Happy birthday wishes

ABC 💐💐💐🎂🎂🎂
आपणांस जन्म दिवसाच्या भगव्या शुभेच्छा .. आईतुळजाभवानी् आपणास उदंड आयुष्य देवो... राजा शिवछत्रपती आपणास चाणक्य बुद्धी देवो ...रौद्र शंभूराजा आपणास बलाढ्य ताकद देवो .... आपणास गणेशाची बुद्धी ...चाणक्याची सिद्धी .... भीष्माचवचन... कर्नाच दान.... रामाची मर्यादा ...हनुमानाची ताकद ....रायगडाची श्रीमंती ...आणि शिवरायांच जानतपन.. लाभो .. आपली वैवाहिक सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक व्यापारकला क्रीडा क्षेत्रात प्रगती होवो ...आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा...शुभेच्छुक­: ABC ..💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

Malvani couple

मालवणी कपल
प्रेयसी::~ तु माझ्यासाठी काय करतलं..??

प्रियकर::~ तुका काय हव्या.....

प्रेयसी::~ चंद्र देतलस का आणुन...???

प्रियकर::~ तुका चंद्र आणुन दिलय तर, पृथ्वीभोवती काय तुझो बापुस बैटरी घेऊन फिरतलो ......
😝😝😝😂😂😂

आईला द्यावे कधी माहेरपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी
पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी
नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
फार नाही, पुरेल तिला मदत जराशी
लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

आई राहून सासरी लेकीला माहेर देते
पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
मग आईला कुठलं माहेरपण?

तिला ओळखणारं तिचंच  अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

आईलाही हवा असेल कधी विसावा
वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण..☺🙏❗

देवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला.
.
.
.
.
' तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले...

आणि विचारलं दुसरं काही मागा....

तर तुम्ही काय मागणार..??

'..त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;..

''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागनार....

कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाही.

"हे आहे आईचे प्रेम....''घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही..

जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,

सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात  शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...!

☑☑ आई करीता पुढे पाठवा..
👪👪👪

कुत्रा आणि गाढव

एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.

ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,

कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .

कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो ,

पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .

शर्यत सुरु झाली

कुत्रा जोरात धाऊ लागला.

पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली ,

असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले

कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला

तर बघतो

तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते

तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून

निराश झालेला कुत्रा बोलला कि

जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते

तात्पर्य काय
१.आपल्याना विश्वासात घ्या

२.आपल्याना  पुढे जाण्यास सहकार्य  करा,त्याना प्रोत्साहन  द्या

३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील

४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा

       *🙏आपली_माणसं🙏_मोठी_करा*

Punekar Special

तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो.

"अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये".

त्यावर एका पुणेकराने लिहिले,

दिड शहाण्यानो.... ते लिहिलेल वाचता आल असत तर अंगठा मारला असता का????

बिनडोक कुठले!....
😂😆😜😝

#बायको #wife

#बायको
बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला समजणं नसत!!!
किंबुहना
पोस्ट टाकून कधी ती समजत हि नसते !!! बायको ह्या शब्दाला जर फोडले तर "बा" म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी "य" म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि "को" म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी !!! सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात!!! मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल !!!!!
बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं !!!!!! प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ!!!! हातात भक्कम हात!!! समजून घेणार हृदय !!! इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी !!!! एक जवळचा मित्र !!! आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी वागेल !!! ज्याच्या जवळ इतकं मन मोकळं करता येईल की मैत्रिणीची हि गरज नाही भासणार!!!" जिच्या डोळ्यात आपल्यामुळे कधीच अश्रू नाही येणार !!!!!! एक स्त्री म्हणून मान!!! आणि तिच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भक्कम साथ बस इतकंच मिळालं कि ती झोपडीला हि स्वर्ग बनवेल !!!!! आणि भाकरीचा तुकडाही तिला पंचपक्वान्न वाटेल आणि नवऱ्याच्या मिठीत स्वर्ग सुख बस आणखी काहीही नको असत कुठल्याही बायकोला म्हणून म्हणते ,,,,,,,,,,,,
बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला समजणं नसत
बायको म्हणजे एक संसारासाठी सतत तेवणारी ज्योत असते !!!!
स्वतःला विसरून नवऱ्यासाठी जगणारी आयुष्यभराची साथ असते!!

#भाऊबीज #bhaubij #bhaiduj

💖बहीण 💖                        
        💖एक अनोखं नातं💖

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!🌹🌹🌹भाऊबीज च्या सर्व बहिण - भावांना  हार्दिक शुभेच्छा 💐💐

Nice Lines

*एक उम्र वो थी कि जादू में भी यक़ीन था...*
*एक उम्र ये है कि हक़ीक़त पर भी शक़ है.....✍🏼*

जिनके दिल बहोत अच्छे होते हैं.. अकसर किस्मत उनकी ही खराब होती है।

आज भी उसके ख़त पढ़ कर मुस्कुरा देते है..
झूठ भी बड़े प्यार से लिखती थी वो...😉

*प्यार सबको आजमाता है*
*सोलह हज़ार एक सौ आठ रानियों को मिलने वाला श्याम*
*एक राधा को तरस जाता है.*

जिन्दगी में आप जो 
करना चाहते है, वो जरूर कीजिये, ये मत सोचिये कि लोग क्या कहेंगे। क्योंकि 
लोग तो तब भीकुछ 
कहते है, जब आप कुछ नहीं 
करते।

इस अफ़सोस के साथ न उठो कि कल आप क्या नहीं कर पाए,

बल्कि इस सोच के साथ उठो कि आज आप क्या कर सकते हो!

एसटी संप

एसटी चा जो संप चालू आहे त्यावरून मला एक वर्षांपूर्वीचा अपघात आठवतोय .

स्थळ सावित्री नदी , महाड

रात्री १२ ची वेळ . . .
राजापूर मधून बस निघाली . . .
२३ प्रवासी झोपेत . .
चालक वयाची पन्नासी गाठलेला . .
अचानक . . काय झाले माहित नाही ..
पण गाडीला . . एक मोठा धक्का बसला . .
पूर्ण वेगाने पाणी . . घुसले . .
आणि पूर्ण काळोख . .

दोन दिवसांनी . . बस चे तुकडे मिळाले . .
त्यात मुख्य इंजिन चा भाग . . आणि चालकाची सीट मिळाली . .

आणि

मृतदेह हॅन्ड ब्रेक ओढलेल्या अवस्थेत सापडला . . . . .

बस . .

या पलीकडे नाही लिहू शकत 

एसटी  कर्मचाऱ्यांनी संप केला प्रवाश्यांच्या संतप्त प्रतिक्रिया  प्रशासनाने देखील हा संप बेकायदेशीर ठरवला परिवहन मंत्र्यांनी तर धमकीच दिली की सरळ कारागृहात डांबू म्हणून ..

मला एक सांगा अश्या कोणत्या मागण्यासाठी त्यांनी संप केला अवास्तव मागण्या आहेत का ? नाही  आपण जी दिवाळी ला उटणे लावून अंघोळ करतो न ती अंघोळ पण त्यांच्या नशिबात नसते ती अंघोळ त्यांची कुठे तरी लॉज मध्ये किंवा एखाद्या डेपोमध्ये होत असते त्यांना सन,ऊन पाऊस वारा माहीत नाही
सण कोणताही असो हिंदू मुस्लिम शीख पारसी यांचा कोणताही सण हा त्याच्या घरी साजरा नाही करत हे नक्की

त्यांचे वेतन जेमतेम दहा हजार आणि त्यांना कपात होऊन  मिळते 8 ते 9 हजार
मग त्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी केली तर त्यात गैर काय..

अहो कबाड कष्ट  रक्ताचे पाणी  करून कष्ट करणाऱ्या प्राध्यपकांना एक लाख ते दीड लाख मानधन असणाऱ्याना  सातवा वेतन आयोग मिळू शकतो तर एसटी कर्मचाऱ्यांना मिळायलाच पाहिजे

प्रवाश्याची गैरसोय होतंय हे मान्य पण एसटी कर्मचाऱ्यांची  ही गैरसोय बाबत सरकारने दखल घ्यावी यासाठी पण हा संप आवश्यक असेल  कदाचित
माझा पाठिंबा आहे या संपास  आपण ही पाठिंबा द्यावा

*संपूर्ण आयुष्य झिजवून . .  . .  .  . खालील लोक तमाम मराठी माणसासाठी मरताना दिसतात*

*एसटी - ड्रायव्हर कंडक्टर*
* आपले सैनिक *
*खाजगी दवाखान्यातील* *कर्मचारी ,*
*पोस्टमन*
*कंत्राटी कामगार*

याना . . नेहमी भरभरून मिळावे असे वाटते .

हि लोकं नेहमी झिजताना दिसतात .

मागण्या मान्य होऊन संप लवकर मिटू दे .

एसटी . . पोरकी आहे तुमच्या विना . ...

आवडल्यास जास्तीत जास्त पुढे पाठवा 🙏🙏🙏🙏

माणसं

खूप भावली ही कविता !
माहिती नाही कोणी लिहली आहे !
---------------------------------------
*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊

कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये

चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये

कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये

नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये

गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये

जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये

सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये

नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये

हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.

*कारण*
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात
*सारी आपलीच माणसं !*