रत्नागिरी जिल्हा स्वच्छतेच्या सर्वे मध्ये देशात प्रथम .......

" आपले कोकण अनेक विषयात देशात आणि जगात पहिले आहे " .
*  येथील माणसांची जीवन पद्धती
* निसर्ग आणि मानवी जीवनाचा समतोल
*  नैसर्गिकपणे पर्यावरणा विषयक आवड
     *  शून्य हुन्डा बळी
     *  शून्य  भिकारी
     * शून्य स्त्री भ्रूण हत्या
* शून्य कर्जबाजारीपणा
* शून्य शेतकरी आत्महत्या
* शून्य सरकारी निधी व कर्ज डुबवणे
* गेली 5 वर्षे सतत ssc/hsc बोर्ड महाराष्टात प्रथम .
        
गावात राहाणाऱ्या व देशात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या रत्नागिरी वासियांचा सर्वाना अभिमान आहे .....

माणूस देवा कडून लाखो-करोडो रूपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो
परंतु...
जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो....

मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सबेरे...

मुलगी : आणि दुपारचे काय?

मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे.
😝😝😝

बायको:- आहो मी काय काय
सांभाळू ;
मुलं सांभाळू,
का तुम्हाला सांभाळू
का तुमच्या आई, वडीलांना सांभाळू
का घर सांभाळू...?


नवरा:-(आरामात) तू फक्त
स्वता:ची जीभ सांभाळ
सर्व ठीक होईल..😜😝😂

👨माणुस - देवा मुली इतक्या
सुंदर आणि गोड असतात
मग
बायका एवढ्या तिखट
आणि कडु का असतात
👼देव - कारण मुली मी बनवतो
आणि त्यांना बायका तुम्ही
बनवता
तो तुमचा 👉Problem आहे. तुम्हीच बघा
😄😜😄😜😄😜😄 🔫चुकीला माफी नाही🔫

रात्री ,भुताची  मालिका बघून झाल्यावरचा संवाद :

बायको : अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय,

नवरा : हां, म्हणजे मी भीतीनं मेलो तरी चालेल.😜😜😜😜

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो ,
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात ....
पण त्या सुटणाऱ्या असतात , या उलट जो दुसाऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही ,,,,,,
" किती वेळा मागितलं तरी
सुख उसनं मिळत नाही "
" एखाद्या जागी बसून कधीच
ध्येयाचं शिखर गाठता येत नाही "
" आपल्या देवावर नेहमी
नि:संकोच विश्वास ठेवा "
" योग्य वेळी तो इतकं देतो की
मागायला काहीच उरत नाही
💐💐💐💐
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*"

मनसे /राष्ट्रवादी / कॉँग्रेस /भा ज पा / शिवसेना पक्षात गेलेल्या

तरुण बिनडोक तरुणांनो

राज ठाकरे बोलला लगेच गेला टोलनाका अड्वायला

उद्धव ठाकरे बोलला चालला मराठी म्हणून बस फोडायला

शरद पवार बोलले लागला पुरंदरेला शिव्या द्यायला

बी जे पी वाला बोलला चालला गो माता गो माता करायला

राहुल गांधी बोलला लागला  रस्त्यांवर पळायला

ह्यांची मुले स्टडी रूममध्ये
तुम्ही कस्टडी रूममध्ये

ह्यांची मुले अमेरीका युरोपात
तु दहीहंडीच्या कळपात

ह्यांची मुले उच्चपदस्थ
तू एका क्वॉर्टर एवढा स्वस्त

त्यांची मुले इंजिनियर
तू पितो किंगफिशर बीअर

त्यांच्या मुलांना पाचआकडी पगार
तु हंगामी बेरोजगार

नको पवार नको ठाकरे नको मोदी नको सोनिया

तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत.
जगा फक्त तुमच्या आई-बापा साठी, समाजासाठी, आणि स्वत: साठी.

👌👌👌तरूणांना तसेच प्रत्येक व्यक्तीलाच विचार करायला लावणारी post आहे👏🏻👏🏻💐

🎾🎾✍🏼एक सुंदर सुविचार👌🏼🎄🍁🎄🍁

समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
   ☄Be Positive☄,,,💐💐💐
          दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....
कारण
श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं."🍃🍂🍃🍂

🍎🌻शुभ सकाळ🌻🍎

माझी  नोकरी  म्हणजे .......

माझी  नोकरी  म्हणजे याहूनही खूप काही आहे ,
ती माझा मोकळा श्वास आहे ,
समदुःखी मैत्रीणीँचा सहवास आहे ,
जीवनविषयक  अभ्यास आहे ,
तो माझा  आत्मविश्वास आहे ,
मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,
अनुभवाचे आकाश आहे ,
चार  भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,
तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,
घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे ,
कर्तुत्व सिद्ध करायचा ध्यास आहे ,
म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे तरी मला नोकरीची आस आहे .

(नोकरी करणाऱ्या व करत होत्या त्या माझ्या प्रत्येक
मैत्रिणीसाठी )

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.

आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.

मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतो
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतो.

त्याला कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतो
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतो.

तुमचा शब्द तो कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
तुमच्यासाठी गिळत असतो
नामुष्कीची अवघी लाळ.

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबा खचत असतो
आधार देता तरी
मान मारून हसत असतो.

तुमच्याकडूनं तसं त्याला
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्याचं
अवघं पोट भरत असतं.

त्याच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाही
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाही.”

त्याच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल, “ आपला बाबा
खरंच कधी चुकत नव्हता
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होता.”

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.

आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..

👪  आजच्या जागतिक कुटुंब दिवसाला सुंदर सलामी 💐💐🌹🌹🙏🙏

*✍🏻सुंदर विचार✍🏻*
🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃
*माणूस तेंव्हा मोठा नसतो जेंव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो...*
*मोठा तर तो तेंव्हा होतो जेंव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो...*
🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃
*😊शुभ सकाल😊*