Desh Droh...

महाकवी नामदेव ढसाळांची खालील कविता जरूर वाचा. मगच माझ्या कविता आणि भाषेला नाव ठेवा.
॰॰॥देशद्रोह॥॰॰

'माणूसकीच्या रक्ताचा अभिषेक
घेणा-या शेंड्या ऊपटणे', असेल देशद्रोह...
तर हो!
मी केलाय देशद्रोह!!

हो, मीच मारल्यात ढेराळलेल्या
भटशाहीच्या ढुंगनावर लाता
अन् मारत राहिन तिच्या
माकड हाडाचे मणके गळेपर्यंत...

आम्ही मागितला न्याय ,
तो देशद्रोह?
आम्ही म्हणालो 'समता-बंधुता',
तो देशद्रोह?
आम्हाला तुमचा धर्म नको
नकारतो तुमचे नपुसक देव,
देशद्रोह?
आम्ही म्हणतो 'चला एक होऊ, जाती तोडू'
तोहि देशद्रोह?

तुमच्याकडे नेहमीच असते 'हाफ चड्डी'
झाकायला तूमच्या कंडाळ संस्कृतिची लाज
तूमच्या मार्मिक भाषेला असतो
'धेड - लांडे' शब्दांचा साज...

तूमच्या छिनाल भेजातून
प्रसवणारा प्रत्येक विचार तूमची देशभक्ती असते?
तुम्ही मारता 'सत्यधर्माचे' पहारेकरी,
देशभक्ती?
तुम्ही काडता नथुरामी गेंड्यांचे जुलुस,
देशभक्ती?
तुम्ही जाळता 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' ,
देशभक्ती?

आमच्याकढे बोट दाखविणा-या
मनुवादी दलदलीतील गांडुळांनों!
जरा डोकावून पहा
तुमच्याच बोच्यातुन सुटते
देशद्रोहाची दुर्गंधी...!!
० नामदेव ढसाळ

No comments:

Post a Comment