_किती पैसा कमावला म्हणजे_
_माणूस श्रीमंत समजावा?_

_याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी  दिले आहे,_

*_नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे,_*
*_मुलाबाळांचे रक्षण करता यावे,_*
*_आईवडिलांची काळजी घेता यावी._*
*_अब्रूने जगता यावे,_*
*_इतका पैसा जवळ असला_*
*_की तो मनुष्य श्रीमंत समजावा._*

सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते.. 

सासू : "काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली? "

सून : "पुस्तकात लिहिलंय...इन सब का मिश्रण बनाके फ्रिज में एक घंटा रखिये.."  

सासू कायमची वारीला निघाली😜😝😝😝

*सर्व पालकांना विनंती.*
या सुंदर सेवेचा लाभ घ्यावा.

पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी आपल्या प्रधानमंत्र्यांचे आणखी एक पुढचे पाऊल

राष्ट्रीय रोगप्रतिबंधक लसटोचणी स्मरण मोहीम ही नि:शुल्क सेवा आहे.

*तुम्ही फक्त एवढेच करा.*

तुमच्या बाळाचं नाव आणि जन्मतारखेचा एसएमएस संदेश 566778 या क्रमांकावर खालील सूत्रात पाठवा :-

Immunize[स्पेस]बाळाचे नाव[स्पेस]बाळाची जन्मतारीख
(हे सगळं इंग्रजी त हवं)

उदा. *Immunize Krishna 01-01-2015*

तुमच्या बाळाला लस टोचण्याची आठवण करून देणारा संदेश तुमच्या मोबाईल वर २ दिवस आधीच येईल.

तुमचं बाळ १२ वर्षांचं होईपर्यंत हे चालूच राहील.

*तुमच्या बाळाला निरोगी जीवनाची ही अनमोल अशी भेट द्या.*

कृपया हा संदेश तुमच्या सर्व मित्रांना आणि संबंधित सर्वांना पाठवा.

*ज्यांची मुले १२ वर्षे पेक्षा लहान आहेत, त्या सर्व पालकांनी ही नोंदणी करायलाच हवी.*

*एक शिष्य आहे ज्याला सुपारी खाण्याचे व्यसन आहे*

*खूप जणांनी समजवले पण सवय काही जात नाही*............

*त्याला स्वतःला हे व्यसन सोडायचे आहे पण व्यसन काही सुटत नाही*

*शेवटी कंटाळून आपल्या गुरूंकडे आला आहे......आणि संवाद चालू आहे......................*

*शिष्य: प्रणाम गुरुवर्य,.......(चाचरत...) मला, सुपारी खाण्याचे व्यसन लागले आहे........मला स्वतःला ते सोडायचे आहे..........पण काही केल्या सुटत नाही........काय करू* ?

*गुरुवर्य: (हसत)...थांब, तुला उपाय सांगतो*........

*(जागेवरून उठून एका झाडाभोवती मिठी मारतात)*

*शिष्य: (मनातल्या मनात) अरे, हे काय ......मला उपाय सांगतो म्हणाले आणि झाडाला का असे मिठी मारून बसले आहेत*

*आपण थांबूया*.......
*बराच वेळ जातो*.......
*गुरु झाडाला मिठी मारून आहे तसेच उभे आहेत*........
*तो शिष्य आता वैतागला आहे*.......

*शिष्य(कंटाळून) गुरुवर्य, मला माफ करा*.....
*पण तुम्ही मला उपाय सांगणार होता*......
*हे झाडाला असे का मिठी मारून बसलात*?

*गुरुवर्य: अरे काय करू*.....
*बघ ना.....या झाडाने मला कसे घट्ट धरले आहे*.....
*याने जर मला सोडले नाही तर मी कसा तुला उपाय सांगणार*........

*शिष्य(हसत) गुरुवर्य, झाडाने तुम्हाला नाही तर तुम्ही झाडाला धरले आह*....
*तुम्ही सोडा ना त्या झाडाला* ........
*तर ते झाड तुम्हाला सोडेल*.............

*गुरुवर्य (झाडाची मिठी सोडत आणि हसत*)
*अरे तुला जर एवढे समजते*....
*कि झाडाने मला नाही तर मी झाडाला धरले आहे*.....
*मग माझे व्यसन सुटत नाही तू असे कसे म्हणतोस*......
*अरे व्यसनाने तुला नाही तर तू व्यसनाला धरले आहेस*.......
*तू जर स्वतःच ठरवलेस तरच तू व्यसन सोडू शकतोस*.......
*नाहीतर तुझे व्यसन कधीच सुटणार नाही*...........
*आणि एक दिवस हेच व्यसन तुला शारीरिक,मानसिक धोकादायक ठरणार आहे*.......
*वेळीच सावध हो*................

*शिष्य: माफी असावी.....मी आज आपल्या समोर संकल्प करतो*....
*कि माझे सुरु असलेले व्यसन मी आताच सोडून देतो*............
*मित्रानो, आज आपण व्यसन हि संकल्पना फक्त विडी,सुपारी,मद्य,गुटखा, तंबाखू या बाबतीत मर्यादित ठेवतो*
.....
*पण आपण प्रत्येक जण व्यसनी आहोत.......आश्चर्य वाटले ? काहीजण म्हणतील .......नाही, नाही...व्यसन आणि मी.......शक्यच नाही........कधीच केले* *नाही*..........
*पण मित्रानो*....
*आज प्रत्येकाला व्यसन आहे*..........
*कोणाला रागात बोलण्याचे व्यसन आहे*.........
*कोणाला निंदा करण्याचे व्यसन आहे*.............
*कोणाला वाईट नजरेने बघण्याचे व्यसन आहे*..........
*कोणाला दुसर्याचे वाईट कसे करता येईल., याचे व्यसन आहे*..........
*कोणाला अहंकाराचे व्यसन आहे*.........
*कोणाला मी पणाचे व्यसन आहे*...........
*कोणाला दुसर्याला लुबाडण्याचे,फसवण्याचे व्यसन आहे*........
*कोणाला दुसऱ्याला विनाकारण कुजके,कोपरखळीने बोलण्याचे व्यसन आहे*........
*कोणाला आपल्या आई-वडिलांचे न ऐकण्याचे व्यसन आहे*..........
*कोणाला काही काम न करता फिरण्याचे व्यसन आहे*.........
*कोणाला अमुल्य वेळ वाया घालवण्याचे व्यसन आहे*.........
*आता प्रश्न राहतो तो विडी,तंबाखू,गुटखा,मद्य, यांचे व्यसन चालू असलेल्या मित्रांचा*.........
*आपण जरी लपून एखादे लहान-मोठे व्यसन करत असलो*......
*जरी कोणालाच त्या व्यसनाबद्दल काही माहिती नसेल* .....
*असे असले तरी दोन व्यक्तींना मात्र नक्कीच माहित आहे*.......

*१. आपले गुरु आणि*
*२.आपण स्वतः*

*वरील पैकी एखादे व्यसन जरी आपल्यात असेल तर संकल्प करूया आणि त्या व्यसनापासून मुक्त होवुया*....

गर्लफ्रेंड 🙎🏻:- जानु मला माफ कर, तुला काही
सांगायचं आहे...

बॉयफ्रेंड👲 :- सांग ना डिअर ?.

गर्लफ्रेंड 🙎🏻:- मी तुझ्यापासुन काहीतरी
लपवलंय, माझा साखरपुडा झालाय आणि
पुढच्या आठवड्यात लग्न होऩार आहे...आपण
इतका वेळ सोबत राहीलो, चँटिंग केली, पिक्चर
पाहीले, २-२ तास बोललो, आणि..............

ब्वॉयफ्रेंड👲 :- अगं बस-बस , पागल आता
रडवशील का मला,,

चल जाऊदे आज मी पण
तुला माझ्या बायकोपोरांशी ओळख करुन देतो😳😂

गर्लफ्रेंड ढगात 😝😂😂😂😂😆😆😆.


तुम्ही मांसाहार का करता??*
१)शक्ती साठी?
-- पण जमिनीवरचा सगळ्यात शक्तीशाली प्राणी हत्ती शाकाहारी आहे.
तो कधी ताकदीसाठी मांस भक्षण करित नाही!!
शेतकय्रांचा सोबत राबराब राबणारा बैल कधी मांसाहार करतो का?
अश्वशक्ती(होर्सपाँवर) ने कुठल्याही यंत्राची शक्ती मोजल्या जाते अश्व-घोडा कधी मांसाहार करतो का?
मग मांसाहार केल्यानेच शक्ती मिळते असे कसे म्हणता येईल?
२)जीभेवरच्या चवीसाठी??
*मांसाला कसली आलीय चव.*
चव सगळी त्यातल्या अष्टपैलू मसाल्यांना.
तेच मसाले वापरले तर वांग्या बटाट्याच्या भाजीलाही येईलच की चव!
३)जीवनसत्वांसाठी??
--मांसापेक्षा हिरव्या पालेभाज्या आणि सूकामेव्यात कितीतरी अधिक प्रथिने जीवनसत्वे अन् पौष्टिक पदार्थ असतात.हो ना?
मग मांसाहार कशासाठी?
खरे तर निसर्गाने
ना आपले दात मांस चावण्यायोग्य बनवलेत
ना आतडे मांस पचविण्या योग्य बनवलेत.
मानवी शरीरचनाच मूलत:
शाकाहार पूरक अशीच आहे.
असे नसते तर छोट्या बालकाला भाताच्या पेजेऐवजी मांसाचे तुकडे कुस्करून द्यायला सांगितले असते डॉक्टरांनी
याचा अर्थच हा आहे
की
माणूस नैसर्गिक मांसाहारी प्राणी नाही!
मग
का बळेच रक्त चाटवायचं जिभेला?
वैद्यकशास्त्र सांगते,मांसाहारातून पचनसंस्थेचे विकार जडतात.
मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते ज्यातून पुढे अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.
अध्यात्मशास्त्र सांगते,
मांसाहारामुळे काम,क्रोध,मद,मत्सर इ.
दुर्गुण माणसात प्रबळ होतात.
आणी असुरी प्रवृत्ती वाढते.
असं म्हणतात
वानरापासून मानव ऊत्क्रांत झाला.
वानर आजही शाकाहारी आहे.
ऊत्क्रांतीच्या प्रवासात
वानरापासून नर होताना
माणूस जानवर
कसा झाला कुणास ठाऊक?
पण माणसाचे पोट म्हणजे जनावरांची दफनभूमी नव्हे
एवढे मात्र माणसाने लक्षात घेतले पाहीजे!!!
*शाकाहारी व्हा!!!*
तनाची ,मनाची अन् आत्म्याची
पवित्रता वाढवा .🙏🏻

*मला घडविण्यात मोलाचा हातभार लावलेल्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा*
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.
       आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली.
   
     व्यासपौर्णिमेच्या दिवशी 'ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे' अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
 
     आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
 
     भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
 
     गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
 
     गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?' हेच खरे आहे.
 
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

Guru Paurnima

आज गुरू पौर्णिमा.,..
🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला
जगायला शिकवलं ,
लढायला शिकवलं...
अशा प्रत्येकाचा
मी ऋणी आहे...
असेच पाठीशी उभे रहा...
माझ्यासाठी
प्रत्येक व्यक्ती गुरू आहे,
मग ती लहान असो वा मोठी...
आपण प्रत्येकाकडूनच
नकळत खूप काही शिकत असतो....
ज्ञान, विवेक, व्यवहार
आणि आत्मविश्वास देणाऱ्या
विश्वातील सर्व गुरुजनांना 
माझा साष्टांग नमस्कार.
🙏🙏🙏🙏🙏🙏

ज्याच्या मनी गुरु विचार।।
तो नसे कधी लाचार।।
ज्याच्या अंगी गुरु भक्ती।।
त्याला नाही कशाची भिती।।
ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती।।
त्याची होई जगभरात किर्ती।।
जो करेल गुरुं ची पुजा।।
त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा।।
गुरू पौर्णिमेच्या मंगल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🍂🍁शुभ दिवस 🍁🍂

😝😝😂😂हसून हसून हार्टफेल होईल...😝😝

कोल्हापूरचा  दगडू.
रोज चिकन मटण खायची सवय...

पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेत जागा मिळाली...जरा सेटल झाल्यावर दगडू
रोज मांसाहार करू लागला...

घमघमाट सर्व बिल्डिंगमध्ये पसरत होता, सगळे शेजारि आपापसात तक्रार करु लागले...

पण रांगड्या बहाद्दराच्या नादि लागणार कोण?

शेवटी गोगटे काकांनी जबाबदारी घेतली..

समजावल्यावर दगडू म्हणाला,
"काका मी रानावर वाढलेला, लहानपणापासून हेच खात आलोय, ती सवय कशी सुटेल?"

काका म्हणाले, "अरे बाळ, तू पूर्वी वेगळ्या संगतीत होतास, आता तु अस्सल विद्वानांमध्ये आला आहेस !! तुला कळतय का तू किती भाग्यवान आहेस ते?!!"

शब्दाने शब्द वाढला पण निष्कर्ष निघेना..

शेवटी काका म्हणाले, "ह्यावर एकच उपाय तू शाकाहारी बनले पाहिजेस"

तो म्हणाला, "हे कसे शक्य आहे?"

काकांनी थोडंसं पाणी घेतले, शांतपणे डोळे मिटले, दिर्घ श्वास घेऊन त्यांनी नमस्कार केला…

पुन्हा थोडे पाणी घेऊन ते दगडूवर शिंपडून ते म्हणाले, "तू धनगर म्हणून जन्माला आलास , धनगर म्हणूनच वाढलास, पण आता तू ब्राम्हण आहेस …!!"

भारावून गेलेला दगडू, काकांच्या पाया पडला...

काकांनी त्याला मनापासुन आशिर्वाद दिले आणि सोसायटीची एका त्रासापासुन सुटका झाल्याचा निश्वास सोडला…

संध्याकाळी जोशिंनी हळूच काकांना सांगीतले की त्यांनी दगडूला दूकानातून चिकन घेउन येताना पाहिले…

तावातावाने जोशी अन् गोगटे दगडूकडे आले…

तर खरेच स्वच्छ धुतलेलं चिकन ताटात ठेऊन पाठमोरा उभा असलेला दगडू त्यांना दिसला…

काका काहि बोलणार ईतक्यात…

……दगडूने हातात पाणी घेतलं आणि ताटावर शिंपडून दगडू म्हणाला, "तू कोंबडी म्हणून जन्माला आलीस , कोंबडी म्हणूनच वाढलीस…
……पण आता तू कोबी आहेस…!!!"🐓

दगडू जोमात.. आणि काका कोमात..
😂😂😂😜😜😝😝 हसु नका फॉरवर्ड करा मार्केट मधे नविन आहे

पाचवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठ­ी लिहलेले
लव्ह लेटर....

प्रिय. अंजु. . . . .
लव्ह लेटर पाठवण्यास
कारण की,
मला तु खुप आवडतेस..
तु पण माझ्याकडे सारखी बघत असतेस..
.
म्हणुन मला वाटतंय,
मी पण तुला आवडतो.. .
मी जर तुला आवडत असेन
तर,
मला गणिताच्या पेपरला मदत कर..
.
तु डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ,
तुझ्या मागं मंदाकिनी बसते
ना..
.
ती तुझ्या रिबीन वर पेनची शाई सोडते, मला तिचा खुप राग येतो..
.
ती माझ्या घराशेजारीचं राहते,
शाईचा बदला घ्यायचा
म्हणुन मी तिच्या घराची बेल वाजवुन पळुन
जातो..
.
तु फेअर अँन्ड लव्हली लावत जा, आणखी गोरी होशील..
.
तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि सोनाली दोघीही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत.. .
पण त्या मला आवडत नाही..
.
पत्राचा राग आल्यास मला परत दे..
.
सरांना देऊ नकोस......
.
तुझा प्रियकर...
संजु