महाराजांचे शत्रू महाराजांचा उल्लेख सिवा असा करायचे. भूषणा ने या छंदात सिवा म्हणजे शिवराय आणि सिवा म्हणजे शंकर या दोन नावातील सारखे पणा मुळे शत्रूं च्या मनात उडालेला गोंधळाचे चित्र वर्णन केले आहे.
साहितनै सरजा के भय सौं भगाने भूप,
मेरू के लुकाने ते लहत जाँइ ओत है |
भूषन तहाँ हूँ मरहट्टपति के प्रताप,
पावत न कल अति कौतुक उदोत है |
'सिव आयौ सिव आयौ' संकर की,
आमदनी सुनिकै परान ज्यौ लगत अरिगोत है |
'सिव सरजा न यह सिव है महेस' तब जाके,
उपदेस जच्छ रच्छक से होत है ||
:- कविराज भूषण
साहितनै सरजा के भय सौं भगाने भूप,
मेरू के लुकाने ते लहत जाँइ ओत है |
भूषन तहाँ हूँ मरहट्टपति के प्रताप,
पावत न कल अति कौतुक उदोत है |
'सिव आयौ सिव आयौ' संकर की,
आमदनी सुनिकै परान ज्यौ लगत अरिगोत है |
'सिव सरजा न यह सिव है महेस' तब जाके,
उपदेस जच्छ रच्छक से होत है ||
:- कविराज भूषण
शहाजीपुत्र शिवरायांच्या भयाने अनेक राजे मेरू पर्वतात पळून जाऊन आराम करत आहेत. पण तेथेही या मराठापती प्रतापाची प्रभा प्रकटतेच आहे. "शिव आला, शिव आला," अशी हाकाटी आल्यावर या शत्रूंच्यात आणि त्यांच्या नातेवाइकात प्राण वाचवण्यासाठी पळापळ होते आहे. पण तेवढ्यातच " अरे बाबा, हा शिवाजी नाही, शिव महेशच आहे," असे सांगून दक्ष यक्ष त्यांचे निरासन करत आहेत.
No comments:
Post a Comment