Marathi Jokes Collection

बासुंदि चा full form सापडला......... .!
.
.
.
"बायको सुंदर दिसते "
👌👌
टीप - स्वतःची का दुसऱ्याची हा मात्र वादाचा विषय असू शकतो 😂



लंगड्या दादा लंगड्या दादा
आर्ची ताई म्हणती आर्ची ताई म्हणती
त्या दिवशी मंग्या च्या विहिरि वर
कोणती साबन लाऊंन आलता??

लई मोठा फेस केलता😳

लंगड्या- पतंजलि

डील : या वेळी नापास झाला तर मला यापुढे बाबा म्हणून हाक मारू
नकोस.(परंपरेनुसार आपला मंग्या यंदाही नापास झाला).
वडील : काय लागला
निकाल?
मंग्या : माफ कर रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारणं बहुतेक नशिबात नाही
रे माझ्या..

प्रेमात रस नाय,
रापणिक मासो नाय,
जावचा होता पैसो कमवक अमेरिकेत,
पण......
शिरा पडली ती,
मालवणातसुन बस
नाय.........!!




Excellent Thoughts in Marathi

आयुष्यात स्वत:ला कधी 'उध्वस्त' होऊ देऊ नका..कारण लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत..
संकटावार अश्या प्रकारे तुटून पड़ायच की....जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे..!

  कडू औषध आपण
लगेच गिळून टाकतो
   पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले
   वाईट क्षण लगेच विसरा
 आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!!

       हळवी असतात मने
       जी शब्दांनी मोडली जातात.  
       अन शब्द असतात जादूगार
      ज्याने माणसे जोडली जातात

काही शब्द असतातचं असे की ते नेहमीचं ऐकावेसे वाटतात.
काही नाती असतातचं एवढी गोड की,
ती कधीच संपू नयेत असचं वाटतं.
आणि काही माणसं असतातचं अशी की,
ती नेहमी "आपलीचं" असावीत असचं वाटतं, अगदी शेवटपर्यत...!!

"आई" म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी" म्हणजे देवाने दिलेली भेट...
आणि "मित्र" म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....
खरी "मैत्री" ही "हात" आणि "डोळया" सारखी असावी...
हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते, आणि
डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो 🌿

आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे
आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.
जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,
परंतु एक वडीलच असे आहेत 
की,जे आपल्या मुलाला
आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.

वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं. त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे दिसली नाही.
काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असच असावं
दिसत नसलं तरी गोडवा आणि आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत.

शांत स्वभावाचा माणूस
         हा कधीही कमजोर नसतो...
        कारण या जगात पाण्यापेक्षा
           मऊ असे काहीच नाही...
   पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर
    भले भले डोंगर हि फोडून निघतात...
    माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
        तो पैसा कमविण्यात नाही.

          " जीवन आहे
          तेथे आठवण आहे."

            "आठवण आहे
           तेथे भावना आहे."

             "भावना आहे
             तेथे मैत्री आहे."

            आणि मैत्री आहे
     तेथे नक्कीच,तुम्ही आहात..!

मैत्री - प्रेम

प्रेम सुंदर आहे" कारण ते
हृदयाची काळजी घेते
पण
"मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे"
कारण
मैत्री दुसर्यांच्या हृदयाची
काळजी घेते....

*कसं जगावं..?  🙄🙄🙄*  😬😜

*मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕*
*श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼*

*पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽*
*पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮*

*नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.*
*चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗*

*वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴*

*आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽*

*जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂*
*आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺*

*तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣*
*दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼*

*मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹*

*सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.*
*नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱*

*सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻*
*स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓*

*खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏*
*आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂*

*तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼*
*अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼*

*लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..?*  *जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔*

*मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..*
*फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!*
*आपण का शरमून जायचं..?*
*कशासाठी वरमून जायचं?*
*कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?*
*फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला* *नासून जायचं..?*
*आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..*
*कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!* plz read

व. पु. .... एक कविता...

लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
लग्नानंतर मात्र राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.🤗

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..😉
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं 🙃

त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..😊
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.😜

ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही.😃
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.

तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.😀

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.😄

आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो😃

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.

-व. पु.

प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धमाल विनोदी कविता.😃😃

Nice Thoughts Collection in Marathi

काही  माणसं  तशी  साधीच  असतात पण त्यांच्या  साधेपणात एक मोठेपणा आसतो ,🙏🏻
विचारात  एक  तेज असते, ,बोलण्यात  नम्रता  असते  ,🙏🏻
वागण्यात  सौजन्य  असतं आणि  ह्दयात  असतो स्नेहाचा  झरा

💞 'मन' ओळखणारयांपेक्षा 👏🏻मन जपणारी 👨‍👨‍👦‍👦 माणसं हवीत... कारण, 🤗ओळख ही क्षणभरासाठी असते तर 👏🏻जपवणूक 🤗 आयुष्यभरासाठी!!!

*वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं*. *त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण* *ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे* *दिसली नाही. काही अंशी आपलं एखाद्याच्या* *आयुष्यातलं अस्तित्व असच असावं*
*दिसत नसलं तरी गोडवा आणि*
*आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत*.
               
*आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे*
*आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.*
*जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,*
*परंतु एक वडीलच असे आहेत* 
*की,जे आपल्या मुलाला*
*आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.*

अशक्य जोक

*अशक्य जोक*
👇👇👇👇👇👇
                     *कहर*
😀😀😜😜😜

गुरुजी : सांग बर प्राचीन भारतात *गणित* आणि *भुमिती* किती प्रगत होती.

गंपू : श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जुनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णिय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच *पार्थागोरस(पायथ्यागोरस)*..!!

हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजण विदेशी म्हणून हिणवू लागले.

तेव्हा अर्जुनाचा सहोदर बंधु कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता.

"पार्थागोरस, तू आणि मी पांडव असूनही एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे".

कर्णाच्या वाक्याने *'कर्ण'* आणि *'वर्ग'* हे दोन शब्द , पायथागोरसच्या मनावर लहानपणीच कोरले गेले.

त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून पायथागोरस ने कर्ण हा ईतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला.

त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले.

त्याच्या या सिद्धांताचे विचार *वर्तुळ* व्यास मुनीनी पुर्ण केल्यामुळे, वर्तुळाचा *व्यास* हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे प्रसृत झाला.

कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा. तो गणितात कच्चा होता, देविकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होउन मृत्यू अटळ बनला.

कृष्णाच्या हातून मोक्ष प्राप्ती होत असताना कंसाची ईच्छा प्रकट केली होती की, गणितात माझ्या नावाने कांहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मऱण असावे म्हणून गणितात ( ) *कंस* वापरतात.

यावरून प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती, हे सिध्द होते.

गुरूजी ICU मध्ये आहेत.

🌼🌼  || *सुप्रभात* ||  🌼🌼

✍🏻
     *मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत* ...' कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर *जपवणूक आयुष्यभरासाठी!*
      "" *भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल*  पण माझ्यापासून कोणाचे *नुकसान* नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो

        🌴🐾🐾🌴
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹
*आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो*🌺

👉 *एच.एम.टी. (घड्याळ)*
👉 *अॅम्बेसॅडर (गाडी)*
👉 *नोकिया (मोबाइल)*
या सर्वांच्या गुणवत्तेमध्ये कोणतीच कमी नव्हती,
परंतु तरीपण हे बाजारातुन, नामशेष झाले,
कारण त्यांनी वेळेनुसार बदल करुन घेतला नाही,
त्यामुळे माणसाला वेळेनुसार आपल्य
👉 *व्यवसायात*
👉 *कामात*
👉 *स्वभावात*
बदल करत राहीले पाहिजे...!!

*UPDATE* & *UPGRADE* TIME TO TIME

Marathi Exam SMS Collection

Ganya is back

शाळेत english  चे lecture चालू असते ..
मास्तर _ :  गण्या ' it ' केव्हा वापरतात ??

गण्या _: घर बांधताना !!!!
😂😂😂😂😂



खतरनाक विनोद
गुरूजी: गन्या, हुंडा म्हणजे काय रे सांग जरा..?
गन्या : जेव्हा एखादा महापुरुष...
एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी  मानसिक दृष्ट्या तयार होतो तेव्हा त्याला प्रोत्साहन-भत्ता... तथा अनुदान म्हणून... जी रक्कम दिली जाते त्यालाच आपल्या मातृभाषेत हुंडा 🎁असे म्हणतात..!
😄😂😃😅
गन्याला भारतरत्न जाहीर..!
😂😃😄😅😅😄😃😂😂

कॉलेजच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता.
झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहिण्या पेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा...!!!
मग त्याने मैत्रिणींची यादी बनवली आणि शेवटी 4 एकरात सोयाबीन पेरले. 😝😝