ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत

आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!
त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस!!
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!
धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन!!
करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
मिरचीचा ठेचा
लोणच्याचा खार,
हाच आमचा
पोषण आहार!!
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज!!
काट्यांच रूतणं
दगडांची ठेच,
कसा सोडवायचा
हा सारा पेच!!
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट!!
जुन्या पुस्तकांची
अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची
वेगळीच गंमत!!
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची!!
केस कापण्याची
एकच शक्कल,
गप्प बसायचे
होईपर्यंत टक्कल!!
📖📚📖📚📖📚📖📚
ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏🏼

कुणीतरी आपल्यासाठी.....

कुणीतरी आपल्यासाठी.....
का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते
कुणीतरी आपल्यासाठी असावे.....
ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे
आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे......

रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे
मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे....
उशिर झाला केव्हा तर लटके लटके रुसावे
पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे.....
केव्हा नटता सावरता आपण
त्याने मनापासुन कौतुक करावे...
का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..
कुणीतरी आपल्यासाठी असावे.

"आपली सुरक्षा आपल्याच हाती..."

एक महत्वाची सूचना
"आपली सुरक्षा आपल्याच हाती..."
कृपया सर्वांनी हे आपली आई, बहिण, प्रियसी, मैत्रीण, मुलगी, बायको सर्वांना सांगा...आणि शेअर करा....!!!!!!
🍁 🙏 🙏 🍁 🙏 🙏 🍁 🙏 🙏 🍁
आपण जेव्हा कोणत्याही दुकानात ड्रेसिंग रुममध्ये जाता तेव्हा कृपया एक चाचणी सर्व प्रथम करा कारण “आपली सुरक्षा आपल्याच हाती”
“ड्रेसिंग रूममधल्या आरश्याला आपल्या हाताच्या बोटाच्या नखाने स्पर्श करून बघा”,
चित्र – (१) मध्ये दाखवल्याप्रमाणे हाताच्या बोटाचं नख आणि त्याची प्रतिमा यांच्यात अंतर असेल तर घाबरायचं कारण नाही, आरसा खरा आहे.
पण जर
चित्र – (२) मध्ये दाखवल्याप्रमाणे हाताच्या बोटाचं नख आणि त्याची प्रतिमा यांच्यात अंतर नसेल आणि नख आणि त्याची प्रतिमा एकमेकांना स्पर्श करत असेल तर सावधान....!!!!!!!!!!!!
“अंतर नाही, सुरक्षा नाही..धोका आहे”
तो “टू वे मिरर” आहे. त्या आरश्य पलीकडून कोणीही तुम्हाला तुमच्या नकळत पाहू शकतो.
फोटो आणि विडीओ हि काढू शकतो....सावधान ....!!!!!!!
असं आढळून आल्यास ड्रेसिंग रूम मधून तत्काळ बाहेर निघा...
लक्षात ठेवा ... “अंतर नाही, सुरक्षा नाही..धोका आहे”
प्रत्येक वेळेस “ड्रेसिंग रूम” मध्ये गेल्यावर हि चाचणी न विसरता करून बघा कारण
"आपली सुरक्षा आपल्याच हाती..."
कृपया सर्वांनी हे आपली आई, बहिण, प्रियसी, मैत्रीण, मुलगी, बायको सर्वांना सांगा...आणि शेअर करा....!!!!!!

Nice SMS Thoughts

"एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पुर्णपणे कधीच तोडु नका..
कारण अजुन एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तरी निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे....
[
ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे. त्या पायरीला कधीच विसरू नका, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता,तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो..

।। शुभ सकाळ ।। शुभ दिन ।।

*** बँकेवरील दरोडा ***

हॉंकॉंगमध्ये एका बँकेवर
दरोडा पडला.

‘सगळ्यांनी मुकाट्याने
जमिनीवर आडवे पडून रहा. लक्षात ठेवा पैसा सरकारचा
आहे पण जीव तुमचा आहे.’

दरोडेखारांनी ओरडून
सांगताच सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.

याला म्हणतात ‘माईंड
चेन्जिंग कन्सेप्ट’ (Mind Changing Concept) म्हणजेच माणसांच्या
सर्वसाधारण विचारांमधे
बदल घडवण्याची किमया.

त्यातील एक महिला
विचित्र  पद्धतीने आडवी
पडली होती.

एक दरोडेखोर तिला ओरडून
म्हणाला, ‘मॅडम! जरा
सभ्यपणे वागा. हा दरोडा
आहे,
याला म्हणतात व्यावसायीक
रहाणे (Being professional) आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.

दरोडा टाकल्यावर दरोडेखोर
लूट घेऊन घरी आले. त्यातला ज्युनिअर दरोडेखोर, जो
एम.बी.ए. होता तो 6 वी
पर्यंत शिकलेल्या सिनियर
दरोडेखोराला म्हणाला.,
‘चला आता आपण पैसे
मोजायला लागुया!’

त्यावर सिनिअर दरोडेखोर
म्हणाला, ‘वेडा आहेस की
काय? हे पैसे मोजायला
कित्येक तास लागतील.
जरा दम धर. रात्री टी. व्ही.
वरच्या बातम्या बघ. तुला
आपोआपच कळेल की
आपण किती लाखांचा
दरोडा घातला आहे ते.
’याला अनुभव म्हणजेच
‘एक्सपिरिअन्स’
(Experience) असे
म्हणतात. हल्ली कागदी
डिगर्यां पेक्षा अनुभव जास्त
महत्वाचा झाला आहे.

दरोडेखोर बँकेतून निघून
गेल्यावर बँक मॅनेजर सुपरवायझरला म्हणाला,
‘ताबडतोब पोलिसांना फोन
कर!’ सुपरवायझर म्हणाला ,
‘थोडे थांबा साहेब! आपण आधीच बँकेच्या 70 लाख डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून 10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग पोलिसांना
बोलवूया!’ याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’(Swim with the tide). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून
स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.

सुपरवायझर म्हणाला, ‘जर
दर महिन्यात असा दरोडा
पडला तर कार मजा येईल!’
याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी
बदलणे’ (Changing priority). कारण ‘पर्सनल हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’
पेक्षा जास्त महत्वाचा असतो.

दुसर्याह दिवशी टी. व्ही. वर
बातमी झळकली की बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला. पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण झाले.
कारण त्यांनी आणलेली
कॅश परत परत मोजली.
पण ती फक्त 20 लाख
डॉलर्सच निघाली.
मग 80 लाख डॉलर्स
कुठे गेले?

खरी मेख काय आहे ते
सिनियर दरोडेखोराच्या
बरोबर लक्षात आहे. तो
वैतागून म्हणाला, ‘आपण
जिवावर उदार होऊन
दरोडा टाकला पण
आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले. पण त्या
बँक मॅनेजरने मात्र काहिही न करता 80लाख डॉलर्स लाटले. खरे आहे माणसाने शिकले
पाहीजे. नुसतेच दरोडेखोर
न होता ‘सुशिक्षीत
दरोडेखोर’ व्हायला पाहीजे.’

याला म्हणतात ‘ज्ञान’
म्हणजेच 'नॉलेज’ (Knowledge) ज्याची
किंमत सोन्यापेक्षाही जास्त
असते. तुमचे सोने नाणे लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच
पळवून नेऊ शकत नाही.
😝😜😂😂😜😝

थोडा विचार करा

नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा असा......         शिर्डी साईबाबा  : प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड  + सोने  ३२  करोड, + गुंतवणूक ४२७ करोड 
-----------------------------------------------------------------
सिद्धीविनायक , मुंबई
पैसे - २००  करोड , FD : १२५ करोड.
-----------------------------------------------------------------
लालबागचा राजा :
१८  करोड कमाई फक्त  गणपतीच्या  १०  दिवसातली.
-----------------------------------------------------------------
गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी/मजूर मी स्वतः पाहिलेत अन - त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने  5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय.

फक्त 3 देवांची वेल्थ हजार करोडच्या आसपास आहे. 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन अडीच हजार करोड एकट्या कुंभमेळयाला ‘अलोकेट’ करणारे आमचेच सरकार एका बाजूला .
स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी -चोळी-पोशाख  करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी
--स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने आरामात आपला बँकेत ठेवलेल्या FDचे व्याज चाखत बसलेली असतात ??

मग ह्या गरिबांना मरताना सुद्धा २ रुपयाची मदत न करणाऱ्या विठ्ठल-तुळजाभवानी-स्वामी समर्थ-सिद्धिविनायकाला मी
' भिकारी ' का म्हणू नये?

मी पत्रकार नाही, जो विचार मनात जन्मला - तो आहे असा Raw स्वरुपात समोर मांडला,
एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिराचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायची ठरवली तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का?            

मुळात एवढा पैसा आला कोठून?
देव कामाला गेले होते की पुजारी कामाला गेले होते, का मंदिराचे विश्वस्थांनी  कामाला जाऊन हे करोडो रुपये घाम गाळून कमवून आणले?
लोकांचाच पैसा ना हा? मग आता दुष्काळात, गरज असताना लोकांनाच हा पैसा थोडासा मदत म्हणून दिला तर काय फरक पडला ?
हि फक्त ३ देवांची नावे होती–
आळंदी- देहू- भीमाशंकर- अष्टविनायक- महालक्ष्मी- सप्तशृंगी- शनी अन शिखर शिंगणापूर-सिद्धेश्वर यांचा आजवरच्या दानपेटीतला पैसा किती असेल ???
अन छोटी-छोटी तर हजारो मंदिरेच आहेत आपल्या देशा –राज्यात--- त्यांचे पैसे किती?

मुळात हा पैसा -म्हणजे नेमका कोणाचा आहे? देव स्वतःकडे ठेवतो का हा पैसा? कि बाकीचेच लोक वर्षानुवर्षे देवाच्या नावावर हा पैसा हाणतात?
दोन मिनिट असं मानलं कि  भक्तांची सोय करतात, तर तसंही नाही.
अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूरचे –गावातले सोडा नुसते मंदिराशेजारचेच रस्ते पहा, देवाच्या गावात असूनही तोंडातून आपसूक शिवी निघून जाईल अशी परिस्थिती!

माझ्या इथ ओरडण्याने काहीच होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे मला…
पण एक दिवस आज जन्मलेल्या या विचाराचा फायदा या-पैशाच्या-खऱ्या-मालकांना- गरीब शेतकर्यांना १०० टक्के मिळवून देईन –हे मात्र नक्की…

नाना पाटेकर

पटल तर पूढे forward करा आणि देशाला जागं करा
🇮🇳 Jai Hind 🇮🇳

Great Day Ahead

दुःखाला सांगा ' खल्लास'
प्रत्येक दिवस असतो ' झक्कास '
नका होवू कधी ' उदास '
तुम्ही आहात एकदम ' खास '
आनंदी रहा प्रत्येक ' क्षणास '
प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी ' ध्यास '
असूद्या स्वतःवर नेहमी ' विश्वास '

शुभ प्रभात..तुमचा दिवस शुभ जावो.....😊

नको मला कुणाचे 
पाच मिनिट भेटीचे,
भेटी नंतर दूर झालेले,
क्षण टोचतात आठवणीचे

हरवला कुठे तरी,
मैत्रितल्या गप्पांचा तो कट्टा
Whatsapp, फेसबुक ने,
मांडली  न बोलता शब्दांचीच थट्टा

साथ होती मैत्रीची
म्हणून झाली कमी ओझी
आता न मारवेना हाक
कारण स्टेटस त्यांच बिजी

सोबती चालणारे सुद्धा
आता कोणी न सोबत उरले
कारण आयुष्याच्या रेस मधे
सर्वानीच फॉर्म भरले

म्हणून नको मला कुणाचे 
पाच मिनिट भेटीचे,
भेटी नंतर दूर झालेले,
क्षण टोचतात आठवणीचे........

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

मंद वारा वसंताची
चाहूल घेऊन आला..
पालवी मधल्या प्रत्येक
पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची
सुरुवात ही अशीच केली..
नाविन्याच्या आनंदासाठी
तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

#gudipadwa, gudipadawa, happy gudi padawa

Happy Gudi Padwa

🌺चंदनाच्या 🎋काठीवर शोभे 🌼सोन्याचा करा🌺
🌕साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा 🍃तुरा,
🐾मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण🐾, 🌺स्ने्हाने साजरा करा पाडव्याचा सण🌺
💐 नविन वर्षात आपणास 💐
         💐 शिवनेरीची श्रीमंती 💐
         💐 रायगडाची भव्यता 💐
        💐 प्रतापगडाची दिव्यता 💐
         💐 सिंहगडाची शौर्यता 💐
        💐 सह्याद्रिची उंची लाभो 💐
       💐 हिच शिवचरणी प्रार्थना 💐
          💐 आता येतोय आपला 💐
            💐 मराठमोळा दिवस 💐
                💐 गुढीपाडवा 💐
          💐 सर्वांना मराठी नुतन 💐
       💐 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐