No one really very busy, it's all about priorities

अमेय चा फोन सहाव्यांदा खणखणला..

......... तसा थोडासा वैतागत फोन उचलत "हेलो ...बोल लवकर...ऑफिस मध्ये खूप काम आहे...शिवाय एका मिटिंग मध्ये आहे.."

" अरे मी सुयश बोलतोय. अरे आई ला हॉस्पिटल ला नेलंय ...घरात चक्कर येउन पडली आणि डोक्याला जखम झाली...आत्ता बेशुद्ध अवस्थेत आहे .पण डॉक्टर म्हणाले काळजी करायचं काही कारण नाही...तू येतोस का हॉस्पिटल ला ? "

" ओह्ह सो सोरी सुयश..अरे आता एक महत्वाची मिटिंग आहे...ती झाल्यावर एका क्लायंट कडे जायचंय ...तिथून निघालो कि संध्याकाळी येतोच तुझ्या आई ला बघायला हॉस्पिटल ला.."

तसा काहीसा गोंधळत सुयश म्हणाला "मित्रा....आई माझी नाही...तुझी आहे हॉस्पिटल मध्ये...तुला शेजारच्यांनी ५ वेळा फोन केला पण तू उचलला नाहीस...म्हणून त्यांनी मला फोन केला..मी पण एका मिटिंग मधेच होतो..पण ती तशीच सोडून थेट हॉस्पिटलला गेलो...सर्व formalities पूर्ण करून आईला Admit केलं.."

तसा काहीसा किंचाळत अमेय म्हणाला " अरे बापरे....थांब मी निघालोच लगेच...मिटिंग वगैरे सगळ्या पुढे ढकलतो...लगेच येतो, तू तिथेच थांब.."

अमेय आल्यावर सुयश च्या अक्षरशः पायाच पडला..." I am very sorry सुयश....." सुयश च्या नजरेला नजर मिळवायची हिम्मत राहिली नसल्यामुळे खाली मान घालून अमेय भावनेच्या भरात रडू लागला..
त्यावर सुयश त्याला धीर देत म्हणाला " अमेय...अरे त्यात तुझी चूक नाही...तुला जेव्हा हे कळलं कि आई माझी नाही ,तर तुझी हॉस्पिटल ला आहे...लगेच आलास न धावत..ह्यात मी तुला दोष देत नाही...पण मी एक वाक्य कुठेतरी वाचलं आहे...
No one is really very busy..Its all about priorities..

आपण सगळे तसेच आहोत...अमेय..आई कुणाचीही असो..आई शेवटी आई असते.."
" चल ...काहीही लागलं तरी सांग..मी आता जातो ऑफिस ला ..रात्री येतो जेवणाचा डबा घेऊन तुझ्यासाठी..तो पर्यंत 'आपल्या ' आईची काळजी घे..."

अमेय चे हात मात्र नकळत सुयश च्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत जोडले गेले होते.
आणि त्याच्या मनात तेच वाक्य घोळत राहिलं ......
No one is really very busy..Its all about priorities..

भुतांच्या गमती

वाचाल तर वाचाल
भुतांच्या गंमती..!! 💀💀💀

कोकणात १४ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.

१) वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्चे ही वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो.   

२) ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणांचे मानले जाते.जो वेदात निपूण आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.त्याचे हे भूत.

३) समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंवा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवस्थानाच्या आड मार्गे केला तर देवस्थान देखिल पुढे येत नाही.

४) देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहानभूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.

५) मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य स्थान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.

६) खविस: हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो.हे फार ञासदायक भूत असते.ज्याला अतिशय क्रुररीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.

७) गिर्या / गिर्हा - जो माणूस बुडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे. हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फारत्रासदायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हे भूत त्याचा गुलाम बनते.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या माणसावर सर्व तर्हेची संकटे आणून सोडतो.

८) चेटकीण : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

९ ) झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते.

१०) विर - हे भूत क्षत्रीय समाजाच्या व्यक्तीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.

11) लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते .

12) खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते

13) बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किंवा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते.

वरील सर्व भुते गावांच्या आसपास असतात त्यामुळे जंगलातून ट्रेकीग करणा-याना या भुतांचा अजिबात त्रास होत नाही फक्त गावाच्या आसपास जाऊ नये. ट्रेकीॆग  करणा-याना बाधणारे एकच भूत 'चकवा'

14) चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही ....

(वरील माहितीची सत्यता............ कोकणातील भूतांनाच माहित?!😆💀)

माणसे

आयुष्यात कधी वाईट वेळ
आलीच नसती..तर आपल्यात
लपलेले परके आणि
परक्यात लपलेले आपले
कधी कळलेच नसते...
आपल्या माणसांसोबत वेळ
नाही कळत. पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच
कळतात...

Freedom 251

iPhone  लेने के लिए दो लड़कों ने अपनी किड्नी बेच दी
( अमेरीका की सत्य घटना )

Freedom 251 लेने के लिए एक लड़की ने घर की रद्दद्दी बेच दी
( घाटकोपर ऐरीया की सत्य घटना )
😝😝😝

फूल खाली पडतील पण सूगंध नाही.... !!

चंद्र खाली जाईल पण तारे नाही.... !!

नदीतील पाणी संपेल पण सागरातील नाही.... !!

तुम्हाला सारे जग विसरेल पण मी नाही.... !!

पाण्यापेक्षा " तहान " किती आहे याला जास्त किंमत असते.... !!

मृत्यू पेक्षा "श्वासाला " जास्त किंमत असते.... !!

या जगात नाते तर सर्वच जोडतात,
पण नात्यापेक्षा " विश्वासाला " जास्त किंमत असते .... !!

कायम सर्वांच्यासाठी विश्वासपात्र रहा... !!

संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही

जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि
सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.नाहीतर, मी उपाशी मरेल.
आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.
"संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही"

Maitriche Nate

🍃पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्या साठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
" मैत्री  "मैत्रीच नांत कस जगावेगळ असतं,
रक्ताचं नसल तरी मोलाःच असत...🌿

शोधायच आहे... फक्त प्रेम

तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या ओठांवर मला फ़क्त हसने पहायचय
तुझ्या चेहर्यावर सुख पहायचय मला मला
तुझ्यावर खुप प्रेम करायचय असच एकदा
तुझ्या स्वप्नात यायचय अलगद तुझा हात
माझ्या हातात घ्यायचाय
तुझे डोके माझ्या कुशीत घेउन बसायचय
मला तुझ्यावर खुप प्रेम करायचय तू समोर
नसतानाही तुला अनुभावयचय तेव्हाही
तुला खुप आनंदी पहायचय माला फक्त
तुझ्यासाठी जगुन पहायचय खरा तर
तुझ्यावर खुप प्रेम करायचय तुझ्या समोर
येउन मला सर्वस्व हरवून बघायचय
आणि पुन्हा पुन्हा मला तुझ्या डोळ्यात
शोधयाचय...
ते फक्त प्रेम,

अनाथ आश्रम

लोक म्हणतात.....
मुलीना जर आई वडिला चा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीचं अनाथ आश्रम मधे गेलं नसतं......
पण दादानो..प्रतेक मुली ने जर सासु सासरे सांभाळले असते तर..जगात अनाथ आश्रमचं राहिल नसत..

ब्रिटीश काळात कोकण विभाग

ब्रिटीश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटीश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी असे तीनच जिल्हे होते.
भारताचा पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटक व केरळ मधे मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.
प्राचीन व पौराणिक
समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र
पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णुचा सहावा अवतार असलेल्या श्री परशूरामाने केली. परशूरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्र केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वत: परशूराम दक्षिण पर्वतांवर निघुन गेले व तेथे त्यांनी शूर्पारक देशाची निर्मीती सागरा पासुन केली असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो.
पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्या प्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशूरामाच्या बाणाच्या टप्प्या पर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्या प्रमाणे परशूरामाने सह्याद्री वरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्या नंतर परशूराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.
कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मीती देखिल परशूरामाने केली अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. पण गोमंतकातील (गोव्यातील) गौड सारस्वत व केरळ मधील नंबूथिरी ब्राम्हणांच्या उगमा संदर्भात देखिल याच प्रकारच्या परशूराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात अनेक ठिकाणी या आख्यायिकेला अनुरूप असे पुरावे सापडतात. रत्‍नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशूराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशूराम मंदिर आहे.
प्रमुख आकर्षणे
मंदीरे व देवस्थाने
गणपतीपुळे
लोटे परशुराम
वेळणेश्वर
मार्लेश्वर संगमेश्वर
कर्णेश्वर संगमेश्वर
गणपती मंदिर आंजर्ला
पाली (रायगड) अष्टविनायक
मह्ड (रायगड) अष्टविनायक
हेदवीचा दशभुजा गणेश
रेडीचा गणपती
दीवेआगरचा सुवर्णगणेश्.
जलदुर्ग
सिंधुदुर्ग किल्‍ला
विजयदुर्ग किल्ला
मुरूडचा जंजीरा
सुवर्ण दुर्ग
पर्यटन स्थळे
अलिबाग
वेंगुर्ला
गुहागर
श्रीवर्धन
हरिहरेश्वर
रत्‍नागिरी
महाराष्ट्राचे भूषण रायगड किल्ला.
मालवण
मुरूड- हर्णे
थंड हवेची ठिकाणे
माथेरान
आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)
Beauty Of Konkan  निसर्ग सौंदर्य कोकण's photo.