एक मॅनेजर त्याच्या आलीशान गाडीतून जात असताना त्याला रस्त्याकडेला दोन माणसे गवत खाताना दिसली.

आश्चर्यचकीत होऊन त्याने ड्रायवर ला गाडी थांबवायला सांगितली आणि तो त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला.

"अरे,तुम्ही दोघे गवत का खात आहात?"

एक माणूस गहिवरल्या डोळयांनी म्हणाला,

"साहेब,आम्ही खूप गरीब आहोत.पैसे नसल्यामुळे आम्हाला गवत खावे लागत आहे."

हे ऐकून मॅनेजर च्या डोळ्यातून टचकन पाणी आले,तो म्हणाला,
"अरेरे,
असं करा..माझ्या घरी चला..मी तुम्हाला वाढतो."

माणूस-"नको साहेब,
मी नाही येऊ शकत.
माझ्या बरोबर बायको आणि चार मुलं आहेत."

मॅनेजर-"अरे असं काय करतोस...त्यांना पण घेऊन चल,मी त्यांना पण वाढीन."

मॅनेजर दुस-या माणसाकडे वळून म्हणाला,
"तू पण चल रे..मी तूला पण खायला देईन."

दुसरा माणूस-"नको साहेब,
माझी बायको आणि सात मुलं आहेत.
ते सर्व जण त्या झाडाखाली बसलेत."

मॅनेजर-"अरे मग चल,त्यांना पण घे आणि चल."

मॅनेजर ने त्याच्या आणखी दोन आलीशान गाड्या मागवल्या.सर्व जण त्यात बसले आणि मॅनेजर च्या बंगल्याकडे निघाले.

ती दोन माणसे-
"साहेब,
आपले खुप उपकार झाले.
आपण आम्हाला आपल्या बंगल्याकडे घेऊन निघालाय.
आपलं मन खूप मोठं आहे,आपल्या बंगल्यासारखं"

.
.
.
.
.
.
,
.
.
मॅनेजर-"अरे असू दे रे..
बंगल्याच्या आवारातलं गवत पण चांगलं एक फूट उंच आहे."

तात्पर्य-मॅनेजर वर कधीही विश्वास ठेवू नये.

No comments:

Post a Comment