एक सुंदर मराठी चारोळी फुलाचा सुगंध चोरला जात नाही
सूर्याची किरणे लपवली जात नाही आपल्याबरोबर कितीही भारी
आयटम असली तरी दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती जात
नाही..
Marathi Charolya
Babasaheb Ambedkar 125 Jayanthi
👉🏻आपले जीवन क्रांतीच्या सुर्यासारखे बनवा....
👉🏻आपली खरी नाळ कशाशी जुडली आहे...आम्ही इथले खरे मुलनिवासी....
👉🏻अंधारात खितपत पडलेल्या अस्पृश्य, दलित, बहुजन समाजास जागे करणारे..
👉🏻जगाला मानवतेचा मार्ग दाखवनारे...
👉🏻आपल्या मंडणगड तालुक्यातील 'आंबडवे' या मुळ गावचे...
👉🏻विश्ववंदनीय, क्रांतीसुर्य, थोर अर्थशास्त्रज्ञ, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 125 व्या जयंती वर्षानिमित्त विनम्र अभिवादन....!!
🙏🏼🙏🏼🙏🏼💐🙏🏼🙏🏼🙏🏼
Dnyan..
ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते.
आनंदच आनंद
मला पाहून म्हणाला .....
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हणालो अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे.
पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.
आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?
मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा ! हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी
पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.
मीही मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो.
पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"
मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात. कसं काय सर्व ? घरचे मजेत ना?".
मी म्हणालो, "छान" चाललय सगळं....... "श्रद्धा" आणि "विश्वास"हे असे दोन भाडेकरू ठेवलेत. ह्रदयघरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.
थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं, धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....
मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय.........
एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं नावच "समाधान" ठेवलंय."
तसं ते हसलं माझ्याकडे पाहून आणि परत पाठ फिरवून निघून गेलं "मत्सरा"च्या हातात हात घालून अन माझी "इर्षा"करत गेलं दुसर्याला भुलवायला.......
तेंव्हापासुनआनंदच आनंद सर्वत्र अनुभवतोय.
Positive SMS in Marathi
"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उद्या, तुमच वाटणं जगाची
"आवड" बनेल. .!!!
जे लोक गोड बोलतात, ते सर्वच आपले हितचिंतक
नसतात.
लक्षात ठेवा ,
गोडवा हा मधात असतो, मधमाशीत नसतो.
🌅शुभ सकाळ🌅
Manusaki
मंडप कीतीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकी ची जोड असल्या शिवाय जीवन कृतार्थ होत नाही......
Marathi Jokes at Love Time
BF : बेबी??
GF : हा जानु😘
BF : तू नेहमी माझा सोबत होतीस,
जेव्हा माझा भयंकर अपघात झाला तेव्हा पण,
जेव्हा मला पाचव्या सेमिस्टर मध्ये 3 विषयात झीरो आला तेव्हा पण,
जेव्हा मला किडनी स्टोन झाला तेव्हा पण,
आणि,
जेव्हा मला बाबांनी रागात घरातून बाहेर काढलं तेव्हा पण..
GF : Aaawww love you janu😘😍 आणि या पुढेही मी नेहमी तुझा सोबत असणार😍
BF : अगं नको ग...मला वाटत तूच पनोती...😳 आहे 😰😡
😂😂😂😂😂😂
Positive SMS in Marathi
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
Out of box Things
एक मुलगा सायकलवरून अंड्याचे ट्रे घेऊन जात असताना चौकात गर्दीच्या ठिकाणी खड्डयामध्ये सायकल आदळून सगळी अंडी रस्त्यावर पडुन फुटतात.
चौकातील सगळी गर्दी तमाशा बघायला पुढे येते, प्रत्येकजण त्या मुलाला दोष देत होता,
नीट सायकल चालवता येत नाही का ?
सगळा चौक घाण केला वगैरे वगैरे....
त्याचवेळी गर्दीतून एक प्रेमळ काका आले आणि म्हणाले,
"आरडाओरड करुन काही होणार नाही, लोकांनो विचार करा याचा मालक आता याचे काय हाल करेल.. मित्रांनो आपण याला मदत करुया, हे घ्या माझ्याकडुन १०रुपये"
सगळ्यांनाच काकांचे म्हणणे पटले आणि प्रत्येकाने १०- २०रुपये त्या मुलाला दिले.
मुलगा एकदम खुशाच झाला कारण अंड्याच्या किमतीपेक्षा त्याच्याकडे जास्त पैसे गोळा झाले होते.
गर्दीतल्या एकाने सहज विचारले,-
"अरे ते काका नसते तर तुझे काय झाले असते ?
मालकाला काय सांगितले असते ?"
मुलगा हसून म्हणाला :-
"अरे तोच तर मालक होता"!
.
तात्पर्य :- व्यापार्याचा नादच खुळा...
Out of box things करनेवाले हि business कर सकते है।
ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस!!
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!
धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन!!
करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
मिरचीचा ठेचा
लोणच्याचा खार,
हाच आमचा
पोषण आहार!!
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज!!
काट्यांच रूतणं
दगडांची ठेच,
कसा सोडवायचा
हा सारा पेच!!
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट!!
जुन्या पुस्तकांची
अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची
वेगळीच गंमत!!
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची!!
केस कापण्याची
एकच शक्कल,
गप्प बसायचे
होईपर्यंत टक्कल!!
📖📚📖📚📖📚📖📚
ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏🏼
