एक भक्त पांडुरंगाला विचारतो ,
" कंभरे वरचा हात काढून आभाळाला लाव तु ,
सोन्या चांदीचे दान नको मला , भिजव माझा गाव तु !"
त्यावर पांडुरंग हसून म्हणाला ,
" भक्ता..,
आभाळाला हात 🙌
लावून पडेल कसा पाऊस ? "
" आता म्हणतो नको मला
सोन्या चांदीच दान,
झाड़ सगळी तोडून पृथ्वी वरची,
सांग कोणी केली घाण ? "
" आता म्हणतो पांडुरंगा
पाऊस फक्त पाड,
प्रगतीच्या हव्यासापायी रान केल उजाड़ ! "
" भक्ता तुझी ' फक्त घेण्याची ' वृत्ती आता सोड ,
चंगळवाद सोडुन लाव
निसर्गाची ओढ़ ! "
" हात जोडून मिट्ण्या पेक्षा
उघड आता डोळे,
आई वसुंधरा रड़तेय बाळा
काढ कानातले बोळे ! "
" पृथ्वीच्या मुलाच कर्त्तव्य आत्ताच पार पाड़,
जागा करून हर एक माणुस लाव फक्त झाड ! "
" पुढच्या वेळी चालशील जेव्हा पंढरीची वाट ,
दिसला पाहीजे हिरवागार प्रत्येक डोंगर अन घाट ! "
" अठ्ठावीस युगांपासून
विटेवर उभा राहून "
हाच संदेश देतोय,
पण भोळा भक्त अर्थ न
जाणता
फक्त प्रसादच घरी नेतोय..💐💐💐💐
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment