सूर्योदय झाला शिवनेरी वर
शिव सूर्याचा जन्म झाला
सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात
शिव वादळाचा जन्म झाला
पारतंत्र्याचा अस्त करण्या
शिव शक्तीचा जन्म झाला
धन्य झाली आई जिजाऊ
शिव पुत्र हा जन्मास आला
धन्य धन्य झाला महाराष्ट्र
शिव राज्याचा जन्म झाला
या मायभूमीचे रक्षण करण्या
शिव मराठा जन्मास आला
जात पातीचे तोडन्या बंध
शिव धर्माचा जन्म झाला
हिंदवी स्वराज्य घडविण्या
शिव छत्रपतीचा जन्म झाला.
१९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना शिव-शुभेच्छा।।

No comments:

Post a Comment