To baap asato

वडीलांस पत्र ..........."
प्रिय  " बाबा " यांसS ,
                             
आज थोडं एकट एकट वाटलं,
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
          पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,
                           आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,
काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं  वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,
                           फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,
                           पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकटं एकटं " वाटलं .
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,
                            त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
रात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,
                            तुम्ही नसताना आईच्या कुशीतही
झोप नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,
                           पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
                            तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं…… 
  
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……
आई- वडील

जास्तीत जास्त शेअर करा.
ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...!

तो बाप असतो...
तो बाप असतो...
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो..
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
..........तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो,
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
........तो बाप असतो.
स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile
घेऊन देतो,
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
.......तो बाप असतो..


love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो,
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो,
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप
रडतो,
........तो बाप असतो..
जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो,
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो,
.......तो बाप असतो..
वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता FORWARD
करा.........
वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या
सहमत असाल तर नक्की FORWARD करा...
  ❤I love Papa❤
♥❤❤

No comments:

Post a Comment