*नवरात्र....नवरंग*
*पहिला रंग*
स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.
*दुसरा रंग*
मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.
*तिसरा रंग*
आपल्याच मुलीकडे लायबिलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.
*चौथा रंग*
मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.
*पाचवा रंग*
बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.
*सहावा रंग*
पुरुषांनी आपल्या शारिरीक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.
*सातवा रंग*
स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.
*आठवा रंग*
विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.
*नववा रंग*
"स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.
आपण हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस *"विजयादशमी"* असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल.!!!
सहमत असाल तर आपण सर्वांना या नवरंगात सामिल करू या. 🙏🏼🙏🏼
No comments:
Post a Comment