*बायको आसावी तर अशी...*
साडेसातचे दरम्यान मऊशार हात अतिशय प्रेमाने कपाळावर ठेऊन " उठताय ना?" अशी लाडिक हाक मारून उठवणारी...
दात घासून घेईपर्यंत बाल्कनीत कॉफी टेबलवर 'सकाळ' व ' लोकसत्ता ' रेडी ठेवणारी...
मस्कापाव,आवडती बिस्किटस् चहाच्या कपाशेजारी आवर्जुन ठेवणारी...
नवरा घेत असलेल्या चहाच्या स्वादास तिच्या चटकदार गप्पा व खळाळत्या हास्याची साथ देणारी ...
आंघोळीस बाथरूममध्ये रोज टॉवेल इ. न विसरता ठेवणारी....
आंघोळ करून बाहेर आल्यावर छान मॅच होणारे कपडे तयार ठेवणारी....
नवर्याचे तयार होणे सुरू असताना अगदी शांतपणे मुलाला तयार करणारी....
नवरा अाॅफिसला बाहेर पडताना मुलाला ' किशी ' करायला पाठवणारी...
नंतर मुलाची नजर चुकवून नवर्याला गुड बाय Flying किस करून आॅफिसला पाठवणारी...
१२.३० दरम्यान फोन करून टिफिनमध्ये दिलेले टेस्टी सरप्राइज खाण्याची अाठवण करणारी..
४.३० वाजता पुन्हा ' लवकर घरी या ' असा लाडिक हट्ट करणारी...
७ वाजता आॅफिसमधून परत येतोयं तर छानसे नटून नवर्याने बेल वाजवायच्या अगोदरच दार उघडणारी...
चेहर्यावर छानसे हास्य विलसवणारी...
नवरा फ्रेश होऊन येईपर्यंत टेबलवर रुचकर मेनू तयार ठेवणारी...
जेवण झाल्यावर रोज लिटिल वॉक अराऊंड ला बाहेर येणारी...
रस्त्याने चालताना कळत नकळत हळुवार स्पर्श होतील...मधूनच हात धरला जाईल हे पहाणारी......
मॉल मधे चिअरफुली शॉपिंग करताना बजेट डोक्यात ठेवणारी...
घरी परतताच 'तुम्ही आता जरा टी व्ही बघा, मी मुलाचा होम वर्क घेते ' असं म्हणणारी...
.
.
.
अतिशय प्रेमाने न रागवता न वैतागता मुलाचा होम वर्क घेणारी......
कधी कोणतीही कट कट न करणारी..
नवर्याला एकही प्रश्न ऊलट न विचारणारी...
सासू सासऱ्यांवर आई वडिलांसारखे प्रेम करणारी...
सगळ्या नातेवाईकांस आपलेसे करून टाकणारी....
अशी सर्वगुणसंपन्न सौंदर्यवती स्री
*कुणाची बायको आहे का हो.....अशी ?....*
😜😝😛
असेल तर अभिनंदन💐
No comments:
Post a Comment