरात ! हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते, ती विवाह झाल्यानंतर नवरदेवाची काढली जाणारी मिरवणूक. यालाच वरात असे म्हटले जाते. फार पूर्वीपासून विवाह नंतर नवरदेवाची वरात काढण्याची प्रथा सुरू आहे. सध्याच्या काळात त्याचे रूप काहीसे बदलले असले, तरी त्या मागची भावना मात्र आजही कायम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या वरातीचं स्थान वेगवेगळं आहे. याबरोबरच प्रत्येकाच्या वरातीबाबतच्या आठवणी देखील अविस्मरणीय अशाच आहेत. वरात ही विवाहनंतर नवरदेवाचे काढली जाते, हे जरी खरं असलं तरी कोकणात व्रतबंध म्हणजेच मुंज या विधीनंतर देखील बटूची भिक्षावळ म्हणजे एक प्रकारची वराती सारखीच मिरवणूक काढण्याची पद्धत आजही सुरू आहे. एकंदरीत वरात ही का काढली जात असेल, अथवा त्यामागील खरा उद्देश काय असेल ? याबाबत विचार केला असता, शुभ कार्यानंतर परमेश्वराच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावणे आणि आनंद व्यक्त करणे अशी वरात काढण्या मागची खरी कारणं आहेत. पूर्वी ताशा या पारंपारिक वाद्याच्या तालावरच वरात काढली जात असे. आता मात्र कर्णकर्कश आवाजाच्या डीजे, बेंजो सारख्या वाद्याच्या तालावर वेळेचे भान न ठेवता वरातीचा कार्यक्रम संपन्न होताना दिसतो. पूर्वी वरात म्हणजे शुभ कार्यानंतर संपन्न होणारी एक प्रथा - परंपरा होती. बदलत्या काळात वरात म्हणजे एक इव्हेंट झाला आहे. वरात ही विवाहानंतर वधू वराची काढली जात असली, तरी व्रतबंध, गावातील एखाद्या सार्वजनिक कार्यात मिळालेलं यश, अटीतटीच्या निवडणुकीनंतर मिळालेला विजय, राज्य राष्ट्रीय स्तरावर एखाद्या व्यक्तीला मिळालेलं यश अशाप्रसंगी काढली जाणारी आनंददायी मिरवणूक देखील गावची वरात म्हणूनच ओळखली जाते. वाद्य वाजवणारे वाजपी, गावातील प्रतिष्ठित माणसं, उत्सव मूर्ती, वराती मध्ये सहभागी असणाऱ्यांना आपल्या डोक्यावर गॅसबत्ती घेऊन उजेड दाखविणारे वाटाडे, फटाक्यांची आतिषबाजी करणारे कारागीर, नृत्य करणारे तरुण-तरुणी, उतार वयातही नृत्याचा आनंद लुटणारे आजी आजोबा, वरातीच्या प्रारंभीच उड्या मारणारी छोटी छोटी मुले असा सर्व समूह एकत्रित रित्या आनंद साजरा करीत मार्गक्रमण करत असतो, त्यालाच ‘ वरात ’ असे म्हटले गेले आहे. वराती मधील प्रत्येकाच्या आठवणी जरी भिन्न असल्या, तरी त्या आजही हृदयात घर करून आहेत.

                  वरात आणि ताशा यांचं एक अतूट असं नातं आहे. पूर्वीचे ताशे आणि सध्या उपलब्ध असणारे ताशे याच्या नादात कमालीचा फरक आहे. पूर्वी वरातीत रंग भरण्याचं खरं काम करायचा, तो ताशाच. ताशा हे वाद्य वाजवत असताना बदलले जाणारे विविध प्रकारचे ठेके वरातीमध्ये नृत्य करणाऱ्या सर्वांना बेभान होऊन नाचायला भाग पाडायचे. वरातीमध्ये ताशा वाजवता वाजवता हे वाद्य वाजवणारे कलाकारांचे पाय देखील आपोआप थिरकायला लागत. ताशा, ढोलकी, टिमकी हे सार एकत्र वाजू लागलं, की मुकेही बोलू लागतील आणि दिव्यांग ही नाचू लागतील असा याचा बाज असतो. वराती मधील ताशा या वाद्याची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. ताशा शिवाय वरात ही संकल्पनाच न पटणारी आहे. वरातीमध्ये ताशा वाजायला सुरुवात झाली, की या कलाकारांमध्ये अधिकाधिक जोश निर्माण करण्यासाठी जमिनीवर अथवा ढोलकी वर विविध मूल्यांच्या चलनी नोटा ठेवणे आणि ताशा वाजवणाऱ्या कलाकारांनी, या नोटा वाद्य वाजवत असतानाच आपल्या तोंडाने उचलणे अशी एक आगळीवेगळी स्पर्धा रंगते. कधी कधी वरातीत नृत्य करणारे आणि बेभान झालेले कलाकार देखील आपल्या मुखात विविध मूल्याच्या चलनी नोटा पकडून समोरच्याने त्या खेचून घ्याव्यात म्हणून आव्हान देत असतात. अशावेळी ज्याच्या मुखात चलनी नोटा आहेत, त्याच्या नृत्य करताना होणाऱ्या हालचाली पाहण्यासारख्या असतात. एक जण आपल्या मुखातील चलन वाचवण्याच्या प्रयत्नात असतो, तर दुसरा ते आपल्याला कसे मिळेल? या प्रयत्नात असतो. एकंदरच वरातीतील हा प्रकार खूपच गमतीदार आणि मजेशीर असतो यात शंका नाही. 

                  पूर्वीच्या काळी वरातीमध्ये दांडपट्टा, लाठी - काठी असे साहसी खेळ देखील पहायला मिळत असत. तोंडात रॉकेल घेऊन हवेत त्याचा फवारा मारत आग पेटविण्याचा साहसी प्रकार आजही केला जात असल्याचे पहायला मिळते. वराती मधील जशी वाद्य बदलली तसे पूर्वीचे खेळ देखील लोप पावले. अर्थात पूर्वीचे हे साहसी खेळ दाखणारे कलाकार देखील कमी झाल्याने आता वराती मधून केवळ बेंजो आणि डीजे या कर्णकर्कश वाद्यावर होणारे पदन्यासच पाहायला मिळतात. या दोन वाद्यांवर केल्या जाणाऱ्या शारीरिक हालचालींना नृत्य म्हणावे का ? असा प्रश्न पडत असल्याने त्याला पदन्यास हाच शब्दप्रयोग उचित वाटतो. पूर्वी ग्रामीण भागातून काढल्या जाणाऱ्या वरातींना एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. ज्या घरात शुभ कार्य असेल, तेथून ही वरात ग्रामदेवतेच्या मंदिरापर्यंत नेली जायची. या मार्गादरम्यान वरातीत सहभागी असणाऱ्या सर्वांना रस्ता नीट दिसावा या उद्देशाने वरातीच्या अधेमधे डोक्यावर गॅसबत्ती घेतलेली माणसं उजेड दाखवण्याचे काम करत. वरातीचा हा काफीला रस्त्याने ग्रामदेवतेच्या मंदिराकडे निघाला, की रात्रीच्या वेळी हे दृश्य अक्षरश: नजरेचे पारणे फेडणारे असे. वरात सुरू झाल्यानंतर अन्य वेळी कधीही न थिरकणाऱ्या मंडळींची पावले ताशाचा आवाज आल्यानंतर हळूहळू प्रथम जागेवरच थिरकू लागत. ताशाच्या आवाजात जोर चढला आणि आबाल वृद्ध नृत्य करू लागले, की अन्य वेळी कशातही सहभाग न घेणारे माणसं देखील वरातीमध्ये अंगात संचार भरल्याप्रमाणे नाचू लागत. हा सारा परिणाम ताशा या वाद्यातून येणाऱ्या नादाचा आणि ठेक्याचा असे. ग्रामीण भागात एखाद्या घरात संपन्न होणारं शुभकार्य हे गावाला आपल्याच घरातील कार्य वाटे, परिणामी संपूर्ण गावाचा सहभाग या शुभ कार्यासह वरातीमध्ये देखील मिळाल्याचे दिसून येई. 

             
              ग्रामीण भागात कोणतेही शुभ कार्य असले, की मंडपामध्ये सर्वप्रथम मान मिळतो तो तासे - वाजंत्री करणाऱ्या कलाकारांना. खणखणीत आवाजाचे एक दमदार चर्मवाद्य , म्हणजे ताशा ! विविध मराठी गाण्यांमध्ये देखील ताशा या वाद्याचा उल्लेख केलेला आहे. पुरातन काळापासून या वाद्याला असलेले महत्त्व आजही कायम आहे. कोणत्याही मंगलकार्याप्रसंगी , मिरवणूक अथवा स्वागत समारंभात ताशा या वाद्याची उपस्थिती महत्त्वाची असते. ताशा वाजवणारे कलाकार पारंपारिक  पध्दतीने हे वाद्य वाजविण्याची कला शिकतात. किमान चार ताशे , दोन ढोलक्या आणि छोटे असले तरी अचूक वेळी वाजून आपल्या आवाजाने लक्ष वेधून घेणारी ' टीमकी ' असा हा वाद्यवृंद ठरून गेलाय. पूर्वी केवळ ग्रामीण भागात कडकडणारा हा ताशा सध्याच्या काळात तर, शहरातील ढोल ताशा पथकात सन्मानाचे स्थान मिळवून आहे. पुरुष वादक कलाकारांना मागे टाकून स्त्रियादेखील अप्रतिम ताशा वाजवत असल्याचे पाहायला मिळते. ताशा या चर्मवाद्याचे नाते हे मंगल कार्यक्रमाशीच जोडले गेले आहे. ताशा वाजू लागला की, तन मन आपोआप थिरकू लागते. ताशाला स्वतःच्या लयीची एक सुंदर भाषा आहे. कोणत्याही प्रांतातल्या भाषेत ताशा आपले स्थान आजही टिकवून आहे. कोकणच्या ग्रामीण भागात आजही वरात म्हटली, की ताशा हे समीकरण आजही कायम आहे. 

                    
                वाद्ये मानवी मनाला केवळ आनंद देतात असे नव्हे तर, दु:ख – नैराश्य देखील दूर करतात. मंगलसमयी वाजविण्यासाठी वाद्यांचा शोध लागला असला तरी, वाद्यांचा थेट संबध मानवी मनाशी जोडला गेला आहे. वाद्याची निर्मिती आणि ते वाजविण्यात कलाकारांनी मिळवलेलं प्रभुत्व हा साधनेचा भाग असतो. एकांतात संगीत मानवाची सोबत करते. वाद्ये मानवाचा जीवनप्रवास सुकर करतात. यासाठी संगीत आणि वाद्य यांना मानवी जीवनात मोठे स्थान आहे. संगीत हे वाद्यांशिवाय निर्माण होऊ शकत नाही. वाद्यांचे अनेक प्रकार असले तरी, प्रत्येकाचे वैशिष्टय भिन्न स्वरूपाचे आहे. चर्म वाद्य , तंतू वाद्य , फुंक वाद्य अशा वाद्य प्रकारात ताशा हा चर्म वाद्यात मोडतो. तांब्याच्या धातूपासून ताशाचे भांडे बनवले जाते. या भांड्यावर कमावलेले कातडे चढवून त्याला चाव्या लावल्या जातात. ताशा वाजविण्यापूर्वी या चाव्या घट्ट करून घेतात. वेताच्या काठ्यांचा आघात करून ताशा वाजवला जातो. विशेषतः लग्न आणि मुंज या विधींसाठी ग्रामीण भागात आजही शास्त्र म्हणून ताशा वाजविण्याची पध्दत आहे. मंगलकार्याची मानाची निमंत्रणे देण्यासाठी ताशाचे वादन लागतेच. मंगलकार्यात सकाळी घाणे भरताना ताशाचे वादन सुरू असावे लागते. ताशे वाजायला लागल्यानंतर अनेक संकेत आपोआप मिळून जातात. ताशे वाजू लागल्यानंतर उत्साही मंडळींच्या अंगात अक्षरशः संचार भरतो. ताशांचा आवाज ऐकल्यानंतर लगबग आणि हातातील कामांची गती आपोआप वाढू लागते. या वाद्याच्या वादनाची सुरुवात आणि शेवट कसा करायचा?  याचीही पध्दत ठरलेली आहे. ताशे वाजविणारे कलाकार हे सुरांकडे कान लावून असले, तरी त्यांची नजर यजमानाकडे अथवा मंडपात भिरभिरत असते. त्यांच्या नजरेतून ओळखीची माणसं सहसा सुटत नाहीत. ताशांची संख्या चार अथवा आणखी कितीही असली तरीही मुख्य वाजपी ठरलेला असतो. त्यानेच सुरुवात आणि शेवट करायचा, हा या वाजप्यांचा अलिखित नियम असतो. चाल बदलणे , आवाजातील चढ उतार आणि शेवटाकडे येणे हे मुख्य वाजप्यावरच अवलंबून असते.       

             
               आपल्या वाद्यांवर वादकांचे कमालीचे प्रेम असते. त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असल्याचे पहायला मिळते. ताशांच्या भोवती छान झालर लावून या वाद्याला सजवले जाते. ताशांची भांडी स्वच्छ ठेवणे, आघात करण्यासाठीच्या काठ्या रेखीव आणि वळणदार असणे याकडे वादकांचे बारीक लक्ष असते. ताशांच्या संचात सर्वांचे लक्ष वेधून घेते ती, आकाराने छोटी असलेली ' टीमकी '. हे वाद्य छोटे असले तरी त्याचे नाव आणि कीर्ती जगन्मान्य आहे. ताशाबरोबर ढोलकी वाजत असते. मात्र ज्यावेळी ढोलकी क्षणाचा विश्राम घेते त्यावेळी टीमकी आपली मर्दुमकी गाजवते. टीमकीचा हा आवाज सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. यावरूनच एखादी व्यक्ती सतत आपली प्रौढी मिरवत असेल तर, त्याला स्वतःची ' टीमकी ' वाजविणे असे म्हटले जाते. ताशे वाजविणाऱ्या मंडळींची कला पाहून त्यांना उपस्थितांकडून बक्षिसे देखील दिली जातात. काही उत्साही मंडळींना ताशे वाजविण्याची लहर येते, त्यांना मधील मोकळ्या वेळात अशी संधी ताशेवाल्यांकडून दिली जाते. मंगलकार्यात वरात हा सर्वाधिक आनंदाचा सोहळा असतो. वरात परत घरात येईपर्यंत लागणारा कालावधी हा अनिश्चित मानला जातो. वरातीमध्ये घरातील लहान थोर सारीच मंडळी जसं जमेल तसं नाचून स्वतःचे समाधान करून घेतात. मात्र वरातीत रंगत आणण्याची सारी जबाबदारी असते ती, वाद्यांवर म्हणजेच ताशांवर. ठेका बदलत जसा ताशा कडकडत जातो तशी नाचायला रंग भरत जातो. वरातीत ताशेवाल्यांनी विविध पध्दतीने ठेका घ्यावा यासाठी ताशेवाल्यांना बक्षीस देऊन खूष करण्याची चढाओढ लागते. यात ताशेवाले , ढोलकीवाले देखील आपोआप थिरकायला लागतात. मंगलकार्यात तरुणाई वाट पाहात असते ती वरातीचीच. या तीन चार तासांच्या कार्यक्रमात ताशेवाल्यांच्या वाद्य कौशल्याची कसोटी लागते आणि ते यात पूर्णपणे यशस्वी होतात. वरातीत ताशेवाले अक्षरशः घामाघूम होतात. वरात परत घरात येऊन विसावल्यानंतरच ताशेवाल्यांना विराम मिळतो. थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्रीचे भोजन होते आणि मगच ताशेवाल्यांना निरोप दिला जातो. ठरलेली बिदागी, मानाचा विडा आणि श्रीफळ देऊन ताशेवाजंत्र्यांना हसतमुखाने निरोप दिला जातो. 
                        

                    काळ बदलला आणि वाद्याचे नवनवीन प्रकार आले. चर्मवाद्यांची जागा आधुनिक इलेक्ट्रॉनिक वाद्यांनी घेतली. मंगलकार्य आणि मिरवणुकीत आता अग्रस्थानी बेंजोसारखे कानठळ्या बसवणारे वाद्य दाखल झाले. असे असले तरी या आधुनिक वाद्यांना ताशा – ढोलकी आणि टीमकीची सर कशी येणार ? आधुनिक वाद्यातून नाद बाहेर पडत असला तरी, तो श्रवणीय असेलच असे नाही. बेंजोचे प्रमाण वाढत असले, तरीही ग्रामीण भागातून आजही ताशांचे महत्व कायम आहे हे विशेष. ताशा कडाडू लागल्यानंतर तन मन या नादात उल्हसित होते. पुरातन काळापासून या वाद्याने समाजाच्या मनावर गाजवलेले अधिपत्य आजही कायम आहे. सध्याच्या काळात शहरातूनही ढोल ताशांची नवनवीन पथके तयार होत आहेत. विशेष म्हणजे या पथकातून तासे वाजविण्यासाठी तरुणी पुढे येत आहेत ही आनंदाची बाब मानली पाहिजे. ग्रामीण भागात शुभकार्याप्रसंगी मानाची निमंत्रणे देण्यासाठी आजही ताशा हे वाद्य सोबत असावे लागते. याबरोबरच शुभकार्यात मंडपात पहिला मान मिळतो, तो ताशेवाल्यांनाच. माझ्या आठवणी तशा दोन-तीन वराती कायमच्या घर करून आहेत. यात पहिली  म्हणजे, बालपणी शाळेत जाण्याचा असणारा आळस, कायमचा दूर करण्यासाठी आईने हातात काठी घेऊन पूर्ण वाडीतून मला सर्वांसमक्ष झोडत नेत काढलेली वरात. दुसरी म्हणजे आमचे स्नेही मकरंद मुळये यांच्या विवाह प्रसंगी काढलेली वरात. या वारातीमध्ये स्त्री आणि पुरुष आपलं वय आणि देहभान विसरून अगदी मनसोक्त नाचले होते. आमचं तन मन देखील त्यावेळी आमच्या ताब्यात राहिलं नव्हतं. ही वरात कधीही न विसरता येण्यासारखी ठरली. त्यानंतर आमचा पुतण्या अथर्व याच्या व्रतबंधा निमित्त काढण्यात आलेली भिक्षावळ मिरवणूक, वरात. या वरातीत देखील आलेले सर्व आप्तेष्ट, स्नेही ताशांच्या साथीने अगदी मनसोक्त, मनमुराद आणि मन भरेपर्यंत नाचले होते. या तीन वराती मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. 

                वरातीवरूनच एक किस्सा आठवला. काही प्रतिष्ठित मंडळी विवाहानंतर काढल्या जाणाऱ्या वरातीच्या गप्पा मारत एकत्र बसले होते. प्रत्येक जण या वरातीमधील आपापले अनुभव अगदी रंगतदारपणे कथन करत होता. आपल्या विवाहानंतर काढल्या गेलेल्या वरातीमध्ये कशी मजा आली होती, हे सांगण्याची प्रत्येकात जणू चढा ओढच लागली होती म्हणा ना ! विवाहानंतर वरात काढणे हा काही वेळा एक प्रतिष्ठेचा भाग देखील समजला जातो. वरातीमध्ये कसा झगमगाट होता, किती फटाके वाजवले गेले, कशी आतशबाजी झाली, किती प्रकारची वाद्य होती, वधू-वरांची गाडी कशी सजवली होती, किती पैसे उडवले गेले याची देखील खूप मोठी चर्चा होते. ग्रामीण भागात अथवा गावात पुढे काही दिवस या वरातीबाबतची चर्चा चांगलीच रंगत जाते. अशा प्रकारच्या चर्चेमुळे गावातील हे विवाह अथवा अन्य शुभकार्य आगळी वेगळी ठरतात आणि अनेकांच्या कायमची लक्षात राहतात. आपल्या विवाह नंतरच्या वराती मधील चर्चा चांगल्याच रंगात आलेल्या असताना, एका प्रतिष्ठिताने आपला रंजक अनुभव कथन केला आणि तो ऐकून सर्वांनीच त्याच्या या आगळ्यावेगळ्या कल्पनेला साष्टांग दंडवत घातला. ती व्यक्ती सांगू लागली, माझा विवाह ठरला. हळूहळू सारी तयारी पूर्ण झाली. पूर्वीच्या काळी विवाह असो अथवा कोणतेही शुभ कार्य त्याचे एक बजेट ठरलेले असे. माझ्या विवाहात सारं काही ठरलं, मात्र वरातीचा खर्च करायचा की पत्नीला एक सोन्याचा हार ? याबाबत माझ्या मनात चलबीचल निर्माण झाली. त्यावेळी हातात मोजकाच पैसा होता. 

                  अखेरीस माझ्या मनाने जो कौल दिला त्याप्रमाणे मी वागायचे ठरवले. आपला विवाह झाला हे प्रथम संपूर्ण गावाला आणि त्यानंतरच्या आगळ्यावेगळ्या आणि शाही वराती मधून अन्य सर्वांना कळलं पाहिजे. आपल्या विवाहात जशी वरात निघेल, तशी परत काही वर्षात निघणार नाही असा थाटमाट उडवून द्यायचा, असा मी माझ्या मनाची पक्का निर्धार केला. विवाहापूर्वीच्या बोलण्यात पत्नीला दागिना करतो, असे जरी मी बोललो असलो तरी तो निर्णय तूर्तास रद्द करून या दागिन्याचा सर्व खर्च विवाह नंतरच्या वरातीवर करायचा आणि संपूर्ण गावाला आपल्या विवाहाची वरात लक्षात राहील असाच थाटमाट उडवून द्यायचा या निर्णयाशी मी ठाम राहिलो. विवाह झाला सायंकाळच्या वेळी रथ सजवून, ढोल, ताशे – वाजंत्री, विविध प्रकारची पारंपारिक नृत्य, फटाक्यांची आतिषबाजी अशी शाही वरात गावातून निघाली आणि सारी माणसं अक्षरशः टकामका बघायला लागली. हे सारं दृश्य पाहून माझं मन कमालीचा तृप्त झालं. मात्र गळ्यात एक दागिना कमी असल्याची खंत पत्नीच्या मनात राहू नये यासाठी, या वरातीच्या झगमगटाटा मागील सत्य मी पत्नीला सांगायचे ठरवले. वरात दणक्यात सुरू असतानाच मी पत्नीला म्हणालो, विवाहात तुला एक सोन्याचा दागिना मी करतो, असा शब्द दिला होता खरा मात्र तो खर्च आज मी या वरातीतील झगमगटावर केला आहे. याचं कारण म्हणजे, तुला दागिना मी परत कधीही करू शकतो, मात्र आपल्या विवाहाची वरात मात्र आज एकदाच निघणार, नंतर ती काढता येणार नाही. म्हणून मी दागिन्या ऐवजी हा पैसा वरातीवर खर्च करायचा असं ठरवलं. या प्रतिष्ठिताने आपल्या विवाह नंतरच्या वरातीमधील जो किस्सा सांगितला, तो ऐकून उपस्थित मित्रांनी त्याला अक्षरशः साक्षात दंडवत घातला. वराती मधील प्रथा- परंपरा आणि असे किस्से या सोहळ्याचे महत्व आजही ठिकवून ठेवत आहेत. 

कापा बरका फणस

#कोकण #बालपण #आठवणी
कोकणात फणस खूप प्रमाणात येतात. फळ मोठं घरात किती खाणार, आम्ही फणसाचा सिझन सुरू झाला म्हणजे एप्रिल मे महिन्यात वाट बघायचो फणस कधी पिकतो आहे याची. फणसाचे दोन प्रकार असतात, जास्त करून सर्वाना माहीत असलेला म्हणजे "कापा" फणस.  याला हे नाव का पडलं असेल तर तो कापून खावा लागतो. आणि दुसरा "बरका" याला हे नाव का असेल हे मला अजून नाही कळलं. पण हा हाताने फोडून खायचा फणस. याचे गरे एकदम रसाळ, आणि मऊ असतात. हे बरके गरे खाण्याचं एक टेक्निक असतं. अख्खा गरा तोंडात टाकायचा आणि त्यातली बी (आठिळ) तोंडातच वेगळी करून गर खायचा(गिळायचा हा शब्द जास्त योग्य आहे कारण हा चावायला लागत नाही) 
हा पण फणस खाल्ला की वर अर्धा तास तरी पाणी प्यायचं नाही. नाहीतर पोट दुखणं नक्की. मला हा बरका फणस जास्त आवडतो. आम्ही सकाळी मऊ भात खाऊन झाला की त्यानंतर हा फणस खाण्याचा कार्यक्रम करत असू. आमच्या घरी शेजारच्या काकांची छोटी मुलगी येत असे, बाबांच्या जवळ तिचे फार पटे. बाबा तिला सांगत.. *आज आमच्या कडे जॅकफ्रुट पार्टी आहे तू ये हं*
पहिला फणस गावात ज्यांच्या कडे पिकेल तो आवर्जून शेजारी पाजारी दिला जाई. 
आता खूप प्रमाणात फणस आले की ते कच्चे असताना पण आत चांगला जून गरा  तयार झाला म्हणजे फणसाच्या सालीवर जे काटे असतात ते सुरुवातीला जवळ जवळ असतात फणस तयार झाला की ते रुंद होतात हे फणस जून झाला असल्याचं ओळखण्यासाठी खूण. तर असे जून फणस काढून त्यातले गरे काढून चिरून तळणे हा एक वेळखाऊ आणि किचकट कार्यक्रम असे. आता सगळीकडे तळलेले गरे मिळतात. जॅकफ्रूट चिप्स. ते खोबरेल तेलात तळले की स्वाद छान येतो. 
तर एक दिवस हा घरोघरी सवडीने केला जाणारा उद्योग. फार किचकट पण खायला अप्रतिम.  हाताला तेल लावून हा फणस निवडावा लागतो. त्यातले गरे वेगळे करून त्यातल्या आठीळा काढून तो पातळ उभे काप करून चिरावा लागतो. गरम तेलात छान कुरकुरती होई पर्यंत मिठाचं पाणी घालून तळायचा हे फार वेळखाऊ काम आहे. पण फायनल प्रॉडक्ट् साठी हे सगळे कष्ट करायची तयारी असायची आमची.  कोकणात दमट हवा त्यात पाऊस, हे तळलेले गरे तसेच कुरकुरीत ठेवणं हा ही एक टास्क असे. त्यामुळे डब्याच झाकण कुणाला न कळत उघडण शक्य होत नसे. एवढं ते घट्ट लावलेलं असे. हे तळलेले गरे हे देखील बाहेर पाऊस पडत असताना पाऊस बघत बघत खायची मजा भारी असते. 
आज थांबते...

शिक्षक आणि चोर 🤣

😂😂😂😂😂😂😂😂

एक आदरणीय शाळामास्तर नुकतेच निवृत्त झाले होते. 🎓
ते आणि त्यांची पत्नी एका फ्लॅटमध्ये राहत होते. 🏠😉

दसऱ्याच्या सुट्टीत त्यांनी आपल्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला. 💥🔥🔥🔥

जाण्यापूर्वी मास्तरांनी मनात विचार केला —
“आपण नसताना जर चोर घरात शिरला,
तर तो कपाटं फोडून सगळीकडे पसारा करेल,
जरी घरात पैसे नसले तरी!” 😅

मग घराची वाट लावू नये म्हणून
मास्तरांनी टेबलावर ₹1000 ठेवले 💸
आणि त्यासोबत एक चिठ्ठी ठेवली. 📝

---

"प्रिय अज्ञात चोर,

तुम्ही माझं घर फोडण्यासाठी घेतलेला त्रास आणि मेहनतीबद्दल अभिनंदन! 🥰🥰🥰
पण दुर्दैवाने मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे,
पेन्शनवरच जीवन जगतो. 😅
म्हणून घरात काही मौल्यवान वस्तू नाहीत.

मला वाईट वाटतंय की तुमचा वेळ आणि श्रम वाया जातील. 😔
म्हणून तुमच्या प्रयत्नाचा सन्मान म्हणून
ही छोटीशी रक्कम स्वीकारा. 🙏

आणि तुमच्या ‘व्यवसायात’ (चोरीत 😜)
अजून यश मिळावे म्हणून काही सल्ले देत आहे 👇"**

---

मास्तरांचा "सल्ला" पुढीलप्रमाणे होता: 😂👇

८ व्या मजल्यावर – एक भ्रष्ट मंत्री राहतो 💼💰
७ व्या मजल्यावर – एक बेईमान बिल्डर 🏢
६ व्या मजल्यावर – एक सहकारी बँकेचा अध्यक्ष 🏦
५ व्या मजल्यावर – एक मोठा उद्योगपती 🏭
४ थ्या मजल्यावर – एक नामांकित वकील ⚖️
३ र्‍या मजल्यावर – एक भ्रष्ट राजकारणी 😏💍💵

“त्यांच्याकडे पैशाचे आणि सोन्याचे डोंगर आहेत.
तुमच्या ‘व्यवसायातील यशामुळे’ त्यांना काही फरक पडणार नाही!
कारण ते पोलिसांकडे तक्रारही करणार नाहीत!” 😂😂😂

---

दसऱ्यानंतर जेव्हा मास्तर घरी परतले,
तेव्हा टेबलावर एक मोठी पिशवी ठेवलेली होती. 🎒😲
त्यात होते ₹10 लाख रोख पैसे! 💸💸💸
आणि त्यासोबत एक पत्र —

---

**"आदरणीय गुरुजी, 🙏

आपल्या मार्गदर्शन आणि शिक्षणाबद्दल मनःपूर्वक आभार! 👏👏
मी तुमचा सल्ला मानला आणि माझं मिशन यशस्वी झालं! 😄
हा थोडासा मोबदला तुमच्या आशीर्वादासाठी ठेवत आहे.

आपले आशीर्वाद आणि ज्ञान
असेच पुढेही मिळत राहो...

आपला शिष्य – चोर 😄😄"**

---

😂😂😂
मास्तरांनी पत्र वाचून मोठ्याने हसत म्हटलं —

“अय्यो! मी निवृत्त झालो असं वाटलं,
पण दिसतंय की माझं शिकवणं अजूनही सुरू आहे!” 📚🤣💥

😂😂😂😂😂😂😂😂

आयुर्वेदिक इश्क

अच्छा सुनो !!!
अगर फायदा नहीं हुआ तो नुकसान भी नहीं होगा...

हम तुमसे इश्क आयुर्वेदिक वाला करेंगे..🤣🤣

ठीक है??