मकरसंक्रांत महत्व आणि पूजा माहिती

*"श्री मकर संक्रांतीचे महत्व व पूजेची माहिती".....*

*"मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे".*

यावर्षी  दिनांक १४ ला भोगी, १५ ला मकर संक्रांत, १६ ला किंक्रांत हे मंगलमय सण हा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे.

*संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-*

फार वर्षापुर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेश करतो, हा काळ अत्यंत पुण्यकाळ समजला जातो.

या तीन दिवशी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत.  सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण. वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची बारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.

*मकर संक्रांतीचे महत्व, माहिती व सौभाग्यवतीनी ही पूजा कशी करावी:-*

जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते.

*भोगी :-*

*दि. १४/०१/२०१९ रोजी सोमवार...*  

पौष शुक्ल पक्ष अष्टमी ह्या दिवशी भोगी हा सण आहे.
ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी अजुन मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

*श्री सुर्य संक्रमण :-*

शके १९४० पौष शु. ८ ला रविवार दिनांक १४/०१/२०१९ रात्री ०७:५१ मिनीटांनी श्रीसुर्य मकर राशीत प्रवेश करत आहे.

*मकर संक्रांत :-*

*मकर संक्रांती माहिती :-*

पर्वकाळ पौष शु ९ ला दिनांक १५/०१/२०१९ मंगळवार सकाळी सुर्यदय ०७:१४ मी पासुन ते सुर्यास्त संध्याकाळी ०६:२० मी पर्यत आहे.

*संक्रांती फल :-*

संक्रात वाहन सिंह, उपवाहन हत्ती आहे.
पांढरे रंगाचे वस्ञ परिधान केले आहे. हातात भृशुंडी शस्त्र
घेतलेले आहे. कपाळावर कस्तुरीचा टिळा लावला आहे. वयाने बाल आहे. वासाकरिता चाफ्याचे फुले घेतले आहे. देव जाति आहे. अन्न भक्षण करते आहे.  भुषणार्थ प्रवाळ रत्ने धारण केले आहे. वार नांव व नक्षञ नांव ध्वाक्षी आहे. प्रवास दक्षिणे कडून उत्तरेस जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे.

*पुजा साहित्य :-*
पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.

पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे. वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.

संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.

मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात. जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.

मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात  *“तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला”* तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.

संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्ट्रात  पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.

संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी *कीक्रांत* असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले  काम करू नये.

*किंक्रांत :-*

दि १६/० १/२०१९ रोजी बुधवार.

पौष कृष्ण दशमी हा दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन असतो. ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत ह्या दिवशी अजुन किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात.

*यंदा १५ जानेवारीला मकर संक्रांत आहे.*

इ. स. १९७२ सालापासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून मकर संक्रांत १६ जानेवारीला येईल. तर ३२४६ मध्ये मकर संक्रांत चक्क १ फेब्रुवारीला साजरी केली जाईल, अशी रंजक माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासक यांची आहे.

त्यामुळे मकर संक्राती पुण्यकाळ यावेळी १५ जानेवारी रोजी आली असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येते  हे खरे नाही. सुर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास, नऊ मिनिटे व दहा सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या  वर्षी `लीप वर्ष’ धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो.

मकर संक्रांती ही वाईट नसते. `संक्रांत आली’ हा शब्दप्रयोगही आपण चुकीच्या अर्थाने वापरत असतो. दिनमान वाढत जाणे,  त्याच दिवशी, शिशिर ऋतुचा प्रारंभ झाला. मकर राशीला तीळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो. मकर संक्रांतीच्या  वेळी काही अफवा पसरवितात त्यावर विश्वास ठवू नका तसेच अफवा पसरवू नका असे आवाहनही मी करतो ही विनंती आहे.

*हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.*

*संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व :-*

*या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.*

*संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।*

*तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।*

( मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

शास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनूसार काही उपाय करावेत. या उत्तरायणात राशीनूसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.

*मेष -*
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी इच्छापूर्तीसाठी  तीळ आणि मच्छरदानीचे दान करावे.

*वृषभ -*
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे.

*मिथुन -*
या राशीचा स्वामी बुध आहे. हिरवे कापड, तीळ, मच्छरदानीचे दान करावे.

*कर्क -*
या राशीचा स्वामी चंद्र आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी साबूदाणा आणि लोकरीचे वस्त्र दान करावे.

*सिंह -*
या राशीचा स्वामी सूर्य आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी माणिक रत्न, गहू, लाल कापड, लाल फूल , गुळ , सोने, तांबे, चंदन दान करावे.

*कन्या -*
या राशीचा स्वामी बुध आहे, राशीच्या स्वामी ग्रहानुसार तेल, उडीद, तिळाचे दान करावे.

*तूळ -*
या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी तेल, रुई, वस्त्र, तांदूळ दान करावेत.

*वृश्चिक -*
या राशीचा स्वामी मंगळ आहे. गरिबांना तांदूळ , खिचडी, धान्य दान करावे.

*धनु -*
या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी तीळ व हरभ-याची डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल.

*मकर -*
या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांनी तिळ, तेल, काळी गाय, काळे वस्त्र यांचे दान करावे.

*कुंभ -*
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनि आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी  तीळ, साबण, वस्त्र, कंगवा आणि अन्नदान करावे.

*मीन -*
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी मध, केशर, हळद, पिवळे वस्त्र यांचे दान करावे.

*सुचना :-*
दर वर्षी मकर संक्रांति संदर्भात...ही संक्रांत अशुभ आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार कधीच नसतो. त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

*ज्योतिषरत्न :-*
*डॉ. सुधाकर कुडू,*

स्वतःचे मन

आयुष्य स्वत:च्या मनाप्रमाणे जगा...
उध्वस्त झालो तरी स्वत:च्या मस्तीमुळे
आणि
जिंकलो तरी स्वत:च्या दमावर

Husband and wife Jokes

#funpost

सकाळी बायकोने नवऱ्याकडे वर्तमानपत्र मागीतले...
.
नवरा :- किती मागासलेली आहेस ग तु?
.
विज्ञान किती पुढे गेले आणी तु अजुन वर्तमानपत्र मागतेस....???
*हा माझा टॅब घे......*

बायको टॅब घेते आणी त्याने झुरळ मारते....।।
.
.
नवरा बेशुध्द...

.
तात्पर्य : बायको जे मागते ते तिला आपलं डोकं न लावता
द्या,
तुमची हुशारी फक्त ऑफीस पुरतीच ठेवा.
😂😂😂

Husband Wife Marathi SMS

*सांगा काय चुकलं त्या नवऱ्याचं ?*

बायको : बाजारातून दुधाची एक पिशवी घेऊन या,आणि जर बाजारात केळी दिसली तर ६ घेऊन या
😳नवऱ्यान दुधाच्या ६ पिशव्या आणल्या ,
बायको : दुधाच्या ६ पिशव्या ?
नवरा: हो,दुधाच्या 6 पिशव्या आणल्या कारण बाजारात केळी दिसली.

आता सांगा काय चुकलं त्या नवऱ्याचं ?

🤔🤭🤫🤗🤠😎
नाही ना कळलं. परत एकदा वाचा.🤣🤣🤣🤣

हरवलेल्या कोकणची गोष्ट

*कोकणचं भोळंभाबडं गाव हरवून गेलं...*

##########################

      *पूर्वी कोकण गरीब होतं... गावे भोळी-भाबडी, साधी होती... माणसे गरीब होती... प्रेम आपुलकी होती... शेती करून पोट भरत होतो... भात, नाचणी, वरी, कुळीथ, उडीद, हरिक ही पीक पिकवून बाराही महिन्याचे दिवस उजळलेले असायचे... नानातऱ्हेच्या भाज्यांची तर कमतरता नव्हती... परसवनात आठ दिवसाने टोपलीभर भाजी तयार होत होती... शेतीला जोडव्यवसाय म्हणून डझनभर गुरेढोरे होती... घरात घागरभर दूध दुभत होतं आणि कोणाकडे नसेल तर मागील दाराने शेजाऱ्याकडून चहा पुरते आणून पाहुण्यांचे आदरातिथ्य होत होतं... डालगाभर कोंबड्याही होत्या... घरात सात आठ माणसे असूनही तीन वेळच कसंबसं पोटभर अन्न मिळत होतं... पेज, जाडा तांबडा भात, हरकाचा भात, नाचण्याची भाकरी, कुळथाची पिटी आणि कधी ना कधी सुकी भाजलेली तारली किंवा बांगडा खाऊन मन तृप्त होत होतं... त्याला अमृताची चव येत होती आणि रात्री निजताना डोक्यावर पळीभर खोबरेल तेल घसघसून घासायला मिळाले की आम्ही ऐहिक जगातल्या सुखाच्या राशीवर लोळत होतो...*
       *आमचे ते दिवस मंतरलेले होते... पैसा गाठीला नसला तरी ते वैभव आणि खरी श्रीमंती होती... दरम्यानच्या काळात आम्ही परंपरे प्रमाणे मुंबईत आलो आणि मुंबईतल्या जीवनशैलीचे गावाला बरे वाईट परिणाम दिसू लागले... गेल्या काही वर्षात हळू हळू कोकणची जीवनशैली बदलू लागली आणि आमचे भोळे भाबडे गाव हरवून बसलो... गावात शहरी जीवनशैलीचं अनुकरण होऊ लागलं... आता तसेच झाल्याचे दिसून येते... दिवस बदलत आहेत... गावात सरकारच्या आशीर्वादाने पिवळ्या आणि केसरी रेशनकार्डावर तीन रुपयात तांदूळ आणि दोन रुपयात किलोभर गहू मिळू लागले आणि नाचणी, वरीची भाकरी मागे पडत चपाती दिसू लागली... हरिक, वरी ही कॅल्शियम युक्त धान्ये जवळ जवळ संपून गेली... आता तर आम्ही जमिनीच संपवायला निघालोय, परप्रांतियांच्या घशात घालून.!*
       *चहापुरते दूध, सारवायला शेण हवे म्हणून गुरे ठेवून कुठेतरी भात शेती दिसतेय... पण ती करताना आधुनिक यंत्राने करू लागलो... कोल्हापूरवरून येणारे वारणा आणि गोकुळ दूध व घाटावरच्या भाजीवर कोकण जगू लागले...*
       *लग्न समारंभ मुंबईसारखे होऊ लागले... पण पत्रावळीवर असलेलं भाताचे मूद, गोडी डाळ, काळ्यावाटण्याची उसळ, खीर, वडे हे आपले पारंपरिक सात्विक जेवण मागे पडले... पुऱ्या, कुर्मा भाजी, छोल्याचे जेवण मुंबईसारखे जेवू लागलो... असे नाना तऱ्हेचे बदल दिसू लागले... पूर्वीच्या नळ्याची कौलारू, लाकडी अशा गार गार आणि हवेशीर घरांऐवजी स्लॅबची आणि लोखंडाची झ्याकबाज घरे गावात दिसू लागली... आणि ती फक्त सणासुदीपुरती उघडू लागली... गावची खुशाली पत्रव्यवहार हे मोबाईल फोन, व्हाट्सअप आणि मनिऑर्डर या बँक ट्रान्सफर द्वारे होऊ लागले...*
       *सर्वसाधारणपणे सध्या मुंबईची जीवन शैली तीच कोकणची जीवन शैली बनू लागली आहे... गावची माणसे अलीकडे कामे सोडून टीव्ही सिरियल्स, मोबाईल यामध्ये गुंतलेली आहेत... आम्ही गाव सोडून मुंबईला आलो, याचे दुःख अजिबात नाही त्यामुळे प्रगती झाली, याचे समाधान जरूर आहे... पण माझे भोळेभाबडे गाव आता कायमचे हरविले याचे शल्य माझ्या मनात कायम राहणारे आहे...*
**************************************
*(कोकणची सत्य परिस्थिती मांडलेली आहे)*

⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱

बाळासाहेब ठाकरे

साहेबांचे काही वाक्ये

अन्याय करू नका, आणि सहन तर मुळीच  करू नका....
           - बाळासाहेब ठाकरे🚩

जो तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचाच मान राखा.
               - बाळासाहेब ठाकरे🚩

तुकड्यासाठी शेपूट हलवाल तर तुम्ही कुत्र्याच्या आवलादीचे मानला जाणार.
               - बाळासाहेब ठाकरे🚩

हिंदूस्थानात राहून हिंदूधर्मावर शस्त्र उचलनार्याला चिरडून टाका
               - बाळासाहेब ठाकरे🚩

प्रत्येक हिंदू. हा झोपलेला वाघ आहे, फक्त जागं व्हायची वेळ आहे.
                 - बाळासाहेब ठाकरे🚩

दाऊद तुमचा तर अरुण गवळी आमचा.
                - बाळासाहेब ठाकरे🚩

गांडूची आवलाद म्हणून जगू नका.
              - बाळासाहेब ठाकरे🚩

हिंदू असून हिंदू धर्माचा अपमान करता, तर तुम्ही हिजडे आहात
            - बाळासाहेब ठाकरे🚩

मुंबई कुणाच्या बापाची नाहीए. मुंबई आपली आहे आपली...आणि इकड आवाज ही आपलाच हवा.
             - बाळासाहेब ठाकरे🚩

मला अभिमान आहे त्या शिवसैनिकांचा ज्यांनी बाबरी पाडली.
                 - बाळासाहेब ठाकरे🚩

शिवसेनेच्या नादी लागू नका. जळून भस्मसात व्हाल.
            - बाळासाहेब ठाकरे🚩

कधीही कुणाची गुलामगिरी पत्करू नका. नाहीतर तुम्ही षंड आहात हे सिद्ध होईल.
                - बाळासाहेब ठाकरे🚩

शिवसेना ही मराठी माणसाच्या मनातील एक आग आहे.  
             - बाळासाहेब ठाकरे🚩

मी उगाच मानत नाही बाळासाहेब ठाकरे यांना. त्यांचे विचार आणि हिंदू धर्मावरील कार्य आणि लढा हा मला प्रेरित करतो

बाळासाहेब नसते तर हा महाराष्ट्र  अखंड राहिला नसता

मुंबई सुरक्षित राहिली शिवसेनेमुळ. बाळासाहेब ठाकरे या नावामुळ.

मुंबई सोडा ओ .... हा महाराष्ट्र सुरक्षित राहिला तो बाळासाहेबांमुळ.......

बाळासाहेब जाता जाता सांगून गेले.
    "रडायचं नाही, लढायच"....

      एक कट्टर हिंदू
  🚩
        : बाळासाहेब ठाकरेंच एक वाक्य कायम लक्षात ठेवा

"ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेड म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवितात आणि हुशार लोकं तोच इतिहास वाचतात...!!!"
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹
💐💐💐💐💐💐💐💐   
   🚩🙏जय महाराष्ट्र🙏🚩

आदर्श गाव बामण डोंगरी

*👉*बामणडोंगरी *  एक आगळेवेगळे आदर्श गाव .... 👌👌*

               * पनवेल * पासून 14 की मी *व्* *मुम्बई * पासून फक्त 35 कि. मी. अंतरावर *बामणडोंगरी * गाव* आहे. गावाची एकूण लोकसंख्या पाच हजाराच्या वर आहे.
             
*गावाचे आगळेवेगळे उपक्रम*

*१)* गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतचा कर १००% भरतात त्यांना वर्षभर दळण मोफत दळून मिळते.
*२)* गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
*i)* पिण्याचे RO चे पाणी
*ii)* वापरायचे पाणी
*iii)* साधे पाणी
*iv)* गरम पाणी

  पिण्याचे RO चे पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत. ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
  गरम पाणी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
*३)* ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
*४)* गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
*५)* गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
*६)* गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
*७)* नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
*८)* सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
*९)* संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
*१०)* लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
*११)* एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
*१२)* हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
*१३)* ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके आहेत.
*१४)* गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
*१५)* गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
*१६)* गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व देणगीदार गावकऱ्यांना मोफत जेवन देतो.
*१७)* गावात ग्रा. पं. द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
*१८)* गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
*१९)* सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिबय पक्ष नाही.
*२०)* प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
*२१)* घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
*२२)* गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
*२३)* गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
*२४)* धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत
*२५)* ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .

*२६)* ग्रामपंचायत कार्यालयात  व सभागृहात वातानूकुलित ( ए.सी.) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
  
*👉 असे हे आगळेवेगळे आदर्श गाव .... 👌👌*

आपल्या गावात आशी व्यवस्था व्हावी वाटेत आसेल तर गावातील सर्व नागरिकांना हा मेसेज पाठवा आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केले तर आपलेही गाव आदर्श गाव बनेल

*धन्यवाद .... 🙏*

(ही बातमी आपल्या *सरपंचा* पर्यंत जाऊ द्या ....)

मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?

मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?
---------------------------------------------------------------
माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे? मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.

बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे. गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.

आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.

पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे? एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का? पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का? कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का? जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही.
http://m.facebook.com/MarathiVichar9
याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची.

कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड... कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकीडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल? शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.